Personal Finance in Marathi: आर्थिक पाया मजबूत करायचय? 3 पर्सनल फायनॅन्स रुल आजच समजून घ्या

3 Simple Personal Finance Rules in Marathi: २०२४ सुरू झाला आणि बघता बघता आता दोन महीने संपायला येतील. पण या नवीन वर्षांत पण अगदी तिथेच राहून, मग लाइफ असो की पर्सनल फायनान्स, काहीही बदल न करता हे वर्ष आपल्याला असच घालवायचा नाहीये. त्यामुळे एक साधा सोपा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. 

काय मी फ्युचरमध्ये आर्थिकरित्या Successful होण्यासाठी तयारी करत आहे? आणि हे करत असताना एक चांगली बातमी ही आहे की, तुम्ही आता सुद्धा सुरुवात करू शकता. आणि म्हणून आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण ३ महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही २०२४ मध्ये काही चांगले बदल करून २०२५ साठीचाआर्थिक पाया रचू शकता. चला तर सुरुवात करूया!

Rule #1: Power of Diversification ला समजून घ्या. 

तुम्ही ती इंग्लिश म्हण तर वाचली असेल की Do not put all your eggs in one basket. याचा अर्थ असा की सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये ठेऊ नका कारण ते बास्केट जर पडल तर सगळी अंडी गेली म्हणून समजा. 

Investing करताना पण तुम्हाला हीच गोष्ट फॉलो करायची आहे. सगळे पैसे एकाच ठिकाणी इन्वेस्ट करायचे नाहीयेत. तुमचे पैसे विविध Assets मध्ये इन्वेस्ट करणे यालाच Diversification म्हणतात. 

जर तुम्ही सगळे एकाच म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करत असाल तर ते खूप Risky आहे. जर तुम्ही डायरेक्ट स्टॉक घेत असाल तर सगळे पैसे एकाच प्रकारच्या स्टॉकमध्ये इन्वेस्ट करणे गरजेच आहे. 

Diversification ही एक प्रकारची ढाल आहे जी नको त्या रिस्कपासून तुमच्या पैशाला वाचवते. त्यामुळे थोडे पैसे म्यूचुअल फंड, काही स्टॉकमध्ये तर काही गोल्ड आणि लगेच लागणार असतील तर FD किंवा सेविंग अकाऊंटमध्ये ठेवावेत. 

योग्यरित्या Diversification करून तुम्ही अधून मधून येणाऱ्या आर्थिक संकटांवर मात करू शकता आणि तुमच्या लॉन्ग टर्म ध्येय जस की आर्थिक स्वातंत्र्य लवकरात लवकर पूर्ण करू शकता. 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉  डायव्हर्सिफिकेशनसाठी टोटल किती फंडस घेऊ? | Mutual Fund Diversification in Marathi

Rule #2:  High-Interest कर्ज सगळ्यात आधी फेडा 

पर्सनल लोन असो की क्रेडिट कार्डच बिल, यामध्ये इंट्रेस्ट रेट खूप भयंकर असतात. एखाद्या वेळी काही कारणास्तव तुम्हाला पैसे भरायला नाही जमले तर हळू हळू हे कर्ज वाढत जात. 

मुद्दल, मग त्यावर लागलेला इंटरेस्ट आणि मग हफ्ते चुकले म्हणून त्या इंटरेस्टवर लागलेला अजून इंटरेस्ट. हे जाळ अगदी मोठ्या प्रमाणात वाढत जात आणि वेळ आधी येते की ते  अगदी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जात. 

त्यामुळे तुम्ही जर अस काही कर्ज घेतल असेल तर सगळ्यात आधी ते फेडून टाका. SIP किंवा इतर इन्वेस्टमेंट हव तर काही वेळासाठी थांबवा कारण SIP वर मिळणारा रिटर्न आणि पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड बिल यावर लागणारा इंट्रेस्ट यामध्ये खूप मोठा फरक असतो. 

आणि म्हणून सगळ्यात आधी High Interest कर्ज फेडून टाका.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Rule #3: Lifelong Money Learner बना 

तुम्ही बघताय ना, फायनॅन्स असो की इतर कोणताही क्षेत्र, सतत काही ना काही बदल होतच आहेत. सध्या आपण फक्त फायनॅन्सबद्दल बोलू तर नवीन इन्वेस्टमेंटच्या संधी, नवीन टॅक्स नियम, नवीन Apps आणि काही स्कीम इ.

जर तुम्हाला एक पाऊल पुढे राहायच आहे तर सतत शिकत रहा. आता शिकायच कुठे? मराठी फायनॅन्ससारखे ब्लॉग वाचा, यूट्यूबवर चांगले चॅनेल आहेत त्यांना फॉलो करा आणि सगळ्यात बेस्ट बुक्स वाचा. 

तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे की नॉलेज ही एक पॉवर आहे. जितक तुम्ही पैशाविषयी शिकणार तितक चांगल्याप्रकारे तुम्ही पैसे मॅनेज करणार. आणि परिणामी तुमची आर्थिक ध्येय लवकर गाठणार. 

भावानो आणि बहीणींनो मुद्दा असा आहे की 

हे 3 Simple Personal Finance Rules वाचताना खूप सिम्पल वाटत असले तरी तुमच्या आर्थिक वाटचालीत यांचा परिणाम खूप मोठा आहे. तुम्ही 2024 मध्ये या रुल्सना फॉलोकरून काही योग्य ते बदल केलेत तर 2025 मध्ये तुमच्या आर्थिक प्रवासाचा पाया खूप मजबूत असेल. 

ते शाळेत एकल असेल ना की थेंबे थेंबे तळे साचे. अगदी तसंच छोटे छोटे पण योग्य निर्णय घेऊनच मोठे ध्येय गाठता येत. आणि आपल्या सगळ्यांचा मोठ ध्येय एकच आहे ते म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. 

मग वाट कसली बघताय. आजच यापैकी जो रुल तुम्हाला गरजेचा आहे त्याला लागू करा. 2025 मध्ये या निर्णयासाठी तुम्ही स्वताला थँक्यु बोलाल एवढ नक्की. 

Keep Earning & Keep Investing! 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 पर्सनल फायनॅन्स नक्की आहे तरी काय? | Personal Finance in Marathi (marathifinance.net)

1 thought on “Personal Finance in Marathi: आर्थिक पाया मजबूत करायचय? 3 पर्सनल फायनॅन्स रुल आजच समजून घ्या”

Leave a Comment