Term Insurance काय आहे हे आपण मागच्या पोस्टमध्ये अगदी डिटेलमाशे समजुन घेतल आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण टर्म इन्शुरन्स पॉलिसी पॉलिसी घेतांना कोणते रायडर घेतले पाहिजेत हे आपण समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया.
Term Insurance Riders काय आहेत?
जेव्हा तुम्ही एक सिंपल टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेता त्या पॉलिसीला मजबूत बनविण्यासाठी काही Extra Benefits त्यासोबत जोडले जातात त्यालाच रायडर अस म्हणतात. एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही नसताना तुमच्या फॅमिलीसाठी एक आर्थिक सपोर्ट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.
Term Insurance Riders चे विवीध प्रकार
1. Waiver of Premium रायडर
वैवर ऑफ प्रीमियम हे अस एक रायडर आहे जे तुम्ही तुमच्या Term Insurance पॉलिसी मध्ये नक्कीचं Add केल पाहिजे. हा एक एक्सट्रा रायडर आहे ज्याचा वापर पॉलिसीहोल्डर जेव्हा खूप आजारी पडतो, जॉबवर जायला शक्य होत नाही पण इतर आर्थिक खर्च पूर्ण करणे गरजेचं असत.
आता जरा विचार करा, जर पॉलिसीहोल्डर काही कमवणार नाही तर तो प्रीमियमचे पैसे कसे भरणार? आणि अशा वेळी Waiver of Premium हे Rider कामी येत. जर पॉलिसीहोल्डर आजारपणामुळे किंवा जॉब गेल्याने पॉलिसीचे पुढचे प्रीमियम भरू शकत नाही तेव्हा त्याचे प्रीमियम माफ केले जातात. हे Rider घेणे अगदी स्वस्त आहे. जास्त काही खर्च येत नाही. त्यामुळे टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना हा Rider त्यामधे नक्की Add करा.
2. क्रिटिकल इलनेस रायडर
Critical Illness Rider हे एक Optional रायडर आहे जे तुम्ही तुमच्या Term Insurance पॉलिसीमध्ये Add करू शकता. या रायडरचा फायदा असा होतो की पॉलिसी होल्डरला जर एखाद्या क्रिटिकल इलनेससाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आणि या सगळ्याचा खर्च या रायडरच्या माध्यमातून दिला जातो. काही क्रिटिकल इलनेसची नावे पुढीलप्रमाणे
- Cancer (except for initial stages, HIV-related, and skin cancer)
- Heart attack
- Stroke
- Kidney failure
- Multiple sclerosis
- Benign tumour of the brain or spinal cord
- Coma
- Dementia including Alzheimer’s disease.
क्रिटिकल इलनेस रायडरचे दोन प्रकार
१) एक रायडर अस असतो जिथे Term Insurance पॉलिसीच्या रक्कमेच्या व्यतिरिक्त एक Extra रक्कम पॉलिसी होल्डरला दिली जाते. (उदाहरण:- समजा पॉलिसीहोल्डरने 50 लाखाची टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे आणि क्रिटिकल इलनेसच्या खर्चासाठी त्याला 20 लाखाची गरज आहेत तर हे Extra 20 लाख त्याला क्रिटिकल इलनेस रायडरचे benefit म्हणून दिले जातात. म्हणजे 50 लाख टर्म इन्शुरन्ससाठी + 20 लाख क्रिटिकल इलनेस रायडरसाठी)
2) दुसऱ्या टाइपच क्रिटिकल इलनेस रायडर म्हणजे accelerated critical illness (ACI) रायडर. या रायडरमध्ये जेव्हा पॉलिसीहोल्डरला क्रिटिकल इलनेसच्या आजारपणासाठी पैसे दिले जातात तेव्हा तेवढी रक्कम तुमच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीमधून कमी केली जाते. (उदाहरण:- समजा तुम्ही 50 लाखाची टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे. आणि क्रिटिकल इलनेससाठी तुम्हाला 10 लाखाची गरज आहे. तर हे 10 लाख इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देते पण तुमच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा कवर आता 50 लाख न राहता फक्त 40 लाख होतो. 50 लाख – 10 लाख = 40 लाख)
Critical Illness Rider एक महत्वाचं रायडर आहे जे प्रत्येकाने Term Insurance पॉलिसी घेताना नक्की घेतल पाहिजे. पण या 2 प्रकारच्या रायडर्सपैकी नक्की कोणता घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकता ते म्हणजे पॉलिसी काढताना दोन्ही प्रकारचे रायडर्स Add करून बघा. तुमचं प्रिमियम किती वाढत आहे ते बघा. जास्त फरक नसेल तर पाहिलं हे वाल रायडर घ्या.
3. Accidental Death Benefit रायडर
Accidental Death Rider हे सुध्दा एक महत्वाचं रायडर आहे जे तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी मध्ये Add करू शकता. यामध्ये रायडरमध्ये जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू जर एखाद्या Accident ने झाला जस की रोड Accident तर त्याच्या नॉमिनीला टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या benefit सोबत एक Extra रक्कम दिली जाते. एक उदाहरण घेऊ, समजा पॉलिसीहोल्डर ने 50 लाखाची टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढली होती आणि त्यासोबत 1 करोडच Accidental Death Rider घेतलं होत. जेव्हा पॉलिसीहोल्डरचा निधन एखादया Accident मध्ये होतो तेव्हा त्याच्या नॉमिनीला टर्म इन्शुरन्सचे 50 लाख आणि Accidental Death Rider चे 1करोड असे टोटल 1.5 करोड दिले जातील.
4. Terminal Illness रायडर
Terminal Illness Rider हे अगदी Critical Illness Rider सारखच काम करत पण त्याचा हेतू थोडा वेगळा असतो. या रायडरनुसार पॉलिसीहोल्डरला एखादी टर्मिनल इलनेस झाली आणि तो 6 महिन्यांपेक्षा जास्त जगू शकत नाही तर त्याला एकत्रित एक रक्कम दिली जाते. ही रक्कम तो त्याच्या इच्छेनुसार स्वतःच्या आजारपणावर किंवा त्याच्या फॅमिलीच्या फ्युचरसाठी वापरू शकतो.
एक गोष्ट लक्षात घ्या, Terminal या शब्दामध्ये Term म्हणजे ठराविक कालावधी आणि म्हणून नाव Terminal Illness Rider अस आहे.
पण या रायडरनुसार इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळणे खूप कठीण असत कारण एका मेडिकल specialist किंवा मोठ्या डॉक्टरने सांगितल मी पॉलिसीहोल्डरकडे खूप कमी दिवस राहीले आहेत आणि हे जेव्हा इन्शुरन्स कंपनी मान्य करेल तेव्हाच पॉलिसीहोल्डर या रायडरचा फायदा होईल.
5. Life Stage रायडर
Life Stage रायडर हे एक Extra रायडर तुम्ही तुमच्या Term Insurance पॉलिसीमध्ये Add करू शकता. Life Stage म्हणजे लाइफच्या ठराविक टप्प्यानंतर जस की लग्न होणे किंवा मुल होणे इ. मध्ये तुम्ही तुमचं Term Insurance कव्हर वाढवू शकता. जर तुम्ही पॉलिसी घेताना हा रायडर पण Add केलत तर जेव्हा अशी एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होइल तुमचं Term Insurance कव्हर आपोआप वाढवलं जाईल. जेव्हा तुमच्यावर फॅमिलीमधील अनेक जण अवलंबून असतात तेव्हा तुमच्या पॉलिसीचा कव्हर वाढविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. अस केल्याने तुम्हाला अजून नवीन पॉलिसी काढायची गरज लागणार नाही.
पण हे रायडर सगळ्यांनी नाहीये खास करून जर तुम्ही एक Married व्यक्ती आहात ज्याला मुल नकोय किंवा एक मूल हवय, मुल आहे पण मोठी झालेत किंवा एकदम वयस्कर कपल. हा रायडर लग्न न झालेल्या व्यक्तींसाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो जे पुढे जाऊन मुल प्लॅन करणार आहेत. (खर बोलू तर हे रायडर घ्यायची एवढी गरज नसते कारण जस लाइफमध्ये तुम्ही एक एक टप्पे गाठत जाता जस की लग्न, मुल त्यांचं शिक्षण तुमच goal असल पाहीजे की तुझी जास्त पैसै Invest करून Wealth कशी बनवाल. फक्तं Term Insurance च कव्हर वाढवून हे पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा पॉलिसीहोल्डरचा निधन पॉलिसी कालावधीच्या आधी होईल)
6. Return of premium रायडर
Term Insurance घेताना अनेकांना हाच प्रश्न नेहमीचं पडतो. समजा मी 40 वर्षासाठी Term Insurance पॉलिसी घेतली म्हणजे मांझ्या 65 व्या वयापर्यंत आणि त्यानंतर मला काहीच झालं नाही तर मला माझे पैसे मिळतील की नाही? अस वाटणे अगदीं साहजिक आहे पण आपण यासाठी एक छोटंस गणित करून बघुयात.
समजा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत
- जिथे तुम्ही साधी आणि सरळ टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढली
- जिथे तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढली पण सोबत रिटर्न ऑफ प्रीमियम हा रायडर घेतला
या दोन्ही ऑप्शनमध्ये पॉलिसी कालावधी तोच असेल – 40 वर्षे आणि पॉलिसी तुमच्या 65 व्या वया पर्यंत असेल.
आता पहिल्या ऑप्शन नुसार तुमचं पॉलिसी प्रीमियम येत आहेत 1,000 रुपये म्हणजे वर्षाला 12,000 रूपये म्हणजे टोटल 40 वर्षासाठी होतात
40 वर्षे * 12,000 रुपये = 4,80,000 रुपये
आता दुसऱ्या ऑप्शन जिथे तुम्ही रिटर्न ऑफ प्रीमियम हा रायडर निवडला आहे त्याच गणित करून बघू.
पण आता फरक एवढाच असेल की तुमचं प्रीमियम वाढवलं जाईल.
40 वर्षे * 18,000 रूपये = 7,20,000 रूपये
जर तुम्ही पहिला ऑप्शन निवडलात तर पॉलिसी कालावधीच्या आधी जर तुमचा मृत्यू नाही झाला तर तुम्हाला काहीच पैसे मिळत नाही. तुम्ही अगदी वय वर्ष 65 पर्यंत अगदी फिट आहात.
आणि जर तुम्ही दुसरा ऑप्शन निवडला आणि पॉलिसी कालावधी दरम्यान तुम्हाला काही नाही झालं तर तुम्हाला तुम्ही भरलेले सगळे प्रीमियम परत केले जातात.
आता हे ऐकून तुम्हाला वाटेल की अरे हा ऑप्शन तर बेस्ट आहे पण तस अजिबात नाही कारण
- तुम्हाला फक्त तुम्ही भरलेले प्रीमियमची रक्कम म्हणजेच 7,20,000 रुपये परत मिळणार आणि महागाईचा हिशोब केलात तर तेव्हा त्या पैशाची Value आजच्या Value पेक्षा खूप कमी असेल.
- दुसरं म्हणजे जर तुम्ही साधी टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढलीत आणि हे extra प्रीमियम जे तूम्ही भरणार आहात त्याची एका सिंपल इंडेक्स फंडमध्ये जरी SIP केलीत तरी तुम्हाला त्याचे रिटर्न जास्त मिळतील. (कारण तसही तुम्ही 40 वर्षे ती Extra रक्कम भरणार आहातच त्यापेक्षा SIP करा त्याचा फायदा जास्त होईल.)
18,000 रुपये – 12,000 रुपये = 6,000 रुपये (म्हणजे महिन्याला 500 रुपये समजा तुम्ही इनवेस्ट करत आहात तेही 40 वर्षासाठी तर किती पैसे होतील?)
500 दर महिना * 40 वर्षे
आपण रिटर्न फक्त 12% घेतला आहे जो एक सिम्पल इंडेक्स फंडमध्ये नक्की मिळतो. तुम्ही रिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शन घेतला की तुम्हाला टोटल 7,20,000 रुपये प्रीमियम म्हणून भरावे लागत आहेत. पण स्मार्ट बना आणि पाहिला ऑप्शन निवडा आणि एक्स्ट्रा रक्कमची SIP केल्यावर तुम्हाला 59,41,210 रुपये मिळतील. (आता काहींना असा प्रश्न पडेल की?)
टर्म इन्शुरेंस न घेता SIP केली तर?
आता हे मुद्दे जरा नीट समजून घ्या.
- टर्म इन्शुरेंस तुम्ही घेत आहात कारण जर तुमच्या जीवाला काही झाल तेही अगदी तरुण वयात तर तुमच्या फॅमिलीसाठी पुरेसा पैसा तुम्ही जमा केला असेल.
- आणि वय वर्ष 25 ते 50 किंवा 55 या दरम्यान तुमच्यावर जबाबदाऱ्या असतात जस की आई वडील, मूल बाळ आणि त्यांच शिक्षण इ.
- आणि या दरम्यान जर तुम्हाला काही झाल तर तुमच्या फॅमिलीवर मोठ आर्थिक संकट येऊ शकते आणि अशा वेळी टर्म इन्शुरेंस मदतीला नक्कीच येते.
- टर्म इन्शुरेंसला जेवढे पैसे लागतील त्याची SIP केली तर यापेक्षा जास्त पैसे बनवता येतील अस तुम्हाला वाटत असेल आणि यात काही चूक नाही पण SIP चे पैसे तुम्हाला कधी मिळणार जेव्हा 40 वर्षे पूर्ण होणार आणि त्याआधी घ्यायला गेलात तर तेवढी मोठी रक्कम झालीच नसेल.
- टर्म इन्शुरेंस घेतल्यावर अगदी त्या दिवासापासून तुमच्या जीवाला ते प्रोटेक्ट करत असत, टर्म इन्शुरेंस घेतल्यावर एखाद्या पॉलिसीहोल्डरचा मृत्यू कधीही होऊदेत, 1 महिन्याने, 5 वर्षाने किंवा 30 वर्षे इ. अशा वेळी टर्म इन्शुरेंसची पूर्ण रक्कम त्याच्या नॉमिनीला मिळते.
- पण हे तुम्ही SIP च्या बाबतीत नाही करू शकत. कारण SIP मध्ये लगेच 5 वर्षाने किंवा 10 वर्षाने 50 लाख एवढी रक्कम नाही जमा होत.
- SIP हे एक प्रॉडक्ट आहे जिथे तुम्ही पैसे वाढवू शकता तेही लॉन्ग टर्ममध्ये आणि Term Insurance हे अस प्रॉडक्ट जे फक्त आणि फक्त तुमच्यानंतर तुमच्या फॅमिली आर्थिक सपोर्ट देण्यासाठी बनल आहे. या दोघांमध्ये कन्फ्युज होवू नका.
मुद्दा असा होता की टर्म इन्शुरेंस घ्या पण त्यासोबत कधी रिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शन घेऊ नका. इन्शुरेंस कंपनी खूप सारे फायदे सांगून आपल्याला वेड बनवत असतात पण आपण शहाणे बनायच आहे.
(एक रायडर समजायला खूप लिहाव लागळ कारण यामध्ये खूप जण कन्फ्युज होतात. आता हे सगळे रायडर्स समजून तर घेतले आता पुढे प्रश्न असा पडतो की?
ही पोस्ट पण नक्की वाचा: Zero Cost Term Insurance काय आहे?
Term Insurance घेताना कोणते रायडर घेऊ आणि कोणते नको ?
यासाठी तुम्ही प्रत्येक रायडरला नीट समजून घ्या. पण तरीही मी कोणता घेऊ नका हे नक्कीच सांगेन ते म्हणजे रिटर्न ऑफ प्रीमियम रायडर. बाकी रायडर्स पैकी तुम्ही तुमच्यासाठी कोणता योग्य आहे हे निवडा आणि तुमच्या टर्म इन्शुरेंस पॉलिसीमध्ये Add करा आणि यासाठी जास्त खर्च येत नाही. थोडफार प्रीमियम वाढेल पण यामुळे तुमची टर्म इन्शुरेंस पॉलिसी मजबूत बनेल.
Term Insurance Riders का घेतले पाहिजेत?
- Term Insurance घेताना रायडर्स का घेतले पाहिजेत याची काही ठोस कारणे पुढीलप्रमाणे
- Term Insurance घेताना कदाचित तुम्ही मोठ्या Cover साठी मोठी रक्कम निवडाल पण ती रक्कम सगळ Cover करायला पूर्ण नसेल. पण योग्य ते रायडर्स Add करून खूप कमी खर्चात तुम्ही पॉलिसीमधून चांगले Benefit करून घेऊ शकता.
- Term Insurance घेताना जर योग्य रायडर्स Add केलेत तर तुम्हाला अजून एक पॉलिसी घेण्याची गरज पडणार नाही जर त्या पॉलिसीमध्ये काही कमी असेल. कारण दुसरी पॉलिसी काढणे आणि त्याचा वेगळा प्रीमियम भरणे हे रायडर्स घेण्यपेक्षा खूप महाग असेल.
- ज्या प्रकारे Term Insurance पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स ॲक्टमधील Section 80C च्या अंतर्गत सुट मिळते तसच जेव्हा तुम्ही एखाद रायडर्स Add करता त्यातून मिळणारे रक्कमसुद्धा टॅक्स फ्री असते.
थोडक्यात सांगायचं झालं तर, Term Insurance मध्ये रायडर्स Add करणे हा एक चांगला निर्णय आहे जर तुम्ही घरचे एकटे कमविते व्यक्ती आहात आणि तुमच्यावर सगळ्यांची जबाबदारी आहे.
आपण या पोस्टमध्ये काय शिकलो?
Term Insurance च्या जगात एक चांगली पॉलिसी घेताना रायडर्स Add करणे खूप फायद्याचं ठरत त्यामुळे तुमचं Insurance Cover चांगल्याप्रकारे वाढतं. असे रायडर्स निवडा जे तुमच्या गरजेचे आहेत. एखादी अचानक झालेलं Accident असो की एखादी Critical Illness अशा वेळी रायडर्स खूप कामी येतात. पण हा, रायडर्स Add करताना किती खर्च येतो ते नीट बघा आणि योग्य तो निर्णय घ्या. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं Term Insurance घ्यायला उशीर करू नका. जितका उशीर करणारं तितकं तुमचं प्रीमियम वाढत जात. All the best!
6 thoughts on “Term Insurance Riders काय आहेत? घ्यायचे की नाही?”