About Author

नमस्कार मित्रांनो!

मी साजन भुवड (Founder & Author at www.marathifinance.net)

मी एक उत्साही पुस्तकप्रेमी आणि फायनॅन्स क्षेत्राचा अभ्यासक आहे. मी सध्या मुंबईत राहतो आणि दिवसभरात बँकर म्हणून काम करतो. माझ्या मराठी भाषेतील ब्लॉग आणि सोशल मीडिया पेजद्वारे, मी मराठी भाषिक लोकांना आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीबाबत सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

माझ शिक्षण आणि आवड:

मी माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केलं. ग्रॅजुएशनसाठी मी मुंबईत आलो आणि पाटकर वर्दे कॉलेज, गोरेगाव (पश्चिम) येथे 2021 मध्ये माझ ग्रॅजुएशन पूर्ण केल.

मला लहानपणापासूनच वाचण्याची आवड होती आणि हायस्कूल जवळील वाचनालयातून मला अनेक चांगली पुस्तके वाचायला मिळाली. मुंबईत आल्यावर मला विविध विषयांवरील पुस्तकं सहज उपलब्ध झाली आणि मी खास करून आर्थिक विषयांवर पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली.

@marathifinance चा जन्म:

वाचलेल्या माहितीचं काय करावं या विचारातून मी २०२1 साली @marathifinance नावाचं इंस्टाग्राम पेज सुरू केलं. या पेजवर मी आर्थिक विषयांवर मराठीत माहितीपूर्ण आणि मनोरंजक पोस्ट शेअर करतो. मला आनंद आहे की, आज या पेजला १८ हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

www.marathifinance.net या ब्लॉगची निर्मिती:

स्वतःचा एक हक्काच प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे याची मला जाणीव होती आणि म्हणूनच मी www.marathifinance. net हा ब्लॉग सुरू केला. या ब्लॉगचं ध्येय म्हणजे मराठी भाषिक लोकांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक आणि पैशाचं व्यवस्थापन यासारख्या विषयांवर सोप्या आणि समजण्यास सोप्या भाषेत माहिती देणं.

मला विश्वास आहे की, आर्थिक शिक्षण हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे आणि माझ्या ब्लॉगद्वारे मी लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत करू शकेन.

माझे सर्टिफिकेशन्स: 

मी नुकतीच SEBI Investor Certification Examination पास झालो आहे. आणि मी इतर NISM एक्झॅमची तयारी करत आहे.

SEBI Investor Certification Exam

तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट कसे करू शकता:

  • तुम्ही मला @sajanbhuvd या इंस्टाग्राम हँडलवर फॉलो करू शकता.
  • तुम्ही मला marathifinance247@gmail. com या ईमेलवर देखील संपर्क साधू शकता.

धन्यवाद! 🙏

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi