How to Become Rich: श्रीमंत कसे व्हावे? (प्रत्यक्षात श्रीमंत होण्याचा प्रयत्न न करता)

How to Become Rich in Marathi (Without Actually Trying to Be Rich): तुम्ही कधी महागडी गाडी किंवा कपडे अशा फॅन्सी गोष्टिनी भरलेल्या जीवनाचे स्वप्न पाहता का, पण कठोर परिश्रम आणि पैसे वाचवण्याचा विचार (जसे की बजेट करणे किंवा पैसे इन्वेस्ट करणे) तुम्हाला अस्वस्थ करते?

सत्य परिस्थिति ही आहे की जर तुम्हाला फक्त फॅन्सी  गोष्टी हव्या असतील तर तुम्ही कदाचित अशा गोष्टीचा पाठलाग करत आहात ज्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांना टिकून ठेवणे फारच कठीण आहे. हे म्हणजे कोणत्याही प्रकारचा नकाशा न घेता डोंगरावर चढण्यासारखे आहे!

फक्त अंतिम परिणाम किंवा रिजल्ट निश्चित करणे, मग ते मोठे बँक अकाऊंट असो किंवा कुठेही फिरायच स्वातंत्र्य असो. तुम्ही फक्त रिजल्टवर फोकस केलात तर कदाचित तुम्हाला Disappoint व्हाव लागेल. कारण कोणत्याही प्रवासात अंतिम रिजल्टपेक्षा त्या रिजल्टपर्यन्त तुम्ही कसे पोचलात हे अधिक महत्वाच आहे.

आता ते कस काय? हेच आपण आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरवात करूया.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

1. The “Someday” Trap: जेव्हा तुमच ध्येय एखाद्या ठराविक दिवसांवर अवलंबून असत तेव्हा तुम्ही Someday Trap मध्ये अडकून राहता.  उदाहरण: ज्या दिवशी  माझ्याकडे एवढे पैसे येतील तेव्हा मी खुश होईन. पण अस केल्याने तुमचा प्रत्येक दिवस एक Waiting Period बनून राहतो. पण जेव्हा तुम्ही प्रोसेसवर फोकस करता तेव्हा तुमच प्रत्येक पाऊल हे छोट्या Victory सारख आहे जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्यास Motivate करत. 

2. Enjoy the Ride: कल्पना करून बघा. तुम्ही एका रोड ट्रीपवर निघाला आहात, पण तिथे पोहचेपर्यन्त तुम्ही अगदी थकून गेलात. तर तिथे पोचण्याचा काय फायदा. श्रीमंत होण्याच पण असंच आहे. जर तुम्ही दररोज केली जाणारी कामे जस की पैसे कमविणे, इन्वेस्ट करणे, फायनॅन्सबद्दल शिकणे इ. एंजॉय नाही केलात तर आर्थिक स्वातंत्र्य या तुमच्या ध्येयापर्यन्त पोचण्याचा काय फायदा. कारण श्रीमंत होणे ही एक प्रोसेस आहे. आणि श्रीमंत बनण्याचा प्रवासात आनंदी राहायला शिका.

3. श्रीमंत होण्याच्या प्रवासात चुका तर होणार: आपण सगळे हे मान्य करू की जेव्हा तुम्ही चुकता याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न तरी करत आहात. जो व्यक्ती काही प्रयत्न करतच नाही त्याच्याकडून चुका होणार नाहीत. श्रीमंत होण्याच्या प्रोसेसमध्ये काही चुका होतील जस की चुकीचा स्टॉक विकत घेणे किंवा म्यूचुअल फंड, नको त्या वस्तूंसाठी कर्ज घेणे, खूप क्रेडिट कार्ड वापरणे इ. या चुकांमधून शिका आणि पुढे चालत रहा.

4. Sustainability गरजेची आहे: कल्पना करा की चालू महिन्यात तुम्ही खूप सारे पैसे इन्वेस्ट केलेत, सगळे खर्च नीट ट्रॅक केलेत किंवा सगळी बिल योग्य वेळेवर भरलीत. पण पुढच्या महिन्यात येरे माझ्या मागल्या. काही इन्वेस्टमेंट नाही, कोणताही खर्च ट्रॅक करणे नाही की योग्य वेळी काही बिल भरणे नाही. तर अस करून तुम्ही श्रीमंत होण्याच्या मार्गामध्ये मोठा अडथळा निर्माण करत आहात. कारण श्रीमंत होणे ही एक लॉन्ग टर्म प्रोसेस आहे ज्यामध्ये  तुम्हाला टिकून राहायच आहे तेही जास्तीत जस टाइमसाठी. 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 कमी सॅलरीमधून श्रीमंत कस बनायच? | How to Become Rich with Low Salary 

 तर आता मुद्दा असा की हे सगळ तुम्ही करणार कस? 
  • छोट यश का होईना साजरा करा: तुम्हाला 1 करोंडचा पोर्टफोलियो बनवायचा आहे पण या वर्षी तुम्ही 1 लाखाचा पोर्टफोलियो बनविला आहे. आता तुमच्यासाठी ही छोटी का होईना पण खूप महत्वाची Victory आहे. तर त्याला एंजॉय करा. (स्वताला एखाद गिफ्ट द्या. एखाद बूक घ्या, तुम्हाला आवडेल ते करा पण हो यात खूप सारा खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या.) 
  • मेहनत करण्यात पण मज्जा आहे: कोणतेही काम असो सतत तुम्हाला नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. जस की पैसा कमविणे. यासाठी सतत तुम्हाला शेअर मार्केट, म्यूचुअल फंड, आर्थिक बदल इ, बद्दल जागरूक रहाव लागेल. आणि ही एक प्रकारची मेहनतच आहे. या मेहनतीमध्ये आनंद शोधा. 
  •  Financial buddy शोधा: Financial Buddy म्हणजे असे मित्र जे तुम्हाला आर्थिक प्रवासात Motivate करतील. जस की @marathifinance या Instagram पेजवर माझे 18,000 फॉलोवर आहेत ज्यांच्यासोबत मी हे नॉलेज शेअर करत असतो. तसेच ते सुद्धा त्यांचे अनुभव शेअर करतात.  अस केल्याने हा प्रवास सोपा वाटू लागतो. तुमचे खूप सारे मित्र किंवा फॉलोवर नसले तरी चालतील पण 1-2 असे मित्र हवेत जे तुमच्यासोबत इन्वेस्ट करतील, पैसा या विषयावर तुमच्यासोबत चर्चा करतील तसेच ज्यांचा पैसे कमविण्याचा Mindset असेल. 

नेहमी लक्षात ठेवा की Financial Freedom चा हा प्रवास एक Adventure आहे. फक्त एक ठराविक ठिकाण नाही. त्यामुळे या प्रवासाला एंजॉय करायला आपल्याला शिकाव लागेल.कोणत्याही प्रवासात अंतिम रिजल्टपेक्षा त्या रिजल्टपर्यन्त तुम्ही कसे पोचलात हे अधिक महत्वाच आहे. आता तुमच अंतिम रिजल्ट  आर्थिक स्वातंत्र्य हे आहे पण त्या पर्यन्त पोचण्याची प्रोसेस म्हणजे पैसे कमविणे, पैसे वाचविणे आणि नीट इन्वेस्ट करणे होय. 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुम्ही PASSIVE INCOME कशी बनवाल? (marathifinance.net)

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?