तू पैशाचा एवढा विचार का करतोस? (Financial Freedom in Marathi)

Rate this post

Financial Freedom in Marathi: आपल्या रोजच्या धावपळीच्या लाइफमध्ये आपल पैशासोबत नक्की नात काय आहे? याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. तुम्हाला माहीत असेल की मला पैसा, इनवेस्टिंग या टॉपिकवर बोलायला आवडत कारण हे आपल्याला घरी आणि कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. अनेकजण विचारतात की “तू पैशाचा एवढा विचार का करतो?” यावर माझ मत हेच असत की हे पैशासाठी अति प्रेम नाहीये तर टाइम फ्रीडमसाठी चाललेली धडपड आहे. 

जरा विचार करा. टाइम ही एक अशी गोष्ट आहे की एकदा गेली की गेली. ती पुन मिळवता येत नाही. आपल्या आजूबाजूच जग अस बनत चालय जिथे सतत काही ना कही डिस्ट्रॅक्शन आपल्या वाटेत आहेत. मग ते इनस्टा रील असो की यूट्यूब विडियो, बाबू जेवलास का असो की तू जेवलीस का, सतत फोन नोटिफिकेशने भरलेल असत. सतत कोणीतरी किंवा काहितरी आपल एटेन्शन मागत असत. टाइम आपल्या हातातून कसा जात आहे याचा पत्ता पण लागत नाही. जेव्हा मी हे लिहितोय तेव्हा फक्त 5 दिवसानंतर 2024 येणार आहे. आता या सगळ्या धावपलित नकी पैसा कसा आणि कुठे येतो. 

पैसा हे फक्त एक साधन आहे!

पैशाचा मुख्य हेतु हाच आहे की पैसा द्या आणि कोणतंही काम करून घ्या किंवा ज्या गोष्टी हव्यात त्यांना सहज मिळवा. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही हा पैसा कसा कमविता आणि त्याचा योग्य वापर कसा करता. पुरेसा पैसा असेल ना तर आपली लाइफ आपल्या हिशोबाने, आपल्या टाइमनुसार जगायच फ्रीडम आपल्याला मिळत. पैसा एक पूल बनतो तुमच्या आताच्या धावपळीच्या लाइफ ते टाइम फ्रीडम मधला जर तुम्ही त्याचा योग्य वापर करत आहात. आणि हो मी पुरेसा पैसा बोललो, ना कमी ना जास्त. (हा जास्त असेल तर काही हरकत नाही) 

तुम्ही जर नीट लक्ष दिलत ना तर पैसा आणि टाइम यांच एक अतूट नात तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही स्वता बघा ना आपण सगळे एका ना थांबणाऱ्या चक्रामध्ये अडकून बसलो आहोत. हे चक्र सगळ्यांसाठी थोडफार सेमच असत. सकाळी उठा → कंपड्याना इस्त्री आणि तयार व्हा → चहा नाष्टा करा आणि पळा → बस किंवा ट्रेनची गर्दी तुमची वाट बघत असते →  जॉबवर जा काम करा → पुन्हा घरी येताना तीच गर्दी → घरी या तेही थकून → हास्य जत्रा बघा नाहीतर रील्स आहेतच → जेवा आणि मग झोपा → उद्या पुन्हा हे चक्र चालूच. आपण आपला टाइम देतो आणि पैसे कमवितो. सॅलरी येते महिन्याच्या शेवटपर्यंत संपून जाते. आणि याच जाळ्यातून बाहेर पडायच मोटिवेशन म्हणा किंवा अजून काही. हेच मुख्य कारण आहे की आपण पैशाचा विचार का केला पाहिजे.

Financial Fredom = Time Freedom 

तुम्हाला जर टाइम फ्रीडम हवा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला Financial Freedom चा विचार करावा लागेल. कारण जेव्हा तुमच्या पुरेसा पैसा असेल तेव्हा तुम्ही तुमच टाइम तुम्हाला हवा तसा वापरू शकता. त्यामुळे शक्य करण्यासाठी आपल्याकडे एकच साधन आहे तो म्हणजे आता हातात असलेला पैसा. तुम्ही पैशासाठी एवढी मेहनत घेत आहात पण त्याला इनवेस्ट करून तुमच्यासाठी काम करायला लावा. तुमचे Financial Goals समजून, नीट पैसे सेव करून आणि मग ते चांगल्या Assets मध्ये इनवेस्ट करून तुम्ही तुमचा Financial Freedom आणि मग टाइम फ्रीडमचा मार्ग बनवणार आहात. पैसा कमविण्यासाठी सतत तुमचा टाइम देण्याचा मार्ग खूप Risky आहे कारण एक दिवशी टाइम संपून जाईलच. 

Financial Freedom चा हा प्रवास फक्त पैसा कामविण्याचा नाही तर त्याही पलीकडे तुमची लाइफ तुमच्या पद्धतीने जगण्याचा एक मार्ग आहे. या नंतर ना सकाळी लवकर उठाव लागेल → ना कसली घाई ना गर्दी → फॅमिलीसोबत पुरेसा वेळ → शिमगा/गणपतीला गावी (ना बॉसची कटकट) → आता फिट व्हायला वेळ मिळेल → बुक्स वाचायला वेळ मिळेल → आणि असे बरेच फायदे. त्यामुळे जर तुम्हाला जर कोणी बोलल की सतत “तू पैशाचा एवढा विचार का करतो?” तर त्यामागच कारण त्यांना सांगा. आपली आपल्याला हवी तशी जगण्यासाठी पैसा एक साधन आहे. 

Financial Freedom in Marathi

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Financial Freedom Mindset: आता एंजॉय नाही करणार तर मग म्हातारपणी करणार का? 

Financial Freedom: 4% रूलचा वापर करून लवकर रिटायर व्हा! 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

 

1 thought on “तू पैशाचा एवढा विचार का करतोस? (Financial Freedom in Marathi)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi