Financial Freedom in Marathi: काय तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवय? मग हे 3 नियम फॉलो करा

Rate this post

3 Rules for Financial Freedom in Marathi: आर्थिक स्वातंत्र्य कोणाला नकोय? आपण सगळे यासाठीच तर धावपळ करत आहोत. पण सगळेच या ध्येयापर्यन्त पोचतील अस होणार नाही. मग आपण काय वेगळ केल पाहिजे जेणेकरून आपण लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो.

या पोस्टमध्ये आपण 3 नियम समजून घेणार आहोत. हे नियम अगदी प्रामाणिकपणे फॉलो करून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग नक्की स्पष्ट करू शकता.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
1) तुमची लाइफस्टाइल झटपट Upgrade करू नका. 

का ते सांगतो? सहसा अनेक लोक ही चूक करतात की जशी इन्कम वाढली की त्यासोबत त्यांची लाइफस्टाइल Upgrade करतात. आता लाइफस्टाइलमध्ये बदल झाला की खर्च पण वाढतो.

आधी साधे कपडे चालायचे पण आता Branded कपडे हवेत, आधी 15,000 – 20,000 चा अँन्ड्रॉईड फोन चालायचा पण आता आयफोन हवा, आधी महिन्यातून एकदा (जास्तीत जास्त दोनदा) बाहेरच जेवण व्हायच पण आता दर आठवड्याला बाहेर जेवण आहे. आणि असे बरेच खर्च.

मी अस सांगत नाही की लाइफस्टाइल अजिबात Upgrade करू नका. जिथे गरज आहे तिथे नक्की करा. पण एकदा नीट विचार करा. जर तुम्ही आधी 20,000 कमवत होतात पण Saving फक्त 5000 व्हायची. पण आता तुम्ही 25,000 कमवत आहात पण Saving मात्र तेवढीच 5000 आहे. तुम्ही पण अस करत असाल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे.

म्हणून लाइफस्टाइल Upgrade करा पण हळूहळू (जिथे खरच गरज असेल तिथे)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Financial Freedom: 4% रूलचा वापर करून लवकर रिटायर व्हा! (marathifinance.net)

2) सगळ्यात मोठी रिस्क: एका इन्कमवर अवलंबून राहणे. 

जर तुम्ही 8- 10 तास काम करून दुसऱ्या कोणासाठी एक Passive Income बनू शकता तर तुम्ही दिवसातून 1 तास स्वतासाठी काढू शकत नाही का? तुम्ही जॉब करत असाल किंवा बिझनेस आणि त्यातून तुम्ही इन्कम कमवत आहात.

पण जॉब गेला किंवा बिझनेस नीट नाही चालला तर काय होणार याचा विचार तुम्ही आताच केला पाहिजे. कारण वेळ आली मग धावपळ करण्यापेक्षा आताच तयारी केलेली काय वाईट. म्हणून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कशी बनवू शकता याचा विचार करायला सुरुवात करा.

आणि अस होवूच शकत नाही की तुम्हाला काहीच येत नाही. आपल्या प्रत्येकाकडे काही ना काही स्किल असतात ज्याच्या मदतीने आपण एक्स्ट्रा इन्कम करू शकतो. आणि तसंही

काही स्किल नसतील तर तुम्ही ते स्किल शिकू शकता. आजकाल कसली कमी आहे. जे हव ते यूट्यूबवर शिकायला मिळत.

म्हणून एक इन्कम सोर्स आहे आता दूसरा कसा बनवता येईल याचा विचार करा. (तेही आताच)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi (marathifinance.net)

3) योग्य व्यक्तीशी लग्न करा 

तुम्ही कोणासोबत लग्न करता यावरून तुमच्या लाइफमधील खूप सारे निर्णय ठरतात. जर तुम्ही Saving आणि Investing वर विश्वास ठेवून पैसे योग्यरित्या कसे मॅनेज करता येतील या Mindset चे असाल आणि तुमचा पार्टनर (GF किंवा BF) सतत खर्च करा, मौजमजा करा या Mindset चा असेल तर तुम्ही कधीच आर्थिक स्वातंत्र्य मिळवू नाही शकत.

योग्य जोडीदार असेल तर कुठे खर्च करायचा, किती करायचा, घर कुठे घ्यायच, मुलांना कोणत्या शाळेत टाकायच, कुठे फिरायला जायचं आणि असे अनेक निर्णय. या सगळ्यामध्ये तुमचा पार्टनर  कसा आहे याने खूप फरक पडतो.

आज 14 फेब्रुवारी आहे म्हणजे Valentine Day आणि मला कोणाच ब्रेक अप करायचं नाहीये. किंवा ज्यांच लग्न झालाय त्यांच्यात फुट पाडायची नाहीये.

मुद्दा असा आहे की जर तुमच लग्न झाल नसेल तर तुम्ही पार्टनर निवडताना त्यांचा Financial Mindset काय आहे आणि कसा आहे ते जाणून घ्या. तुमच्या विचारांशी किंवा तुमच्या Financial Goals सोबत त्यांचे विचार जुळत आहेत की नाही ते बघा (36 गुण जुळळे नाही तरी चालतील पण विचार जुळळे पाहिजेत)

आणि हो ज्यांच लग्न झालाय पण पार्टनर नुसता खर्च करतो तर त्यांनी पार्टनरसोबत नीट चर्चा करून यावर Solution सोधल पाहिजे. आपल्या मराठी फॅमिलीमध्ये पैसा हा विषय सहसा अगदी स्पष्टपणे बोलला जात नाही. हीच परंपरा चालत आली आहे. आणि याचे परिणाम पण तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळत असतील. आपण पण ते करून चालायच नाही जर आपल्याला काही नवीन रिजल्ट हवा आहे.

म्हणून तुम्ही ही चूक करू नका. योग्य पार्टनर निवडा. आणि दोघांनी सोबत मिळून फायनॅन्स मॅनेज करा.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Financial Freedom Mindset: आता एंजॉय नाही करणार तर मग म्हातारपणी करणार का? (marathifinance.net)

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi