How to Become Rich: श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत)

How to Become Rich with the 5 Habits of Wealthy Individuals: काय तुम्ही कमवा आणि खर्च करा, कमवा आणि खर्च करा या चक्रामध्ये अडकला आहात? काय तुम्हाला Financial Security हवीय? काय तुम्ही स्वतासाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी चांगली वेल्थ बनविण्याच स्वप्न बघत आहात?

जर उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे ती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवणे शक्य आहे पण यासाठी तुम्हाला तुमचा Mindset बदलावा लागेल तसेच नियमित योग्य कामे करावी लागतील. 

या ब्लॉग पोस्टमध्ये आपण श्रीमंत व्यक्तींच्या 7 सवयी जाणून घेणार आहोत. या सवयीना विकसित करून तुम्ही पुढील 10-15 वर्षात तुमच आर्थिक भविष्य  उजवळ करू शकता. चला तर जाणून घेऊ या सवयी नक्की काय आहेत.

 1) मालक बनायला प्राधान्य द्या. 

मालक बनणे हा श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. पण मालक बनायच कस? तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे मालक बनता. तुमच्याकडे जितके स्टॉक्स असणार तेवढे तुम्ही त्या कंपनीचे मालक. अगदी तसंच म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट केल की तुम्हाला त्याचे Units मिळतात, त्यामधून पण तुमच्याकडे एक प्रकारचा मालकी हक्क येतो. 

नोकरी आज आहे उद्या नाही. नोकरी नाही तर सॅलरी नाही. सुरुवात करताना सॅलरीमधून पैसे कमवायचे आहेत पण जास्तीत जास्त रक्कम तुम्ही चांगले बिझनेस, स्टॉक्स, म्यूचुअल फंड, इंडेक्स फंड, तुमच एखादा Side Hustle जिथून फ्युचरमध्ये इन्कम येईल इ. मध्ये इन्वेस्ट करायचे आहेत.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉How to Become Rich: श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला या 4 पैकी 1 गोष्ट हवीय! (जाणून घ्या)

2) आर्थिक शिक्षण घ्याव लागेल.

श्रीमंत होण्यासाठी आर्थिक साक्षरता ही हवीच, त्याशिवाय काही होऊच शकत नाही. म्हणून पूर्वअट आहे. त्यामुळे आर्थिक बाबींबद्दल स्वतःला शिक्षित करा.  तुम्ही एकल असेल काही वर्षांतच खेळाडू आणि लॉटरी विजेते जस की KBC वाले त्यांचे पैसे  गमावतात.

बरेच लोक पैसे कमवू शकतात, परंतु आर्थिक साक्षरतेच्या कमतरतेमुळे काही मोजकेच पैसे टिकवू  शकतात.  आता आर्थिक शिक्षण कुठे मिळणार? आता हे काय सांगितल पाहिजे. ब्लॉग्स आहेत, यूट्यूब आहे, बुक्स आहेत इ. काहीतरी एक माध्यम निवडा आणि सुरुवात करा. (तुम्ही एक माध्यम तर आधीच निवडल आहे अस मी समजतो कारण तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात)

 3) खर्चावर कंट्रोल करा. 

श्रीमंत व्यक्ती त्यांच्या खर्चाबाबत खूप जागरूक असतात. लक्षात घ्या, प्रत्येक रुपया जो तुम्ही मेहनत घेऊन कमविता तो व्यर्थ गेला नाही पाहिजे याची जाणीव तुम्हाला असायला हवी.

जे लोक पैसे टिकून ठेवण्यात स्मार्ट असतात ते नवीन  येणाऱ्या गोष्टींवर पैसे खर्च करत नाहीत जस की आयफोन, गाडी, इतर वस्तु. श्रीमंत लोक त्यांचे पैसे लॉन्ग टर्ममध्ये मिळणाऱ्या अनुभवावर खर्च करतात जस की बुक्स, कोर्स, फॅमिलीसोबत टाइम इ.

 4) इतरांना इम्प्रेस करायचं सोडून द्या.

श्रीमंत लोक इतरांना इम्प्रेस करायच्या भानगडीत अजिबात पडत नाहीत. आणि जे लोक सोशल मीडियावर श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यापैकी जास्त लोक बस दीखावे करत असतात. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सोशल मीडियावर प्रत्येकाची लाइफ अगदी परफेक्ट असते. कसल टेंशन नाही काम नाही. बस एंजॉय आणि आराम चालू असतो.

पण तुम्ही जर अशा गोष्टी करत असाल, महागड्या गाड्या, कपडे आणि मोबाइल फोन इ . घेऊन इतरांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आयुष्यभर जरी अस करत राहिलात तरी आयुष्य कमी पडेल. पण सगळी लोक काय इम्प्रेस होणार नाहीत.

 त्यामुळे उगाचच नको त्या गोष्टीवर खर्च कमी करणे टाळा. त्यापेक्षा तुम्ही चांगले Assets एकत्र करण्यावर फोकस करा जे भविष्यात तुम्हाला इन्कम करून देतील.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉How to Become Rich: श्रीमंत व्हायच आहे तर लोक काय बोलतील याकडे दुर्लक्ष करा (marathifinance.net)

5) मित्र परिवार चांगल्या Mindset चे बघा. 

आता मी पण समजू शकतो की मैत्री करण्याआधी त्या व्यक्तीचा Mindset काया आहे अस विचारू शकत नाही किंवा ओळखू शकत नाही. पण जसा थोडा वेळ जातो, तुम्ही एखाद्याला ओळखायला लागता तेव्हा त्यांचा Mindset काय आहे पहिल समजून घ्या. ते म्हणतात संगतीचा खूप परिणाम आपल्यावर होत असतो.

श्रीमंत व्यक्ती जे लोक त्यांना Motivate करतात, जे त्यांना Inspire करतात अशा व्यक्तीसोबत राहणे पसंद करतात. तुमचे पण मित्र असतील. तर ते कोणत्या टॉपिकवर नेहमी चर्चा करतात. काय ते बिझनेस, इन्कम, इन्वेस्टमेंट इ, बद्दल चर्चा करतात. की भावा तिचा Insta ID दे, हिचा नंबर दे, इकडे प्यायला बसू आणि तिकडे प्यायला बसू.

 आता तुम्हाला कोणत्या लोकांसोबत राहायची गरज आहे, हे समजण्यासाठी तुम्ही हुशार आहात.

 तर मुद्दा असा आहे की…

जर तुम्ही आतापासून तुम्ही या चांगल्या सवयीवर फोकस केलत तर पुढील  10-15 वर्षात तुमची आर्थिक स्थिति मोठ्या प्रमाणात बदलेली असेल. आणि याची पूर्ण जबाबदारी तुमची असेल. सध्या तुम्ही एक सॅलरी कमविणारा व्यक्ती आहात पण योग्यरित्या पैसे इन्वेस्ट करून, चांगले स्टॉक्स, म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करून लॉन्ग टर्म वेल्थ बनवू शकता. 

Keep Earning & Keep Investing!

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

1 thought on “How to Become Rich: श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत)”

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?