रेंटवर राहू की घर घेऊ? काय कळत नाहीये? | Buying a Home or Staying on Rent – Which is a better option?

Rate this post

Buying a Home or Staying on Rent: मी नुकतच नेहा नागर ज्या एक मोठ्या Finance Youtuber आहेत आणि निखिल कामथ जे Zerodha चे Co-Founder आहेत यांची पॉडकास्ट एकत होतो. त्यामध्ये निखिल कामथ यांनी सांगितल की रेंटवर राहणे फायद्याच आहे. आणि ते खर पण आहे.

यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात स्वताच घर घ्यायच की रेंटवर राहायच यावर विडियोस आहेत. तुम्ही सुद्धा या विडियोस पहिल्या असतील. पण आपण आजच्या पोस्टमध्ये एका प्रॅक्टिकल दृष्टिकोणातून आपण या टॉपिकवर चर्चा करू. चला तर सुरुवात करूया.

रेंटवर राहणे फायद्याच की घर घेणे? (Buying a Home or Staying on Rent?) 

याच डायरेक्ट उत्तर हेच आहे की कधीही रेंटवर राहणे फायद्याच असेल. आता तुम्हाला एक काम करायच आहे. तुम्ही जिथे कुठे राहता तिथे एक घर घ्यायला किती खर्च येईल ते बघा आणि जर रेंटवर राहिले तर किती खर्च येईल ते बघा.

समजा तुम्ही विरार जिथे घर स्वस्त मिळतात तिथे जर एखादा  1bhk फ्लॅट घ्यायला गेलात तेही रेलवे स्टेशनच्या जवळ तर ते कमीत कमी 40 लाखाला पडेल. आणि यासाठी समजा तुम्ही 20 वर्षासाठी लोन घेतल तेही फक्त 30 लाखाच तर तुम्हाला पुढीलप्रमाणे खर्च येईल. आता बाकीचे पैसे समजा तुम्ही आधी मॅनेज केले आहेत. आपण होम लोन इंट्रेस्ट 8.5% घेऊ.

Buying Home or Rent What is Better

आणि जर तुम्ही आता कॅलक्युलेशन केलात तर 20 वर्षासाठी 30 लाखाच लोन 8.5% इंटरेस्टच्या हिशोबाने तुम्हाला 62.5 लाखाला पडेल. म्हणजे तुम्हाला 30,00,000 ही मुद्दल भरायची आहे आणि 32,48,327 एवढा इंटरेस्ट लागणार असे मिळून टोटल 62,48,327 रुपये.

पण जर तुम्ही 20 वर्ष रेंटवर राहिलात तर किती खर्च येईल? 

समजा तुम्ही अगदी रेलवे स्टेशन जवळ एखादा 1 bhk रेंटवर घेतलात ज्याच भाड 10,000 आहे. (मी यासाठी सांगतोय कारण आमच्या बाजूची एक ताई तिकडे राहते जीच रेंट 8,000 आहे अगदी स्टेशन जवळ)  आता 20 वर्ष म्हणजे टोटल 240 महीने. आता या 240 महिन्यासाठी जर तुम्ही 10,000 रेंट दिल तर खालीलप्रमाणे खर्च येईल.

12 महीने * 10,000 रुपये = 1,20,000 (हे झाल पहिल्या वर्षीच टोटल रेंट). आता काही जण बोलतील रेंट तेवढंच थोडी ना राहणार. हा पॉइंटपण बरोबर आहे.

तर आपण काय करू दर वर्षी रेंट 5% ने वाढवू. आता याच कारण अस की Urban Housing Inflation थोडक्यात काय तर घरांचे दर 5% ने वाढत आहेत. (कोणताही घर मालक दर वर्षी डायरेक्ट  रेंट 5% ने वाढवत नसेल पण आपल गणित सोप व्हाव म्हणून आपण 5% ने रेंट वाढत आहे अस समजूयात)

Year Rent (Rupees) Cumulative Total (Rupees)
1 1,20,000 1,20,000
2 1,26,000 2,46,000
3 1,32,300 3,78,300
4 1,38,915 5,17,215
5 1,45,861 6,63,076
6 1,53,154 8,16,230
7 1,60,811 9,77,041
8 1,68,851 11,45,892
9 1,77,294 13,23,186
10 1,86,159 15,09,345
11 1,95,467 17,04,812
12 2,05,240 19,10,052
13 2,15,502 21,25,554
14 2,26,277 23,51,831
15 2,37,591 25,89,422
16 2,49,471 28,38,893
17 2,61,944 30,99,837
18 2,75,041 33,74,878
19 2,88,793 36,63,671
20 3,03,233 39,66,904

जरी रेंट 5% ने वाढली तरी 20 वर्षात त्या घरामध्ये रहायला तुम्ही टोटल रेंट 39 लाख 66 हजार ईवधी देणार आहात. जी स्वता घर घेण्यापेक्षा नक्कीच कमी आहे.

आता Buying Home or Rent यामध्ये कोणता ऑप्शन बेस्ट आहे हे तुम्हाला समजल असेल. 

स्वताच घर घेतलत तर ते 62.5 लाखाला पडेल आणि रेंटवर राहिलात तर 40 लाखात काम होवून जाईल. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की, तुम्ही जिथे राहता तिथे जागेचे भाव काय आहेत यावरून तुम्ही गणित करून बघा. मी विरारच उदाहरण यासाठी दिल कारण तिथे घर स्वस्त असतात. गणित करायला जरा सोप जाईल.

पण घर घेणे हा जितका मोठा आर्थिक निर्णय आहे तेवढाच मोठा भावनिक निर्णय आहे. पैशाचा विचार केला तर रेंटवर राहणे कधीही चांगल. पण जर तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार केला, लाइफ शांत जगण्याच विचार केला तर घर घेणे कधीही चांगल. कस ते संजुयात.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
रोहित 29 वर्षाचा आहे आणि त्याला एक मुलगा आहे (त्याने घर घ्याव की रेंटवर रहाव?) 

आता जरा विचार करा, रोहित त्याचे आई बाबा, बायको आणि एक 5 वर्षाचा मुलगा यांच्यासोबत एका रेंटवर घेतलेल्या घरात राहतात. मुलगा नुकतंच शाळेत जायला लागला आहे. आणि त्याचे चांगले मित्र झाले आहेत. जिथे राहतात तिथे आजूबाजूच्या लोकांशी त्यांची चांगली मैत्री जमली आहे. सगळे सन उत्सव ते एकत्र साजरे करतात.

आता होत काय माहिती आहे, 11 महिण्याच रेंट Agreement पूर्ण होत आहे पण घर मालक रेंट वाढवून मागत आहे.  नाहीतर घर खाली करा अस सांगत आहे. सध्याच रेंट 7,000 आहे पण मालक 10,000 मागत आहे. आता हे रोहितला शक्य नाही. आता अशा वेळी त्याने काय कराव?

म्हाताऱ्या आई बाबाना घेऊन तो कुठे लगेच दुसर घर बघेल. बायको सगळ नीट मॅनेज करत आहे आता सगळ पुन्हा नव्या ठिकाणी न्याव लागणार. 5 वर्षाचा मुलगा बोलतोय मला माझ्या मित्राना सोडून जायच नाहीये. आजूबाजूचे शेजारी पण नाराज आहेत.

पण जर हेच घर त्याच स्वताच असत तर? भलेही ते लोन काढून घेतल असेल. भलेही त्याचे कागदपत्रे बँककडे असतील पण ते घर रोहितच्या नावावर आहे ज्याचे EMI तो वेळेवर भरत आहे. तर त्याला त्या घरातून बाहेर पडायची गरज नसती.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 होम लोन घेताना टर्म इन्शुरेंसची गरज लागेल (कस? ते जाणून घ्या) | Term Insurance for Home Loan in Marathi

पण मोठे यूट्यूबर असो की बिझनेसमेन सांगतात घर घेऊ नका रेंटवर रहा अस सांगतात त्याच काय?

मी सुरुवातीला Zerodha चे Co-Founder निखिल कामथ यांच उदाहरण दिल की ते रेंटवर रहा अस सांगतात. आणि खूप सारे मोठे यूट्यूबर हाच सल्ला देतात. पण जरा विचार करा निखिल कामथ सारखा व्यक्ती जो भारताचा सगळ्यात तरुण बिलिनीयर आहे. ज्यांची टोटल Net Worth सध्या 1.11 बिलियन डॉलर एवढी आहे. (9,13,14,30,00,000 Indian Rupee मध्ये एवढी. तुम्हीच वाचा)

ते सध्या बंगळुरूमध्ये रेंटच्या घरात राहतात. समजा त्यांचा काही कारणाने त्यांच्या घर मालकासोबत वाद झाला आणि त्याने घर खाली करायला सांगितल तर ते काय करतील. जरी निखिल कामथ यांनी एक ट्वीट जरी केल ना की बंगळुरूमध्ये  नवीन घर बघतोय लोक लाइन लावतील DM मध्ये. त्यांचा नेटवर्क एवढा मोठा की ते दुसर घर सहज बघू शकतात. आणि भेटलच तर दुसर घर विकत घेऊ शकतात.

पण रोहित सारख्या सामान्य माणसाचा काय? 

त्याला नवीन घर बघताना भयंकर त्रास होणार. हजार प्रश्न विचारले जातील. कमविता किती. मग घर भेटल तरी मुलाची नवीन शाळा. नवीन शेजारी. पुन्हा नव्याने सुरवात.

एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा कोणी मोठा यूट्यूबर अगदी शिरा ताणून सांगतो ना की घर नका घेऊ आणि रेंटवर रहा. तेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार करा. तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत याचा विचार करा.

यूट्यूबर लोकांची आणि आपली लाइफ खूप वेगळी आहे. ते सांगतील ती पूर्व दिशा अस करणे थांबवा. आपल्या प्रत्येकाकडे बुद्धी आहे नीट विचार करायची की आपल्यासाठी चांगल काय आहे. काही निर्णय फक्त पैसा बघून नाही तर जबादाऱ्या बघून घ्यावे लागतात.

स्वतःच घर घेणे हा त्यापैकी एक निर्णय आहे.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉आर्थिक साक्षरतेचे 8 महत्वाचे धडे | Rich Dad Poor Dad in Marathi (marathifinance.net)

3 thoughts on “रेंटवर राहू की घर घेऊ? काय कळत नाहीये? | Buying a Home or Staying on Rent – Which is a better option?”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi