EPACK Durable IPO: 2024 मधील दूसरा आयपीओ म्हणजेच EPACK Durable IPO मार्केटमध्ये येण्यास सज्ज आहे. तुम्ही सुद्धा तुमचे पैसे आणि 2-3 Demat अकाऊंट तयार ठेवा. त्याशिवाय आजकाल काही आयपीओ लागत नाही. पण अप्लाय करण्याआधी या आयपीओची माहिती नक्की वाचा.
EPACK Durable IPO Details
इपॅक ड्यूरेबल आयपीओ 19 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होणार आहे आणि 23 जानेवारी 2024 रोजी बंद होईल. इपॅक ड्यूरेबल आयपीओची इश्यू साइज ₹640 करोड रुपये आहे. आयपीओचा प्राईस बॅंड ₹218 – ₹230 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.
या आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 65 शेअर घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,950 एवढी होते. इपॅक ड्यूरेबल आईपीओची अलॉटमेंट तारीख 24 जानेवारी 2024 असेल आणि आयपीओची लिस्टिंग 29 जानेवारी 2024 ही ठरविण्यात आली आहे.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
EPACK Durable IPO Company Details
F&S Report च्या रीपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2020 आणि 2023 मध्ये इपॅक ड्यूरेबल कंपनी, रूम एसीसाठी Original Design Manufacturer (ODM) म्हणून काम करणारी भारतातील सगळ्यात वेगाने वाढणारी कंपनी आहे.
भारतामध्ये एसी मार्केटच्या हिशोबाने Original Design Manufacturer (ODM) म्हणून इपॅक ड्यूरेबल दुसऱ्या नंबरची मोठी कंपनी आहे आणि भारतीय मार्केटमध्ये या कंपनीकडे 29% मार्केट शेअर आहे.
EPACK Durable IPO Funds
या आयपीओमधून जमा केलेला पैसा कंपनी पुढील गोष्टींसाठी वापरेल. 1) नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभी करून बिझनेस वाढवण्यासाठी 2) कंपनीवर एखाद कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी 3) इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा आयपीओचा पैसा वापरला जाईल.
EPACK Durable IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | January 18, 2024 |
IPO Open Date: | January 19, 2024 |
IPO Close Date: | January 23, 2024 |
Basis of Allotment: | January 24, 2024 |
Refunds: | January 25, 2024 |
Credit to Demat Account: | January 25, 2024 |
IPO Listing Date: | January 29, 2024 |
EPACK Durable Company Financial Report (सगळ्या वॅल्यू करोडमध्ये)
Year | Revenue | Expense | PAT |
---|---|---|---|
2020 | ₹739.65 | ₹728.78 | ₹7.80 |
2021 | ₹927.34 | ₹901.03 | ₹17.43 |
2022 | ₹1540.25 | ₹1493.84 | ₹31.97 |
3 thoughts on “EPACK Durable IPO: आयपीओसाठी अप्लाय करताय? आधी हे वाचा”