50 पर्यन्त खूप पैसे कमवा, एका 75 वर्षाच्या व्यक्तीचा सल्ला | Make More Money till 50 (Financial Advice)

Make More Money till 50 (Financial Advice) in Marathi: मी एका Co Operative बँकमध्ये जॉब करतो. सध्या मी FD काऊंटरवर असतो. तर तिथे माझी ओळख एका कस्टमरसोबत झाली जे त्यांच्या FD Renew करायला किंवा नवीन FD करायला येत असतात. त्यांच्यासोबत बोलण झाल आणि आता चांगली ओळख पण झाली आहे.

त्यांच्याशी बोलून मला हे समजल की गेले 37 वर्ष ते एक त्रैमासिक चालवत आहेत. अखिल वैश्यमानस या नावाने. नुकतंच त्यांनी मला त्याचा नवा अंक आणून दिला. आणि काल घरी येताना मला ते मेट्रोमध्ये भेटले तर आम्ही थोड्या गप्पा मारल्या. तर त्या गप्पामधून मी काय शिकलो ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

Make More Money In Marathi

1)  लाइफमध्ये असा एक छंद हवा जो तुम्हाला क्रिएटिव ठेवेल. 

त्यांना आपण इथे काका बोलूत. वारंगे काका गेले 37 वर्ष एकट्याने ते त्रैमासिक चालवत आहेत. सगळी रिसर्च असो. सगळ्या बातम्या असो. सगळं कंटेंट लिहिणे असो किंवा त्या त्रैमासिकाच डिझाईन असो, सगळ काम तेच करतात.

मुळात ते त्यांच शिक्षण जे जे स्कूल ऑफ आर्टमधून झाल आहे. आणि या आधी ते याच क्षेत्रात नोकरीला होते. पण मला हे सगळ एकून एवढ आश्चर्य झाल की ते अजून पण हे काम करत आहेत. मी त्यांना विचारल की तुम्ही अजून पण हे सगळ का करताय?

घरी बसून काय करणार अस ते म्हणाले. आणि मेंदू काम करत राहिला तर ते चांगलाच आहे. आणि खर बोलू तर त्यांच्याकडे बघून वाटत नाही की ते 75 वर्षाचे आहेत कारण ते खूप Active आहेत. कारण मी याच वयाच्या खूप साऱ्या कस्टमरना बघतो.

यावरून हे समजत की, म्हातारपणी किंवा रिटायर झाल्यावर स्वताला Active ठेवणे किती गरजेच आहे. त्याने तुमची हेल्थ चांगली राहते.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 2024 मध्ये तुमच्या आवडीमधून पैसे कसे कमवाल? | How to Make Money in Marathi

2) एक आवड तुम्हाला पैसे कमवून देऊ शकते. 

मी स्वता त्या त्रैमासिकाची प्रिंटिंग पाहिली. त्यांनी क्वालिटी पेपर वापरला आहे. मी विचारल मी याचा खर्च कसा निघतो. अजून ते टोटल 800 अंक छापतात. तर त्यांनी सांगितल की काही Ad Placement साठी ते 1200 ते 5000 चार्ज करतात तेही वर्षाला. Ad ब्लॅक आणि व्हाइटमध्ये असेल तर कमी खर्च आणि कलरमध्ये असेल तर जास्त.

या पैशातून सोबत काही सभासद आहेत त्यांच्या वर्गणीमधून जो पैसा येतो त्यातून ते 30,000 ते 35,000 एवढी प्रिंटिंग कॉस्ट काढतात. त्यांनी सांगितल की ते हे काम प्रॉफिटसाठी करत नाही तर आवड म्हणून करतात. (No Profit No Loss Model) अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्याच्या घरी हे त्रैमासिक पाठवायच काम ते स्वता करतात.

Make More Money In Marathi Financial Advice

आपल्या सारख्या तरुण मंडळीला हे समजायला हव की एकटा व्यक्तीमध्ये किती Potential असत. स्वताच्या आवडीमधून पैसे कमविता येतात. वारंगे काका सध्या या कामातून पैसे कमवायचे या हेतूने करत नाहीयेत.

पण आपण तर अजून तरुण आहोत. अंगात ताकद आहे. हव ते करू शकतो फक्त कमी आहे ती काही नवीन करण्याची आवड. आणि जर आवड असेल तर त्यातून पैसे पण कमवू शकता. आणि म्हणून आवड सोधा आणि त्यावर काम करा.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
3) आर्थिक स्वातंत्र्य हवय? तर 50 पर्यन्त शक्य तितके पैसे कमवा. 

वारंगे काका म्हणतात की 50 पर्यन्त शक्य तितके पैसे कमवा. ते सेव करा. योग्यरित्या इन्वेस्ट करा. त्यांची खूप सारी Saving आणि Investment ही फक्त FD मध्ये आहे. त्यातून येणारा इंट्रेस्ट हा त्यांच्या खर्चासाठी पुरे असतो. ते वर्षाला थोडेफार पैसे दान सुद्धा करतात. त्यांना जितक शक्य होईल तेवढे.

हे सगळ शक्य झाल कारण त्यांनी तरुण वयात नीटपणे Saving आणि Investing केली आहे. त्यांच लग्न 1978 मध्ये झाल तेव्हा त्यांच्या लग्नाचा खर्च 8,500 रुपये आला होता. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की त्यांच्याकडे अजून पण तो कागद आहे ज्यावर त्यांनी हे सगळे खर्च ट्रॅक केले आहेत. (मी त्यांना बोललो मला बघायच आहे. त्यांनी दाखवल तर मी इथे अपडेट करेन)

यातून आपल्याला हा सल्ला मिळतो की आपण आपले खर्च ट्रॅक केले पाहिजेत. आधी फक्त एकाच मार्ग होता ते म्हणजे कागद आणि पेन. पण आता आपल्याकडे ट्रॅकिंग Apps वेगेरे सगळ आहे तरी पण आपण करत नाही.

दुसर म्हणजे आपल्याला पैसे इन्वेस्ट करायला किती सारे मार्ग आहेत. म्यूचुअल फंड, डायरेक्ट स्टॉक, ETF, PPF, इंडेक्स फंड आणि बरेच ऑप्शन. आता एवढ सगळ असून पण आपण जरी मागे राहिलो किंवा लाइफमध्ये आर्थिक स्वातंत्र्य नाही मिळवू शकलो. तर सगळ व्यर्थ आहे.

म्हणून आजच Action घ्या. पैसे कमवा आणि इन्वेस्ट करा.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Long-Term Investing म्हणजे नक्की किती? (marathifinance.net)

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?