Money Management: iPhone किंवा भविष्य? योग्य आर्थिक निवड कशी कराल?

Money Management Tips: आजकाल इंस्टाग्रामवर तुम्हाला “iPhone घेऊ नका” किंवा “कार घेऊ नका” असं सांगणाऱ्या अनेक रील्स दिसतात. खर बोला. एकून डोक फिरत ना?. सतत हे घेऊ नका. ते करू नका आणि बरंच काही. काहींसाठी हा सल्ला योग्य ठरू शकतो, पण सगळ्यांसाठी नाही. खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे तुमच्या कमाईचा आनंद घेतानाच तुमचं भविष्य सुरक्षित करणं. चला, याला एक उदाहरणाद्वारे समजून घेऊया.

Threads App Follow Now

शहाणपणाने नियोजन केलेलं आयुष्य कसं दिसतं?

यशने २३ व्या वर्षी, महाविद्यालय पूर्ण केल्यानंतर, महिन्याला ₹२०,००० पगाराने नोकरीला सुरुवात केली. पहिल्याच दिवसापासून त्याने आर्थिक स्थिरतेवर भर दिला. त्याने स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी Health Insurance घेतलं, जेणेकरून वैद्यकीय आपत्तींमध्ये सुरक्षितता मिळेल. त्याचबरोबर त्याने ६५ वर्षांपर्यंतचा Term Insurance घेतला. याशिवाय, Emergency Fund तयार करून अनपेक्षित परिस्थितीसाठी पैसे साठवले.

यशने SIP (Systematic Investment Plan) मध्ये गुंतवणूक करून त्याच्या पैसा वाढवायला सुरुवात केली. पण यशचं एक स्वप्न होतं—iPhone घेण्याचं. त्याने हे स्वप्न लगेच पूर्ण केलं नाही; त्याऐवजी, त्याने दर महिन्याला आपल्या पगाराच्या १०% रक्कम बाजूला ठेवली. २९ व्या वर्षी त्याने iPhone 16 खरेदी केलं, तेही कुठलाही पश्चात्ताप किंवा आर्थिक अडचण न येता.

तात्काळ आनंदासाठी भविष्याला धोक्यात घालण्याचा परिणाम काय होतो?

२०२४ मध्ये रोहितने ₹२५,००० पगारावर नोकरी सुरू केली. पण त्याचा दृष्टिकोन यशच्या अगदी उलट होता. पहिल्या तीन पगारांतच त्याने iPhone 16 खरेदी केला. (तोही 128 GB वाला) मात्र, त्याने Health Insurance, Term Insurance किंवा Emergency Fund यांना महत्त्व दिलं नाही. भविष्यासाठी गुंतवणूक तर त्याच्या डोक्यात नव्हतीच. (No SIP काहीच नाही)

आता, जरी रोहित त्याच्या नवीन iPhone चा आनंद घेत असेल, तरी त्याच्याकडे वैद्यकीय किंवा इतर अचानक आलेल्या खर्चासाठी आर्थिक आधार नाही. त्यामुळे त्याला भविष्यात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते.

मुख्य धडा: खर्च आणि बचतीत संतुलन कसं राखाल?

यश आणि रोहितच्या कहाणीतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो: संतुलन राखणे गरजेचे आहे. यशने त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जबाबदारीने पाऊल उचलले, तर रोहितने तात्काळ समाधानासाठी भविष्याची सुरक्षा धोक्यात घातली.

शहाणपणाने खर्च कसा करावा?

शहाणपणाने आर्थिक नियोजन करणं म्हणजे स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टींना पूर्णतः नकार देणं नव्हे. तुमच्या गरजांना प्राधान्य द्या, Health Insurance आणि Term Insurance घ्या, Emergency Fund तयार करा, आणि भविष्यासाठी SIP सारख्या गुंतवणुकीत पैसे लावा. यासोबत तुमच्या स्वप्नांसाठीही थोडेसे पैसे बाजूला ठेवा. या मार्गाने तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा आनंदही घेऊ शकता आणि भविष्यही सुरक्षित करू शकता.

सोशल मीडियाचा सल्ला म्हणजे सरळ मार्ग नव्हे!

शेवटी, सोशल मीडियावर मिळणाऱ्या सरळ-सोपी वाटणाऱ्या सल्ल्यावर पूर्ण विश्वास ठेऊ नका. “iPhone घेऊ नका” किंवा “कार घेऊ नका” असे सल्ले नेहमीच योग्य नसतात. हे घेऊ नका, ते घेऊ नका. अरे भाई मी जगू की नको. असे विचार डोक्यात येतात. तुमच्या आर्थिक निर्णयांना तुमच्या गरजा आणि उद्दिष्टांशी जुळवून घ्या. हे आजकाल जो तो येऊन काही ना काही सांगत असतो. काय योग्य ते तुम्ही ठरवा. माझ तर स्पष्ट मत आहे. यशसारखे व्हा: जबाबदारीने खर्च करा, बचत करा आणि सोबत पैशाचा आनंद घ्या.

ही पोस्ट वाचा: Warren Buffett यांचे 5 गुंतवणूक रहस्य: मार्केटच्या घसरणीत तुमची रणनीती बदलतील

Leave a Comment