9 स्टेप्समध्ये तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग करा! (Retirement Planning in Marathi)

Rate this post

या ब्लॉग पोस्टमध्ये तुम्ही तुमची Retirement Planning कशी कराल ही शिकणार आहात तेही 9 सिम्पल स्टेप्समध्ये.

आता सगळ्यात महत्वाच म्हणजे रिटायरमेंट हे अस Financial Goal आहे ज्याला अजून वेळ आहे. आपण रिटायरमेंटसाठी पुढील 25 वर्षे घेणार आहोत. आपल्यापैकी खूप जण जॉब करणार आहेत. सगळेच बिझनेस करणार नाहीत. पण जॉब असो की बिझनेस रिटायरमेंटसाठी पुरेसा वेळ देणे गरजेच आहे.

जास्त टाइमपास न करता डायरेक्ट 9 स्टेप्स समजून घेऊयात.

स्टेप 1: तुमच Goal स्पष्ट ठेवा. 

आता तुमच Goal तर स्पष्ट आहे ते म्हणजे रिटायरमेंट. पण रिटायरमेंट नक्की कधी हे स्पष्ट असणे तेवढंच गरजेच आहे. रिटायरमेंट हे एक सिम्पल गोल वाटतो. आपल्याला वाटत की अजून खूप वेळ आहे. पण तुम्ही स्वता विचार करा 2023 गेल 2024 आल. एका मागोमाग एक वर्ष निघून जातात पण रिटायरमेंट प्लॅनिंग काय होत नाही.  म्हणून तुम्हाला ही चूक करायची नाहीये. आज आणि आताच सुरुवात करा.

स्टेप 2: महागाईला समजा (तुमचा मोठा शत्रू) 

भारतामध्ये महागाईचा रेट 6-7% आहे. पण जसे तुम्ही मोठे होणार, फॅमिली, जबाबदाऱ्या वाढणार तस खर्च पण वाढत जाणार आणि याचा विचार रिटायरमेंट प्लॅनिंग करताना सगळ्यात आधी केला पाहिजे. महागाई 6-7% असली तरीही आपण कॅलक्युलेशन करताना 7-8% घेणार आहोत. कारण पुढे जावून महागाई कमी होईल की जास्त तुम्हाला पण माहीत नाही. त्यामुळे तयारी करताना एक्स्ट्रा रेट घेऊनच करा.

स्टेप 3: रिटर्न किती हवाय?

दुसरी स्टेप स्पष्ट झाली की तिसरी स्टेप अगदी स्पष्ट होते की मला रिटायरमेंटसाठी किती रिटर्न हवाय? आता रिटर्न जितका जास्त मिळेल तेवढ चांगल आहे पण तुम्ही नको तेवढी रिस्क घेऊ नका. जर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण महागाई रेट 7% घेतला आहे तर 7% + 7% = 14% हा एक योग्य रिटायरमेंट पोर्टफोलियोचा रिटर्न आहे. या रिटर्नमध्ये आपण महागाईचा विचार आधीच केला आहे. (या पेक्षा जास्त रिटर्न मिळाला की मग दिवाळी समजा)

स्टेप 4: एवढा रिटर्न मिळणार कुठे? 

रिटर्न किती हवाय ते तुम्ही स्पष्ट केलत, आता हा रिटर्न मिळणार कुठे? बँक FD मध्ये मिळेल? शक्यच नाही? पब्लिक Provident फंड मध्ये मिळेल? जेवढा रिटर्न मिळेल तो सगळा महागाईमध्ये जाईल. आता एकच ऑप्शन असा आहे ना जो तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट रिटर्न देऊ शकतो तो म्हणजे इक्विटि किंवा शेअर मार्केट. सेंसेक्स आणि निफ्टिने Average 13-14% चा रिटर्न दिला आहे हे तुम्हाला माहीत असेलच.

स्टेप 6: रिटायरमेंटसाठी किती पैसे लागतील? 

त्यासाठी तुम्ही 4% रूलचा वापर करू शकता आणि त्यासाठी तुम्ही ही पोस्ट वाचा. या पोस्ट तुमचा रिटायरमेन्ट नंबर कसा शोधायचा यावर डीटेलमध्ये माहिती दिली आहे.  Financial Freedom: 4% रूलचा वापर करून लवकर रिटायर व्हा!

स्टेप 7: स्टॉक की म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करू? 

स्टेप 4 मध्ये तुम्हाला समजल की तुम्हाला रिटायरमेंटसाठी इक्विटिमध्ये पैसे इन्वेस्ट करायचे आहेत. आता तुम्हाला स्टॉक निवडता येत असतील तर चांगल आहे पण बहुतांश लोकांसाठी SIP बेस्ट ऑप्शन आहे. पण SIP नक्की कोणत्या फंडमध्ये करायची? मी स्वता इंडेक्स फंडमध्ये करतो पण तिथे रिटर्न काहीना कमी वाटतात.

मग यासाठी जे अगदी तरुण आहेत जस की 20 -25 वर्षाचे त्यांनी पहिली 10 वर्ष पैसे एका फलेक्सि कॅप फंड किंवा चांगल्या small कॅप फंडमध्ये करू शकता. जस जस रिटायरमेंट जवळ येईल तुम्हाला तिथून पैसे काढून इंडेक्स फंडमध्ये इन्वेस्ट करावे लागतील कारण तेव्हा रिस्क क्षमता कमी झाली असेल. (आणि हो सेक्टर फंडपासून दूरच रहा)

स्टेप 8: रिटायरमेंट पोर्टफोलियो रिव्यू 

Retirement Planning ही अशी गोष्ट नाही की एकदा केली आणि मोकळे झालात. तुम्ही ट्रॅक वर आहात की नाही हे तुम्हाला चेक करत रहाव लागणार. दर वर्षी मी किती इन्वेस्ट केले? किती रिटर्न मिळाला? किंवा माझा रिटायरमेंट नंबर तर वाढला नाहीये ना? कारण जेव्हा 20 वर्षाचे असाल तेव्हा खर्च कमी असतील पण एकदा लग्न झाल की खर्च वाढतील. या सगळ्याचा वेळोवेळी रिव्यू तुम्हाला करावा लागणार आहे.

स्टेप 9: तुम्हाला टिकून राहायच आहे. 

रिटायरमेंट खूप लांब आहे याची कल्पना तुम्हाला असेल पान या प्रवासात खूप काही गोष्टी होणार जस की शेअर मार्केट पडेल, पुन्हा वरती येईल. नेगेटिव न्यूज येत राहतील त्याकडे दुर्लक्ष कराव लागेल. मित्र बोलतील अरे रिटायरमेंटच नंतर बघू आता एंजॉय कर, त्यांना नाही म्हणाव लागेल आणि अजून अशी बरीच कारणे. या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत तुमच्या Goal कडे फोकस होवून टिकून राहायच आहे.

Retirement, a time to enjoy all the things you never had time to do when you worked.

रिटायरमेंट ही एक अशी वेळ आहे जिथे तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी कराल, त्यांना एंजॉय कराल. जे तुम्ही काम करताना, जॉब करत असताना कधीच करू शकत नाही.

KEEP INVESTING FOR RETIREMENT! 🎯

इतर पोस्ट वाचा👉 बँकमध्ये पैसे येतील पण त्या आधी हे करा! (Think and Grow Rich in Marathi)

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi