Share Market: जीवनात चांगल्या गोष्टी कधीच सहज मिळत नाहीत. फिटनेस, चांगले संबंध आणि मोठी संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक आहे. हेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठीही लागू होते. भारतात, 65% संपत्ती केवळ 10% लोकांकडे आहे. हे दर्शवते की श्रीमंत बनणे हे सोपे नाही. तरीही, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही संपत्ती निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
नवीन अपडेटसाठी जॉइन टेलीग्राम चॅनल (आजच) 👉 @marathifinance
Group | Average Wealth (Rs) | Share of Total Wealth (%) |
---|---|---|
Bottom 50% | 66,280 | 6% |
Middle Class | 723,930 | 29.5% |
Top 10% | 6,354,070 | 65% |
Top 1% | 32,449,360 | 33% |
इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा शेअर मार्केट का चांगले आहे?
- उच्च रिटर्न: IIFL Securities च्या अभ्यासानुसार, शेअर मार्केटने गेल्या 15-20 वर्षांत 15.5% चा सरासरी वार्षिक रिटर्न दिला आहे. सोने, रियल इस्टेट आणि कर्ज यांसारख्या इतर मालमत्ता वर्गांनी फक्त 5-8% चा रिटर्न दिला आहे. म्हणून इतर Assets च्या तुलनेत शेअर मार्केट एक उत्तम पर्याय म्हणून स्पष्ट होतो.
- दीर्घकालीन संपत्ती निर्मिती: महागाईपेक्षा जास्त रिटर्न देऊन, शेअर मार्केट तुम्हाला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, जर महागाईचा दर 6-8% आहे तर आपल्याला कमीत कमी 12% रिटर्न मिळाला पाहिजे तरच आपले पैसे वाढतील.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवावे?
- संयम: शेअर मार्केटमध्ये चढ-उतार होणे स्वाभाविक आहे. तुमच्या गुंतवणुकीवर विश्वास ठेवा आणि शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे घाबरून विक्री करू नका. याने नुकसान तुमचच होणर आहे.
- दीर्घकालीन दृष्टीकोन: शेअर बाजारात लॉन्ग टर्म गुंतवणूक करा. शॉर्टमध्ये नुकसान होणे साहजिक आहे. म्हणून शॉर्ट टर्म गुंतवणूक टाळा.
- विविधता: तुमचे गुंतवणूक विविध क्षेत्रे आणि कंपन्यांमध्ये पसरवा. एकाच ठिकाणी पैसे इन्वेस्ट करू नका.
- शिस्त: नियमितपणे गुंतवणूक करा, जरी बाजार कमी असेल तरीही.
निष्कर्ष:
शेअर मार्केटमधून वेल्थ बनवणे हे कठोर परिश्रम आणि संयमाची आवश्यकता असते. तरीही, योग्य दृष्टीकोन आणि धोरणासह, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करू शकता. माझा ठाम विश्वास आहे की येणारे 10-20 वर्षे ही भारताच्या ग्रोथची बेस्ट वर्षे असतील. पैसे इन्वेस्ट करा. संयम बाळगा. तुम्हाला वेल्थ बनविण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
इतर पोस्ट वाचा👉 2024 साठी 10 पर्सनल फायनान्स टिप्स
12 thoughts on “शेअर मार्केटमधून वेल्थ कशी बनवायची? | How to Make Money in Share Market in Marathi?”