2024 साठी 10 पर्सनल फायनान्स टिप्स (10 Personal Finance Resolutions/Tips)

5/5 - (1 vote)

Personal Finance Resolutions/Tips: 2024 फक्त 1 दिवस दूर आहे. आणि आता सगळेजण New Year Resolutions बनवायच्या तयारीत आहेत. पण काही कारणास्तव गेल्या वर्षीचे Resolutions राहिले असतील तर ते आठवा आणि  त्यांच्यावर यावर्षी अगदी जोमाने काम करायला घ्या.

या ब्लॉग पोस्टमध्ये मी तुमच्यासोबत काही पर्सनल फायनान्स टीप म्हणा किंवा New Year Resolutions शेअर करणार आहे ज्यावर आपल्या प्रत्येकाला विचार करायचा आहे आणि त्यांना फॉलो करायच आहे. चला तर सुरुवात करूया!

1) स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी एक हेल्थ इन्शुरन्स घ्या. 

तुम्ही जिथे काम करता तिथून तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मिळत असेल तर चांगलच आहे. जर नसेल तर स्वतः साठी हेल्थ इन्शुरन्स घ्या. पाच लाख ते दहा लाख यादरम्यान तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतल पाहिजे. अचानक आजारपण आलं की सगळ्या एसआयपी किंवा इतर इन्व्हेस्टमेंट तोडण्यापेक्षा हेल्थ इन्शुरन्स असेल तर  ते नक्कीच कामी येतं. शिवाय हेल्थ इन्शुरेंस ही स्वस्त दरात काढता येत. (अधिक माहितीसाठी 👉 हेल्थ इन्शुरेंस काय आहे? फायदे आणि तोटे जाणून घ्या)

2) इन्वेस्टिंगला सुरुवात करा

जर तुमची इन्कम आत्ता कमी असेल तरीही चालेल एका छोट्या रकमेने सुरुवात करा.  पुढे जाऊन तुम्ही ती रक्कम वाढवू शकता. तुमच्या इन्कमच्या 5%  रक्कम जरी इन्व्हेस्ट करता आली तरीही पुरेशी आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करा. आणि हो बेस्ट म्यूचुअल फंड सोधत बसण्यात वेळ घालवू नका. आधी एक सिम्पल इंडेक्स फंड घ्या आणि सुरुवात करा. मग हव तर अजून एक चांगला फंड बघा. आणि म्यूचुअल फंडबद्दल शिकायला घ्या. अस केल्याने बेस्ट फंड निवडण्यासाठी लागणारा वेळ वाया जाणार नाही. 

3) फिटनेसवर लक्ष द्या

मला माहिती आहे, ही काय  एक फायनान्शिअल टीप नाहीये. पण जरा विचार करा एवढी मेहनत करून तुम्ही पैसे कमवणार आणि ते पैसे एन्जॉय करण्यासाठी चांगली हेल्थ नसेल तर त्याचा काय फायदा म्हणून थोडी इन्व्हेस्टमेंट तुमच्या हेल्थमध्ये करा. चांगला आहार घ्या, वर्कआउट करा आणि फिट रहा.

4) टर्म इन्शुरन्स घ्या

जर तुम्ही घरचे एक कमवते व्यक्ती आहात तर तुमच्या जीवाला काही झालं तर फॅमिलीकडे कोण बघणार याचा जरा विचार करा आणि अशा परिस्थितीत टर्म इन्शुरन्स नेहमी मदतीला येतं. त्यामुळे प्रत्येकाकडे टर्म  इन्शुरन्स असले पाहिजे. टर्म इन्शुरन्स जितक्या  लवकर घेणार तेवढं त्याचं प्रीमियम कमी येतं. (अधिक माहितीसाठी 👉 Term insurance काय आहे? फायदे आणि तोटे)

5) इमर्जन्सी फंड तयार ठेवा

आजकाल तुम्ही न्यूज मध्ये ऐकला असेल की मोठमोठ्या कंपन्या लोकांना कामावरून काढून टाकत आहेत. पुढे जाऊन जॉब लॉस झाला किंवा इन्कम कमी झाली तर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड तयार असायला हवा. तुम्ही नवीन जॉब बघेपर्यंत इमर्जन्सी फंडचा वापर करून तुम्ही तुमचे खर्च पुरे करू शकता. 

6) इतरांसोबत तुमच्या पोर्टफोलीचा रिटर्न कम्पेअर करणे बंद करा

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर त्यांच्या पोर्टफोलिओचे स्क्रीनशॉट दाखवत असतो. त्यातले किती खरे आणि किती खोटे हे समजलं पण  आजकाल खूप कठीण झाल आहे.  तुम्ही तुमच्या पोर्टफोलिवर फोकस करा आणि त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करत रहा. कोणी सोशल मीडियावर काहीही बोलले त्यावर लक्ष देणं बंद करा. कारण तुमचे गोल्स वेगळे आहेत, तुम्ही रिस्क क्षमता वेगळी आहे इ. गोष्टी लक्षात असुदेत. 

7) Compounding वर लक्ष द्या

पुढची 20 – 30 वर्ष 12% – 14% चा रिटर्न मिळणे हे एकाच वर्षी 30% चा रिटर्न मिळण्यापेक्षा खूप बेटर आहे. कारण 12% ते 14%  रिटर्न मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे.  पण दरवर्षी सतत 30 वर्ष एवढा रिटर्न मिळणे हे खूप कठीण आहे त्यामुळे जास्त रिटर्नच्या मागे धावू नका. कमी रिटर्न असला तरी चालेल पण लॉन्ग टर्म Compounding वर लक्ष ठेवा. 

8) नवीन स्किल शिका

जोपर्यंत तुम्ही नवीन स्किल शकत नाही तोपर्यंत तुमची इन्कम वाढणार नाही किंवा जिथे तुम्ही काम करता तिथे कसं पुढे जाता येईल याचा विचार करा जेणेकरून तुमची इन्कम वाढेल. जितके जास्त पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करणार तेवढा जास्त फायदा तुम्हाला होईल. आणि आजकाल सगळ काही यूट्यूबवर शिकता येत. 

  • व्हिडिओ एडिटिंग
  • ग्राफिक डिझायनिंग
  • ब्लॉगिंग
  • Freelancing
  • कंटेंट रायटिंग 

9) बुक्स वाचायला घ्या

बुक्स वाचणे हे 2024 साठी तुमचं मेन गोल असले पाहिजे. आणि खर बोलू तर जास्त बुक्स वाचायची गरज पण नाहीये. ५-६ बुक्स चार वाचल्या तरी पुरे झाल्या.  पण त्यातून जे काही शिकाल ते तुम्ही अप्लाय कसं करायचं याकडे जास्त लक्ष द्या.

  • Rich Dad Poor Dad
  • Psychology of Money
  • Atomic Habits
  • Let’s Talk Money
  • Let’s Talk Mutual Funds
  • The Alamanack of Naval Ravikant 
  • Clear Thinking 
  • Building a Second Brain 
  • ही मी वाचलेली काही बुक्स आहेत, फक्त फायनॅन्स नाही तर इतर टॉपिक पण वाचा. 

10) खर्च ट्रॅक करा 

आपल्या सगळ्यांना माहित आहे की खर्च ट्रॅक करणे किती चांगली सवय आहे. पण प्रॉब्लेम कुठे होतो आपण सुरुवात तर करतो पण काही दिवस खर्च ट्रॅक करतो आणि मग बंद करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला तुमचे पैसे कुठे जातात, कुठून येतात किती खर्च होतो हे समजेल तर फ्युचर प्लॅनिंग करताना तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.

शेअर करा टॅग करा 🚀

बस एक छोटी हेल्प करा, ही पोस्ट तुमच्या इन्वेस्टर मित्रांसोबत शेअर करा पोस्टला प्लीज शेअर करा. तुमच्या Insta स्टोरीवर ठेवून @marathifinance ला टॅग करा. आम्ही पेजवर स्टोरी नक्कीच शेअर करू. Thank You in Advance! 🙏

इतर पोस्ट वाचा👉 Personal Finance नक्की आहे तरी काय?

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

1 thought on “2024 साठी 10 पर्सनल फायनान्स टिप्स (10 Personal Finance Resolutions/Tips)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi