The Freedom Manifesto in Marathi: 4% रूलचा वापर करून लवकर रिटायर व्हा!

Rate this post

The Freedom Manifesto Book in Marathi: आजच्या पोस्टमध्ये The Freedom Manifesto by Karan Bajaj (WhiteHat Junior या कंपनीचे फाउंडर) या बुकमधील एक महत्त्वाचा रूल म्हणजेच 4% रूल आपण समजून घेणार आहोत. या रूलचा वापर करून आपण कशाप्रकारे एक चांगली रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकतो आणि लवकर Financial Freedom ध्येय पूर्ण करू शकतो हे आपण शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया!

तुमचा Financial Freedom नंबर सोधा 

आपल्या प्रत्येकाला नेहमी प्रश्न पडतो की, रिटायरमेंटसाठी नेमकी किती अमाऊंट किंवा  रक्कम मला हवी आहे?  पण आता या 4% रूलचा वापर करून तुम्ही ती रक्कम किंवा तुमचा Financial Freedom नंबर सहजरित्या काढू शकता.

तुम्हाला फक्त एवढ करायचा आहे की, तुमच्या वर्षभराचे जे काही खर्च आहेत त्यांना 4% ने  डिवाइड करायचा आहे. उदाहरणार्थ: समजा तुमचा महिन्याचा खर्च 40000 आहे म्हणजे वर्षभराचा 4,80,000 रुपये. आता या 4,80,000 रुपयांना जेव्हा तुम्ही 4% ने भागणार तेव्हा मिळेल तुम्हाला तुमचा रिटायरमेंट नंबर. 

4,80,000 रुपये / 4% = 1,20,00,000 (1 करोड 20 लाख रुपये) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉How to Become Rich: श्रीमंत व्यक्तींच्या 7 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत)

आता 4% च का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल

हे बघा मित्रांनो भारतामध्ये 2022 साठी महागाईचा दर 6.70% होता पण आपण गणित करताना 7% घेऊ.  याचा अर्थ असा की यावर्षी 100 रुपयाला घेतलेली गोष्ट पुढच्या वर्षी 7 %  महाग होणार म्हणजेच 107 रुपये होणार. 

अगदी तसच या वर्षी तुमचे खर्च 4,80,000 आहेत तर पुढच्या वर्षी 7% ने वाढून 5,13,600 रुपये होणार आणि मग तिसऱ्या वर्षी 5,49,552 रुपये होणार. आता तुम्हाला वाटेल अस करून तर माझे सगळे पैसे संपून जातील. 

पण एक गोष्ट जरा लक्षात घ्या, जर तुमच्याकडे 1,20,000 करोड असतील तर तुम्ही ते असेच तर बँकमध्ये ठेवणार नाही, एखाद्या चांगल्या Asset मध्ये Invest तर करालच ना ज्यावर तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल.

आता त्यासाठी आपण एक गणित करून बघू. 

समजा, तुझी हे 1,20,000 करोड रुपये एका सिंपल इंडेक्स फंडमध्ये Invest केले. आणि तुम्हाला माहीत असेलच की,  भारतामध्ये इंडेक्सने जस की Sensex किंवा Nifty ने 13-15% चा Average रिटर्न दिला आहे. आता तुम्ही हे पैसे एका सिंपल इंडेक्स फंडमध्ये Invest केलेत जिथे तुम्हाला जास्त नाही फक्त 13% चा रिटर्न मिळतो तरी तुम्हाला खालीलप्रमाणे रिटर्न मिळतील. 

पहिल्या वर्षी 1,20,0000 करोडवर 13% रिटर्न = १५,६०,००० रुपये 

आता फक्त रिटर्न स्वरूपात मिळलेल्या पैशातून तुम्ही तुमच्या पहिल्या वर्षीचा खर्च वजा करा जो होतो ४,८०,००० रूपये. तुम्हाला 1,20,0000 करोडला हात पण लावायची गरज नाही पडणार. 

१५,६०,००० रूपये  – ४,८०,००० रूपये = १०,८०,००० रुपये

म्हणजे खर्च वजा करून पण तुमच्या हातात राहतात १०,८०,००० रुपये जे फक्त १,२०,००,००० रुपयांवर तुम्हाला मिळालेला रिटर्न आहे. आणि आता पुन्हा तुम्ही हा उरलेला रिटर्न म्हणजे 1०,८०,००० रुपये + 1,20,0000 करोड दुसऱ्या वर्षी  इनवेस्ट करू शकता. म्हणजे फक्त रिटर्नमधून येणाऱ्या पैशानी तुम्ही रिटायरमेंट नंतरचे खर्च आरामात करू शकता. जरी महागाई ७% ने वाढत राहिली आणि तुम्हाला तुमच्या Financial Freedom नंबरवर 13% एवढा जरी रिटर्न मिळाला तरी तुम्ही आरामात पुढे येणाऱ्या अनेक वर्षांचे खर्च मॅनेज करु शकता. आणि म्हणून

कोणतीही Investment करा त्यावर रिटर्न नेहमी महागाईच्या रेटपेक्षा जास्तच  मिळेल याकडे आधी लक्ष द्या, तर तुम्ही महागाईसोबत जिंकाल आणि Financial Freedom गाठू शकाल. 

तुम्ही हा टेबल बघू शकता ज्यामध्ये २० वर्षाच कॅलक्युलेशन दिल आहे. किती खर्च होणार त्यावर किती महागाई दर वर्षी वाढणार. त्यासोबत १३% ने1,20,0000 करोडवर किती रिटर्न मिळत राहील आणि त्यातून तुम्ही कसे खर्च करू शकता. 

वर्ष वर्षाला खर्च  (₹) महागाई दर  (%) रिटायरमेंट फंड (₹) त्यावर रिटर्न (%) वर्षाचा प्रॉफिट  (₹)
1 480,000 7 1,20,00,000 13 15,60,000
2 513,000 7 1,30,80,000 13 17,00,400
3 549,552 7 1,42,66,800 13 18,54,684
4 588,436 7 1,54,76,564 13 20,24,360
5 629,836 7 1,68,15,174 13 22,10,977
6 673,858 7 1,82,88,545 13 24,15,500
7 720,617 7 1,98,99,046 13 26,39,880
8 770,238 7 2,16,51,661 13 28,85,364
9 822,857 7 2,35,51,694 13 31,53,457
10 878,620 7 2,56,05,642 13 34,45,874
11 937,682 7 2,78,20,016 13 37,64,533
12 900,125 7 3,02,01,235 13 41,11,161
13 964,031 7 3,27,56,676 13 44,87,735
14 1,029,488 7 3,54,94,029 13 48,96,660
15 1,096,582 7 3,84,21,065 13 53,40,474
16 1,165,404 7 4,15,46,889 13 58,21,594
17 1,235,050 7 4,48,81,742 13 63,42,403
18 1,305,620 7 4,84,35,860 13 69,05,785
19 1,377,215 7 5,22,19,708 13 75,14,364
20 1,449,937 7 5,62,43,619 13 81,71,670

तुम्हाला तुमचा Financial Freedom नंबर मिळाला की तुम्ही आतापासून तो कसा गाठायचा याची तयारी करू शकता. कारण जेव्हा Goal स्पष्ठ असेल तेव्हा त्याला मिळवणे सोप होत.

तुमचे खर्च किती होतात ते आतापासून ट्रॅक करा. नुसता एवढे होतात तेवढे होतात असा अंदाज लावू नका. 2024 येत आहे खर्च ट्रॅक करायची सवय लावा. याचा फायदा असा होईल की Retirement Planning करताना तुमच्याकडे नेमके आकडे असतील. (आणि हो ज्यांच लग्न झालं नाहीये, त्यात मी पण आलो, त्यांनी लग्न झालेल्याना विचारा की लग्नानंतर खर्च कसे वाढतात. रिटायरमेंट प्लॅनिंग करताना हेल्प होईल. 

  • घरचे खर्च 
  • मुलांचं शिक्षण
  • बाहेर जेवण
  • शॉपिंग
  • इन्शुरन्स
  • मेडिकल
  • गावी आई बाबांना पैसे 
  • ट्रॅव्हल करणे 
  • इंटरनेट
  • जे काही खर्च असतील ते नीट ट्रॅक करा 

Financial Freedom च ध्येय गाठण्यासाठी आतापासून तयारीला लागा. ALL THE BEST भावांनो आणि बहिणींनो!👍

आणि हो तुम्हाला अशा पोस्ट आवडत असतील तर मला नक्की सांगा. मी ज्या बूक्स वाचेन त्यातील महत्वाच्या Lessons वर अशा ब्लॉग पोस्ट तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. ब्लॉगला सपोर्ट करत रहा.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market? (marathifinance.net

12 thoughts on “The Freedom Manifesto in Marathi: 4% रूलचा वापर करून लवकर रिटायर व्हा!”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi