तुम्ही कधी Share Market च्या चढ-उतारांवरून तुमचे गुंतवणुकीचे निर्णय घेतले आहेत का? Share Market मध्ये सतत चढ-उतार होत असते. विशेषतः नव्या गुंतवणूकदारांसाठी, हे बदल त्यांचे विचार आणि निर्णयांवर मोठा परिणाम करतात. Bull Market आणि Bear Market गुंतवणूकदारांच्या वर्तनावर कसा प्रभाव टाकतात, हे समजून घेऊया.
Bull Market म्हणजे काय?
Bull Market हा Share Market चा असा टप्पा आहे, जेव्हा शेअरची किंमत सतत वाढत असते, उत्साह सर्वत्र असतो आणि गुंतवणूकदारांना भविष्याबद्दल आत्मविश्वास असतो. हा एक असा काळ असतो जेव्हा Share Market रोखता येणार नाही असं वाटतं आणि जवळपास प्रत्येकाला चांगला रिटर्न मिळतो.
COVID-19 नंतरचा Bull Market
2020 च्या COVID-19 क्रॅशनंतर Share Market ने जोरदार पुनरुज्जीवन केलं, ज्यामुळे 2023 पर्यंत Bull Market चा कालावधी सुरू राहिला. नवीन गुंतवणूकदार Share Market मध्ये आले, जलद नफा आणि मोठ्या परताव्याच्या गोष्टींनी आकर्षित झाले.
या Bull Market दरम्यान, अनेकांसाठी गुंतवणूक म्हणजे यशाचं दुसरं नाव झालं. परंतु या काळात गुंतवणूकदारांना फक्त संधी दिसू लागल्या आणि धोके दुर्लक्षित होऊ लागले.
Share Market मधील परिस्थिती कशी बदलली?
आता Share Market हे पुनः Bear Market मध्ये आहे किंवा जाताना दीसत आहे, जिथे किंमती घसरत आहेत आणि परतावा कमी होत आहे. Bull Market चा उत्साह आता अनिश्चितता आणि भीतीमध्ये बदलला आहे.
Bear Market म्हणजे काय?
Bear Market हा Share Market चा असा टप्पा आहे जिथे शेअरच्या किंमती सतत घसरत असतात, निराशा वाढते आणि भीती निर्माण होते. अशा वेळी गुंतवणूकदार फायद्याऐवजी तोटा टाळण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात. कधी आशादायक वाटणारा Share Market आता जोखमीचा वाटू लागतो आणि अनेकजण दूर राहणे पसंत करतात.
Share Market गुंतवणूकदारांसोबत कस खेळत?
Bull Market मध्ये गुंतवणूकदारांना संधीच संधी दिसतात पण धोके दुर्लक्षित होतात. Share Market मधील वाढत्या किंमतींच्या उत्साहामुळे संभाव्य घसरण लक्षात घेतली जात नाही. Bear Market मध्ये गुंतवणूकदार फक्त जोखमीकडे लक्ष देतात आणि संधी ओळखू शकत नाहीत. Share Market मधील घटत्या किंमतींसाठी गुंतवणूक करणं टाळलं जातं. खर तर हीच गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असते. पण भीतीमुळे याकडे दुर्लक्ष केल जात.
Share Market मधील Bull Market आणि Bear Market कसा हाताळावा?
- तर्कसंगत राहा: Share Market च्या हालचालींवर तुमचे निर्णय अवलंबून राहू देऊ नका.
- विविधता ठेवा: Bull Market आणि Bear Market दोन्हीमध्ये जोखीम कमी करण्यासाठी पोर्टफोलिओ वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवा. (Diversification हवच)
- दीर्घकालीन विचार करा: लक्षात ठेवा, Share Market हा वर खाली होतच असतो. म्हणून लॉन्ग टर्मचा विचार करा
- भावनिक प्रतिक्रिया टाळा: भीती आणि लोभ हे तुमचे सर्वात मोठे शत्रू आहेत.
निष्कर्ष
Share Market मध्ये सतत चढ-उतार चालू असतात, तसंच गुंतवणूकदारांची मानसिकता बदलत राहते. मुख्य गोष्ट म्हणजे संतुलित राहणे, Bull Market आणि Bear Market च्या Psychology समजून घेणे, आणि भावनांऐवजी तर्कावर आधारित निर्णय घेणे. Share Market मध्ये संधी आणि धोके दोन्ही असतात—ते ओळखण्याची जबाबदारी तुमची आहे, मग बाजाराचा मूड काहीही असो.
ही पोस्ट वाचा: iPhone किंवा भविष्य? योग्य आर्थिक निवड कशी कराल?