SEBI – INVESTOR EDUCATION EXAMINATION: सेबी इन्वेस्टर एड्युकेशन एक्झॅम? कशी करायची तयारी?

 SEBI – INVESTOR EDUCATION EXAMINATION: सेबी इन्वेस्टर एड्युकेशन एक्झॅम? कशी करायची तयारी?: सेबीने गुंतवणूकदार शिक्षण परीक्षा (SEBI Investor Certification Examination) ही परीक्षा खासकरून आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी सुरू केली आहे. या परीक्षाचा उद्देश हा आहे की प्रत्येक गुंतवणूकदाराला आर्थिक नियोजन (Financial Planning) आणि गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टींची माहिती करून देणे. त्यामुळे ते त्यांच्या पैशाचे योग्य नियोजन करू शकतील आणि चांगले आर्थिक निर्णय घेऊ शकतील.

या परीक्षेचा तुम्हाला काय फायदा होईल?

 • आर्थिक नियोजन: तुम्हाला तुमचे आर्थिक ध्येय निश्चित करण्यास आणि त्यासाठी योग्य योजना बनवण्यास मदत होईल.
 • गुंतवणुकीची मूलभूत माहिती: तुम्हाला शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा, PPF आणि इतर आर्थिक उत्पादनांबद्दल माहिती मिळेल.
 • सुज्ञ निर्णय: तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य निवड करू शकाल आणि तुमच्या पैशाचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकाल.
 • आर्थिक सुरक्षितता: तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळवण्यास मदत होईल.
नवीन अपडेटसाठी जॉइन टेलीग्राम चॅनल (आजच) 👉 @marathifinance

 SEBI – Investor Education Examination बद्दल बेसिक माहिती: 

 • ही एक्झॅम फ्री आहे, कोणतीच फी नाही
 • एक्झॅम 50 मार्कची असते (पास व्हायला 25 मार्क्स हवेत)
 • एक्झॅममधील प्रश्न MCQ पद्धतीचे असतात
 • एक्झॅमसाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ मिळतो
 • ही एक्झॅम ऑनलाइन होते (एक्झॅमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड एक दिवस आधी ईमेलवर येतात)
 • एक्झॅम झाली की रिजल्ट लगेच दिसतो
 • एक्झॅमच सर्टिफिकेट तुम्हाला दोन दिवसांनी मिळेल (सॉफ्ट कॉपी ईमेलवर)
 • जर तुम्ही ही एक्झॅममध्ये फेल झालात तर पुन्हा 6 महिन्यांनी पुन्हा ट्राय करू शकता (पण मला अस वाटत फेल होण्याइतकी ही एक्झॅम कठीण नाही, तुम्ही पास होणार)
SEBI - Investor Education Examination
SEBI – Investor Education Examination

SEBI – Investor Education Examination साठी रजिस्ट्रेशन कस करायचं? 

 • NISM (National Institute of Securities Markets) वेबसाइटला भेट द्या  👉 लिंक 
 • सगळ्यात आधी तुमच प्रोफाइल बनवा आणि रजिस्ट्रेशन करा (PAN, आधार कार्ड, तुमचा फोटो लागेल) 👉 लिंक
 • एकदा का प्रोफाइल बनवल की ते अप्रूव व्हायला 2-3 दिवस लागतील.
 • एकदा प्रोफाइल अप्रूव झाल की तुम्हाला ईमेलवर लॉग इनसाठी ID आणि पासवर्ड दिला जाईल, मग तुम्ही एक्झॅमसाठी अप्लाय करू शकता.
 • एक्झॅमला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हवी ती तारीख आणि वेळ निवडा. एक्झॅम ऑनलाइन होईल.
 • एक्झॅमच स्टडी मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये दिल जात (PDF फॉरमॅट मध्ये) 👉  लिंक 
SEBI Investor Education Certification Exam in Marathi
SEBI Investor Education Certification Exam in Marathi

SEBI – Investor Education Examination मी दिली पाहिजे का? असा प्रश्न मनात आहे? 

तुम्ही गुंतवणुकीत नवीन असाल आणि तुमच्या आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टींबद्दल माहिती हवी असल्यास, SEBI Investor Certification Examination नक्की द्या. ही एक सोपी एक्झॅम आहे जी कोणीही देऊ शकतो. कॉलेजमध्ये तुम्ही कॉमर्सची स्टडी केली असल्यास तुम्हाला ही एक्झॅम अधिक सोपी वाटेल. मी तुम्हाला SEBI Investor Certification Examination देण्याचा आणि तुमच्या आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा मी सल्ला देईन.

इतर पोस्ट वाचा 👉Career in Share Market: शेअर मार्केटमध्ये कोणते करियर ऑप्शन आहेत?

Leave a Comment