Medi Assist Healthcare IPO: आयपीओ झाला पूर्णपणे सबस्क्राईब, ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे?

Medi Assist Healthcare IPO: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ काल म्हणजेच 17 जानेवारी 2024 रोजी Bidding साठी बंद झाला. पहिल्या दोन दिवशी रिटेल इन्वेस्टर आणि NII या कॅटेगरीमधून आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

पण शेवटच्या दिवशी अगदी याच्या उलट झाल कारण शेवटच्या दिवशी QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओ जोरदार प्रतिसाद मिळाला आणि या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 40 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

यासोबत रिटेल कॅटेगरीमध्ये मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ तीन दिवसात 3.1 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

तसेच NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ तीन दिवसात 14 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Medi Assist Healthcare IPO GMP Today

ग्रे मार्केटमध्ये या आयपीओची किंमत 42 रुपये चालू आहे.  जर आपण या आयपीओची इश्यू प्राइज 418 रुपये घेतली + चालू ग्रे मार्केट प्रीमियम तर इन्वेटर्स 460 रुपयांची लिस्टिंग प्राइज मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे इन्वेटर्सना जवळजवळ  10 % लिस्टिंग प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे.

Parameter Amount (in INR)
IPO Price 418
Grey Market Premium 42
Listing Price (IPO + Premium) 460

Medi Assist Healthcare IPO Details 

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची प्राइज Rs 397-418 रुपये प्रति शेअर  फिक्स  करण्यात आली आहे. हा आयपीओ 15 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे आणि 17 जानेवारी 2023  रोजी बंद होणार आहे.

इन्वेस्टर मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओसाठी अप्लाय करताना एका लॉटमध्ये टोटल 35 शेअर्स  घेऊ शकतात ज्याची टोटल किंमत ₹14,630 रुपये एवढी असेल.

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल (offer for sale) असेल. ऑफर फॉर सेल म्हणजे कंपनीचे प्रोमोटर त्यांची हिस्सेदारी पब्लिकला विकत आहेत. या ऑफर फॉर सेलमध्ये टोटल 2.8 करोड एवढे शेअर्स मार्केटमध्ये पब्लिकला विकले जातील.

Medi Assist Healthcare IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: January 12, 2024
IPO Open Date: January 15, 2024
IPO Close Date: January 17, 2024
Basis of Allotment: January 18, 2024
Refunds: January 19, 2024
Credit to Demat Account: January 19, 2024
IPO Listing Date: January 22, 2024

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market? 

Leave a Comment