वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market?

How to Make Money in Share Market: लाइफमध्ये चांगल्या गोष्टी कधीच सहज मिळत नाही. मग ते फिटनेस असो, चांगल नात असो की खूप सारी वेल्थ.

कोणत्याही देशाच उदाहरण घ्या, काहीच लोक आहेत ते Wealthy बनतात. आपल्या भारताच उदाहरण घेतल तर हे खाली दिलेल टेबल बघा.  65% एवढी वेल्थ फक्त टॉप 10% लोकांकडे आहे. पण पैसा किंवा वेल्थ ही अशी गोष्ट आहे ना ज्याने लाइफचे खूप सारे प्रॉब्लेम्स सुटतात.

आता ही वेल्थ बनविण्याचा आपल्याकडे मार्ग काय आहे?

Group Average Wealth (Rs) Share of Total Wealth (%)
Bottom 50% 66,280 6%
Middle Class 723,930 29.5%
Top 10% 6,354,070 65%
Top 1% 32,449,360 33%

वेल्थ बनविण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे Equity Investing.

Equity Investing म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करणे. मग ते पैसे तुम्ही स्टॉकच्या माध्यमातून इन्वेस्ट करा की मग म्यूचुअल फंडच्या माध्यमातून, हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. आता बाकीचे Assets क्लास का नको? फक्त शेअर मार्केट का?

याच कारण अस की, बाकीच्या कोणत्याच Asset मध्ये एवढी क्षमता नाही की ते महागाईपेक्षा जास्त रिटर्न देऊ शकेल ज्याने लॉन्ग टर्म वेल्थ बनू शकेल.

IIFL Securities च्या स्टडीनुसार जर आपण 15-20 वर्षाचा डेटा पाहिला तर Equity या Asset क्लास ने 15.5% चा रिटर्न दिला आहे.

आणि बाकीचे Asset क्लास जस की गोल्ड, रीयल इस्टेट, Debt आणि इतर यांनी 5-8% चा रिटर्न दिला आहे. याच दरम्यान महागाईचा रेट 5-7% आहे. मग आता तुम्हीच विचार कोणता Asset क्लास वेल्थ बनविण्यासाठी बेस्ट राहील.

उत्तर आहे इक्विटि म्हणजे शेअर मार्केट.

पण शेअर मार्केट कधीच आपल्या मनासारखे रिटर्न देत नाही.

एखादा स्टॉक काही वर्ष काहीच रिटर्न देत नाही. आणि त्यानंतर एका वर्षात खूप सारा रेटर्न देतो. आणि मागच्या वर्षाचा रिटर्न भरून काढतो. एखाद्या म्यूचुअल फंडच्या बाबतीत पण हेच होत. एखाद्या वर्षी म्यूचुअल फंड चांगला परफॉर्म नाही करत पण त्यानंतर चांगला रिटर्न देतो.

पण अशा वेळी त्या स्टॉकमध्ये किंवा म्यूचुअल फंडमध्ये टिकून राहणे हे फार कठीण असत.

आपल्या डोळ्यासमोर आपला स्टॉक पोर्टफोलियो किंवा म्यूचुअल फंड पोर्टफोलियो अगदी लाल झालेला बघून कोणाचाही विश्वास डगमगेल. पण आपल्यापैकी काही असे असतील जे अशा परिस्थितीत पण टिकून राहतील.

आणि म्हणून येणाऱ्या काही वर्षात खरी वेल्थ तेच बनवणार आहेत.

संयम हे अस स्किल आहे ना, जे डेवलप करणे फार कठीण आहे.

इथे GF ने वेळेवर रीप्लाय नाही दिला की चिडचिड करणारे आम्ही. कसा काय हा संयम विकसित करणार? (आणि हो मी आता GF चा रीप्लाय लगेच नाही आला की चिडचिड करत नाही, माझ्यामध्ये आता खूप संयम आहे.) आणि याचा फायदा आता मला माझ्या Investing च्या प्रवासात नक्कीच होत आहे.

शेअर मार्केटमधून वेल्थ बनविण्याचा प्रवास हा खूप कठीण असला तरी खूप Rewarding पण आहे.

मार्केट वर गेल किंवा खाली आल, तुम्हाला तुमच्या emotions वर कंट्रोल ठेवता आला पाहिजे. जस आपण या पोस्टच्या सुरुवातीला बोललो की लाइफमध्ये चांगल्या गोष्टी कधीच सहज मिळत नाही आणि हे एक फॅक्ट आहे.

वेल्थसुद्धा त्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.

माझा ठाम विश्वास आहे की येणारे 10-20 वर्षे ही भारताच्या ग्रोथची बेस्ट वर्षे असतील. पैसे इन्वेस्ट करा. संयम बाळगा. तुम्हाला वेल्थ बनविण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

शेअर करा टॅग करा 🚀

बस एक छोटी हेल्प करा, ही पोस्ट तुमच्या इन्वेस्टर मित्रांसोबत शेअर करा पोस्टला प्लीज शेअर करा. तुमच्या Insta स्टोरीवर ठेवून @marathifinance ला टॅग करा. आम्ही पेजवर स्टोरी नक्कीच शेअर करू. Thank You in Advance! 🙏

इतर पोस्ट वाचा👉 2024 साठी 10 पर्सनल फायनान्स टिप्स

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

11 thoughts on “वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? | How to Make Money in Share Market?”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi