Kross Ltd IPO: – SEBI सोबत ₹५०० कोटी IPO ची प्रक्रिया सुरू

Rate this post

जमशेदपूर-आधारित Kross Ltd ने IPO द्वारे ₹500 कोटी उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे कागदपत्रे सबमिट केले आहेत. क्रॉस लिमिटेडने अस करून त्यांच्या Growth Story च्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनी बिझीनेस वाढवण्यासाठी आणि विकासासाठी शेअर मार्केटमध्ये टॅप करू पाहत असल्याने हा एक महत्त्वाचा क्षण आहे.

IPO मध्ये ₹250 कोटी रुपयांचे शेअर्सचे नवीन इश्यू आणि Promotors कडून ₹250 कोटी पर्यंतच्या शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) अस टोटल ₹500 करोड रुपये उभारण्याचा प्लॅन आहे. लक्ष द्यायची बाब अशी आहे की, ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मधून असे दिसून आले आहे की OFS भागामध्ये सुधीर राय यांचे ₹168 करोड आणि अनिता राय यांचे ₹82 करोड इक्विटी शेअर्स सामील आहेत. (थोडक्यात Promotors शेअर्स विकत आहेत)

Kross Ltd चा बिझनेस फोकस काय आहे? 

क्रॉस लिमिटेड उत्पादन आणि पुरवठा क्षेत्रातील एक प्रमुख खेळाडू आहे, ट्रेलर एक्सल आणि सस्पेंशन असेंब्लीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करते. मिडीयम आणि Heavy कमर्शियल वाहनांसाठी तसेच शेतात वापरले जाणारे अवजारे यासाठी हाई परफॉर्मन्स पार्टस बनविण्यात क्रॉस लिमिटेड कंपनी माहीर आहे.

Kross Ltd या पैशाचा वापर कसा करेल?

कंपनीने फ्रेश इश्यूमधून जमा केलेल्या पैशाचा वापर करण्यासाठी एक धोरणात्मक योजना आखली आहे.

  • कॅपिटल Expenditure: – ₹70 कोटी एवढा महत्त्वाचा भाग Capital Expenditure च्या गरजा पूर्ण करण्यासाठी राखून ठेवलेला आहे, प्रामुख्याने मशिनरी आणि इतर equipments.
  • Debt Repayment: – आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ₹90 करोड, हा बँक आणि इतर Financial Institutions कडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वापरला जाईल.
  • Working Capital: – ₹30 करोड एवढी रक्कम दैनंदिन जीवनात बिझीनेससाठी लागणाऱ्या खर्चासाठी वापरला जाईल.
  • General Corporate Purposes: – उरलेले पैसे इतर महत्वाच्या गोष्टींसाठी वापरला जाईल.

Kross Ltd IPO

Kross Ltd कंपनीचे Client कोण आहेत?

क्रॉस लिमिटेड कंपनीचे महत्वाच्या क्लायंटमध्ये Ashok Leyland आणि Tata International DLT Private Limited यांचा समावेश होतो.

क्रॉस लिमिटेड त्यांचे प्रोडक्ट विविध प्रकारच्या कस्टमरना पुरवते जसं की मोठे Original Equipment Manufacturers (OEM, टियर वन पुरवठादार, घरगुती डीलर्स आणि ट्रेलर एक्सल आणि सस्पेंशन बिझीनेसमध्ये गुंतलेल्या फॅब्रिकेटर्ससह विविध क्लायंट सामील आहेत.

नुकतच क्रॉस लि.ने व्यावसायिक वाहनांसाठी प्रोपेलर शाफ्ट बनवणारी स्वीडन-आधारित कंपनी, Leax Falun AB आणि व्यावसायिक वाहनांमध्ये एक्सपर्ट असलेली जपान-आधारित असलेल्या कंपनीसोबत OEM आपली बिझनेस Relationships वाढवले आहेत.

Kross Ltd कंपनीचे Promotors कोण आहेत?

सुधीर राय:- चैरमन आणिमैनेजिंग डायरेक्टर

अनिता राय:- Whole Time डायरेक्टर

सुमित राय:- Whole Time डायरेक्टर

कुणाल राय:- Chief Financial Officer

Kross Ltd IPO कधी लिस्ट होणार आहे?

IPO यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, क्रॉस लिमिटेडचे इक्विटी शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) या दोन्हीं एक्सचेंजवर लिस्ट केले जातील. (लवकरच क्रॉस लिमिटेड IPO वर डिटेल पोस्ट येईल, मराठी फायनान्सच्या इन्स्ताग्राम पेजला जॉईन व्हा👉 (@marathifinance))

Aspect Details
IPO Size ₹500 Crore
Structure Fresh Issue: ₹250 Crore, OFS: ₹250 Crore (₹168 Crore Sudhir Rai, ₹82 Crore Anita Rai)
Lead Manager Equirus Capital
Potential Pre-IPO Placement Up to ₹50 Crore (May impact fresh issue size)
Utilization of Proceeds Capital Expenditure: ₹70 Crore, Debt Repayment: Up to ₹90 Crore, Working Capital: ₹30 Crore, General Corporate Purposes
Business Focus Trailer Axle, Suspension Assembly, Forged and Machined Parts for M&HCV and Farm Equipment
Key Clients Ashok Leyland, Tata International DLT, Leax Falun AB (Sweden), Japan-based OEM
Promoters Sudhir Rai (Chairman and MD), Anita Rai (Whole-Time Director), Sumeet Rai (Whole-Time Director), Kunal Rai (CFO)
Listing BSE and NSE

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

20s मध्ये 5 MONEY MISTAKES टाळा

Term Insurance Riders काय आहेत?

Index Fund काय आहे? (Detail Information in Marathi)

1 thought on “Kross Ltd IPO: – SEBI सोबत ₹५०० कोटी IPO ची प्रक्रिया सुरू”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi