Groww Nifty Smallcap 250 Index Fund NFO: फंड नक्की काय आहे? इन्वेस्ट केल पाहिजे का?

Groww Nifty Smallcap 250 Index Fund NFO: 2024 मध्ये तुम्ही खूप सारे इंडेक्स फंड लॉंच होताना बघणार आहात. नुकतंच Groww ने त्यांचा Groww Nifty Smallcap 250 Index Fund 9 फेब्रुवारीला लॉंच केला होता जो 24 फेब्रुवारीला बंद होणार आहे. आता हा फंड काय आहे हे समजून घेण्याआधी NFO काय ते बघू.

NFO म्हणजे New Fund Offering 

जेव्हा पण एखादी म्यूचुअल फंड कंपनी एखादा नवीन फंड मार्केटमध्ये घेऊन येते त्याला NFO अस म्हणतात. जस एखादा स्टॉक शेअर मार्केटवर लिस्ट करताना आयपीओ आणला जातो अगदी तसंच म्यूचुअल फंडला मार्केटमध्ये आणताना NFO आणला जातो.

Nifty Smallcap 250 Index काय आहे? 

SEBI (Securities and Exchange Board of India) ने मार्केटमधील विविध कंपन्याना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वाटून दिल आहे. आता भारताची 251 वी कंपनी ते अगदी 500 वी कंपनी अशा टोटल 250 कंपन्या मिळून Nifty Smallcap 250 Index बनते.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Market Capitalization: – कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय?

Groww Nifty Smallcap 250 Index Fund काय आहे? 

एक असतात Active म्यूचुअल फंड जिथे फंड मॅनेजर डोक लावून, रिसर्च करून स्टॉक निवडतो आणि त्यामध्ये पैसे इन्वेस्ट करतो पण तेवढी जास्त फी पण घेतो. पण इंडेक्स फंडच तस नाहीये. इंडेक्समध्ये फंड मॅनेजर डायरेक्ट पैसे एखाद्या ठरविलेल्या इंडेक्समध्ये इन्वेस्ट करतो.

जस Groww Nifty Smallcap 250 Index Fund मध्ये फंड मॅनेजर डायरेक्ट पैसे ठरलेल्या 250 कंपन्यामद्धे इन्वेस्ट करणार आणि जेवढा रिटर्न या इंडेक्समध्ये मिळेल तेवढा रिटर्न या फंडला आणून द्यायचा आहे.

या फंडमध्ये कोणी इन्वेस्ट केल पाहिजे? 

ज्या लोकांना फंड मॅनेजर कोण आहे, तो किती चांगल्या स्टॉक निवडतो आणि किती फी घेतो अशा भानगडीत पडायच नाहीये त्यांनी या फंडमध्ये इन्वेस्ट करू शकता जर तुम्हाला एक Smallcap Mutual Fund तुमच्या पोर्टफोलियोमध्ये हवा असेल.

पण Smallcap फंड आहे म्हणजे रिस्क पण जास्त असते. त्याचा विचार करून इन्वेस्ट करा.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Groww Nifty Smallcap 250 Index Fund ची काही वैशिष्ट्ये
  • या फंडची NAV (Net Asset Value) 10 रुपये असेल
  • या फंडमध्ये काही एक्जिट लोड नाहीये. म्हणजे अचानक कधी पैसे काढले तर काही Charges लागत नाही.
  • या फंडचा Expense Ratio अजून ठरला नाहीये. तो हा NFO ची प्रोसेस संपली की समजेल. पण माझ्या अंदाजाने 0.40% च्या खालीच असेल.

तुम्ही यामध्ये इन्वेस्ट करणार असाल तर नीट समजून घ्या आणि मगच पैसे इन्वेस्ट करा. आणि फक्त याच फंडच्या बाबतीत नाही कोणताही म्यूचुअल फंड जेव्हा तुम्ही निवडाल तेव्हा त्याला नीट समजून घ्या आणि मग त्यामध्ये इन्वेस्ट करा.

Happy Investing!

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Long-Term Investing म्हणजे नक्की किती? (marathifinance.net)

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?