SAVE MONEY: पैशाची बचत होतच नाहीये? मग हे करून बघा

How To Save Money with Income & Expense Tracking in Marathi: महिन्याचे 30 दिवस काम केल. एक दिवशी सॅलरी क्रेडिट झाली असा मेसेज आला. तो आनंद काही वेगळाच. पण पुढच्या दिवशीच अरे इथे पैसे गेले, तिथे पैसे गेले सुरू. EMI, मुलाच्या शाळेची फी, बिल, इतर खर्च. लिस्ट न थांबणारी आहे. ही कहाणी प्रत्येक व्यक्तीची असते.

पण तुमची इन्कम आणि खर्च ट्रॅक करणे हे तुमच्या पैशावर कंट्रोल ठेवण्यासाठी एक महत्वाची स्टेप आहे. तुम्हाला माहीत असल पाहिजे की तुमच्याकडे किती पैसे येत आहेत आणि की पैसे जात आहेत. आणि सगळ्यात महत्वाच कुठे जात आहेत. आता हे कस करायच? हेच तुमची आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहात. चला तर सुरुवात करू.

1. तुमची पैसे ट्रक करण्याची पद्धत निवडा

पेन आणि पेपर: जुनी पण टिकावू पद्धत. एक साधी वही घ्या. दोन भाग करा. एकीकडे खर्च आणि एकीकडे इन्कम. झाल काम. (पण आपण 2024 मध्ये जगतोय? हे खूपच ओल्ड फॅशन झाल नाही का?)

Spreadsheet: मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा गूगल शीट वापरता येत असतील. तर त्याचा वापर करून तुम्ही तुमचे खर्च आणि इन्कम ट्रॅक करू शकता. (एक प्रॉब्लेम आहे. यासाठी तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप असायला हवा. त्यावर जरा सोप होवून जात काम)

Budgeting apps: गूगल प्ले स्टोरवर तुम्हाला भरपूर budgeting apps मिळतील ज्याचा वापर करून तुम्ही खर्च ट्रॅक करू शकता. मी सुद्धा आधी काही Apps वापरले आहेत पण काही वेळ नंतर टेक Upgrade करा, premium घ्या सुरू घ्या सुरू होत म्हणून सोडून दिल. (आता यावर उपाय काय?)

Finance Tracker PRO: एक सिम्पल Notion App वर बनवलेली ट्रॅकिंग सिस्टम. काही Upgrade नाही. Premium नाही. सिम्पल सिस्टम जी तुमचे खर्च आणि इन्कम ट्रॅक करेल. महिन्याच्या शेवटी तुम्हाला समजेल की किती पैसे उरले आहेत आणि किती खर्च झाले. (Finance Tracker PRO – Marathi Finance)

2.तुमच्या इन्कमला ट्रॅक करा. 

महिन्याच्या 1 तारखेला खिशात किती पैसे आहेत. सॅलरी किती आली. दुसर बँक अकाऊंट असेल तर त्यामध्ये किती आहेत ते लिहा. साइड इन्कम काही आहे तर ती लिहा. सगळी इन्कम एका ठिकाणी.

ट्रॅक करताना तारीख आणि रक्कम हे सगळ add करा.

3.तुमचे खर्च ट्रॅक करा (नक्की पैसे जातात कुठे) 

विविध कॅटेगरी बनवा. रेंट, घर खर्च, मोबाइल रीचार्ज, ट्रॅवल, शॉपिंग,  काही EMI असतील तर ते add करा.

प्रत्येक खर्च ट्रक करा. छोटा मोठा ते बघू नका. त्यासोबत रक्कम, तारीख, कॅटेगरी इ Add करा.

4. हे काम नियमितपणे करा. (एकदा दोनदा करून काही उपयोग नाही होणार) 

एक रुटीन बनवा. दिवसाचे खर्च त्याच दिवशी ट्रक करा. एक खर्च ट्रक करायला जास्त वेळ नाही लागत जर तुम्ही मोबाइल मध्ये करत आहात. (मी तर Finance Tracker PRO वापरतो, एक खर्च लिहायला 7-10 सेकंद जास्तीत जास्त लागतात.)

एकदा का सवय झाली नाही की तुम्ही आपोआप कराल. पण सुरुवातीला थोड मोटिवेशन लागेल.

5. सगळ्यात महत्वाची स्टेप: Analyse & Adjust 

महिन्याच्या शेवटी एकदा बघा की पैसे नक्की कुठे खर्च होत आहेत. तिथे खर्च कमी करता येत असतील तर बघा. जेव्हा तुम्ही 2-3 महीने सलग पैसे ट्रॅक कराल तेव्हा तुमच्या खर्च करण्यामध्ये एक पॅटर्न दिसेल. जास्त पैसे कुठे जात आहेत ते समजतील. त्यानुसार बदल करून तुम्ही पैसे वाचवू शकता.

हे काम तुम्ही जेव्हा असंच चालू ठेवाल, तुम्हाला त्यानुसार तुमचे Financial पलांनीनग करता येईल. कारण तुम्हाला आता माहीत आहे की महिन्याला किती खर्च होतो. कूठच्या महिन्यात खर्च जास्त होतो तर कोणत्या महिन्यात कमी.

काही हेल्पफुल टिप्स जी तुमची या कामात नक्की हेल्प करतील 

वास्तववादी उद्दिष्टे सेट करा: सर्व खर्च अगदी पहिल्या महिन्यात काढून टाकण्याचे उद्दिष्ट ठेवू नका. लहान, साध्य करण्यायोग्य ध्येयांसह सुरवात करा.

तुमच्या बजेटला नियमितपणे रिव्यू करा: अस नाही की तुमचे खर्च आणि इन्कम तेवढीच राहणार आहे. जशी इन्कम वाढेल, जसे खर्च वाढतील त्यानुसार तुमच्या प्लॅनिंगमध्ये बदल झाला पाहिजे.

स्वतःशी प्रामाणिक राहा: तुम्ही तुमची इन्कम आणि खर्च प्रामाणिकपणे रेकॉर्ड केल्यावरच  ट्रॅकिंग प्रभावी ठरते. उगाच नको ती इन्कम नको. उगाच खर्च कमी दाखवण्यासाठी कमी खर्च लिहिणे नको. जे आहे ते खर खर. याचा फायदा तुम्हालाच होईल.

Keep Tracking, Keep Saving (& Investing)

तुमच्या इन्कमचा आणि खर्चाचा सातत्याने मागोवा ठेवल्याने, तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी मिळते, ज्यामुळे तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेता येतात आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतात.

त्यामुळे फायनॅन्स ट्रॅक करायला सुरुवात करा तेही आजच. 2024 मध्ये ही एक चांगली सवय विकसित करा.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Power of Compounding: तुमच्या श्रीमंतीची गुरुकिल्ली? का आणि कस? (marathifinance.net)

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?