Think and Grow Rich in Marathi: बँक अकाऊंटमध्ये पैसे येतील पण त्या आधी हे करा!

5/5 - (1 vote)

Think and Grow Rich हे पर्सनल फायनॅन्सवर लिहिलेल्या बुक्सपैकी एक बेस्ट बूक आहे. या बूकच्या चॅप्टर नंबर 1 “Desire” मध्ये तुम्ही पैसे किती आणि कसे कमवू शकता यासाठी एक फॉर्म्युला दिला आहे. पण तो फॉर्म्युला समजून घेण्याआधी एक छोटी स्टोरी सांगतो.

जीम कॅरि हे एक Actor/ कमेडियन आहेत. ते कॅनडामधील एका गरीब फॅमिलीमधून येतात. 1990 मध्ये त्यांनी एक विचित्र गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी स्वतलाच 10 मिलियन डॉलरचा चेक लिहिला की “मी जे Acting सर्विस देत आहेत त्यासाठी मला हे पैसे मिळत आहेत”. त्यावर त्यांनी 1995 या वर्षाची एक ठराविक तारीख टाकली. आणि तो चेक त्यांनी  त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवला. (10 मिलियन डॉलर म्हणजे आजच्या तारखेला 83 करोड 19 लाख होतात.)

नशीब म्हणा की चमत्कार, त्यांनी जी तारीख ठरवली होती त्याआधीच त्यांना एक मूवी “Dumb & Dumber” साठी 10 मिलियन डॉलरचा चेक मिळाला. आता काहींना वाटेल की अस थोडी ना होत. हा फक्त एक योगायोग असेल.

पण असा विचार तुमच्या मनात येण्याआधी Think and Grow Rich या बूकचे लेखक नपोलियन हिल काय म्हणतात ते सांगतो.

Only those who become “money conscious” ever accumulate great riches. “Money consciousness” means that the mind has become so thoroughly saturated with the desire for money, that one can see oneself already in possession of it.”

याचा अर्थ असा की जे लोक Money Conscious बनतात तेच मोठा पैसा कमवितात. आता हे Money Conscious बनणे म्हणजे नक्की काय? Money Conscious म्हणजे तुमच्या माइंडमध्ये पैसे कमवायची तीव्र इच्छा आहे. श्रीमंत होण्याच्या विचारांनी तुमच माइंड भरल आहे. तुमचा ठाम विश्वास आहे की तुम्ही तुम्हाला हवे तितके पैसे कमविले आहेत. 

जरा विचार करा. जे लोक श्रीमंत होतात त्यांनी कधी ना कधी विचार केला असेल ना की मला श्रीमंत व्हायच आहे. प्रत्येक जण पैसे कमवायचे स्वप्न बघतो, मनात पैसे कमवायची तीव्र इच्छा बाळगतो आणि त्यानंतर महत्वाची पाऊल म्हणजे या सगळ्यासाठी योग्य प्लॅनिंग करतो.

नुसता विचार करून काही होत नाही हे खर आहे पण सुरुवात विचारांनीच होते आणि त्यानंतर त्या विचारांवर Action घेतले की मग पैसे कमविता येतात आणि चांगली वेल्थ बनविता येते. 

यासाठी नेपोलियन हिल यांनी Think and Grow Rich या बूकमध्ये एक फॉर्म्युला दिला आहे आणि तो खालीलप्रमाणे

  • स्टेप 1:  तुम्हाला किती पैसे कमवायचे आहे हे ठरवा. नुसत मला एवढे पैसे तेवढे पैसे हवेत अस बोलून चालायच नाहीये. तुम्हाला एक ठराविक रक्कम (Exact Ammount) ठरवायची आहे.
  • स्टेप 2: आता तुम्ही हे पैसे कमविण्यासाठी काय करू शकता, काय मेहनत घेऊ शकता ते ठरवा. (काहीच न करता काहीच मिळत नाही)
  • स्टेप 3: आता हे पैसे नक्की कधी हवे आहेत यासाठी एक तारीख ठरवा. (एक पक्की तारीख महत्वाची आहे)
  • स्टेप 4: आता एका पेपरवर किंवा  नोटपॅडवर स्पष्ट लिहा की तुम्हाला किती पैसे हवे आहेत, कोणत्या तारखेला हवे आहेत आणि सगळ्यात महत्वाच या संगळ्यासाठी तुम्ही काय मेहनत घेणार आहात. असा एक प्लान बनवा.
  • स्टेप 5: आता दिवसातून कमीत कमी 2 वेळा हे लिहिलेल तुम्हाला वाचायच आहे आणि Visualize करायचं आहे, तेही अगदी पूर्ण विश्वासाने की तुम्ही हे पैसे कमविले आहेत.

आता काहीना वाटेल की हा काय बालिशपणा आहे. पण जरा विचार करा ही फक्त एक आयडिया आहे. आणि आयडिया ट्राय करून बघायला काय बिघडत. आपले कुठे पैसे जाणार आहेत. लेखक नेपोलियन हिल यांनी 500 पेक्षा जास्त श्रीमंत लोकांवर स्टडीकरून हे बूक लिहिल आहे. मग यात काहीतरी पॉइंट असेलच ना. बँक अकाऊंटमध्ये पैसे येण्याआधी ते तुमच्या माइंडमध्ये आले पाहिजेत.

इतर पोस्ट वाचा: वेल्थ बनविण्याचा मार्ग स्पष्ट आहे पण कठीण आहे? 
मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

1 thought on “Think and Grow Rich in Marathi: बँक अकाऊंटमध्ये पैसे येतील पण त्या आधी हे करा!”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi