7 TRICKS ज्या तुम्हाला जास्त खर्च करण्यास भाग पाडतात | Diwali Shopping Tips

Rate this post

दिवाळीचा सीजन येत आहे आणि त्या सोबत शॉपिंगचा सीजन पण. 

दिवाळी शॉपिंगमध्ये तुम्ही खरेदी ऑनलाईन करा ऑफलाईन खूप सारे Sale आणि मग त्यासोबत खूप सारे Discounts आपल्याला बघायला मिळतात. मला माहित आहे या पैकी खूप सारे Discounts आणि ऑफर खऱ्या असतात पण दुकानदार तसेच ऑनलाईन विक्रेते या ऑफर्सना आकर्षक बनवतात काही ट्रिस्कचा वापर करून. 

या पोस्टमध्ये आपण अशा 7 ट्रिक्सना समजून घेणार आहोत ज्याचा वापर आपल्यावर केला जातो जेणेकरून आपण जास्त खरेदी करू आणि जास्त पैसे खर्च करू. 

चला तर सुरुवात करूया. 

1. Decoy Price 

Decoy Price या Strategy मध्ये तुम्हाला वस्तूंच्या अनेक किंमती दाखवल्या जातात जेणेकरून तुमच्या खरेदीच्या निर्णयाला बदलता येईल. ते कसं काय ते एका Example ने समजुन घेऊ. 

समजा तुम्ही एखादी वस्तू घेत आहात आणि तुम्ही 2 किमतींमध्ये अगदी कन्फ्युज आहात. एका प्रॉडक्टची किंमत आहे 99 आणि दुसऱ्या प्रॉडक्टची किंमत आहे 129. अशा वेळी अनेक जण ते 99 वाल प्रॉडक्ट घ्यायला जाणार हे दुकानदारला माहीत असत. त्यामुळे तो एक तिसरी किंमत दाखवतो ती म्हणजे 125. 

आता हे बघून प्रत्येकाला असच वाटत की थोडे पैसै टाकून म्हणजेच 4 रूपये Extra देण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये पण यालाच Decoy Price अस म्हणतात. यामध्ये महागडा ऑप्शन म्हणजे 129 रूपये वाला अपल्याला एवढा आकर्षक वाटत नाही. आणि जरी तुम्हाला 99 रुपयाच्या प्रोडक्टची गरज असेल तरीहि तुम्ही 125 रुपये खर्च करून येता कारण तुम्हाला ती Deal बेस्ट वाटते. पण एक गोष्ट नोटीस केलीत का तुम्ही कळत किंवा नकळत जास्त खर्च करून आलात.

Example: 

– प्रॉडक्ट A: Rs 99

– प्रॉडक्ट B: Rs 125 👈 (Decoy Price)

– प्रॉडक्ट C: Rs 129

2. वाढवलेल्या किंमती 

दुकानदार आणि खास करून हे ऑनलाईन शॉपिंग ॲप्सवाले, दिवाळी सीजनमध्ये अनेक प्रॉडक्टवर भारीभरकम Discount ऑफर करतात.

पण काही वेळा हा एवढा discount देण्यात त्यांचा जास्त फायदा असतो कसं ते आपण समजून घेऊत. एक प्रॉडक्ट आहे ज्याची खरी किंमत म्हणजे MRP 500 रुपये आहे आणि हे आता चांगल्या डिस्काउंटवर विकल जात आहे आणि त्याची किंमत 400 रुपये दिसत आहे. आता हे बघून आपल्याला वाटतं की “अरे व्हा, 500 रुपयाचा प्रॉडक्ट मला 400 मध्ये मिळत आहे”  आणि आपण ते प्रॉडक्ट विकत घेतो. 

पण खर बघायला गेलं तर त्या प्रॉडक्टची खरी किंमत 500 रुपये नसतेच. ते फक्त आपल्याला दाखवायला दिलेली असते. जरा विचार करा एवढा Discount देऊन यांना प्रॉफिट कसां होणार?

अस करून प्रॉडक्टच्या खोट्या किंमती म्हणजे Inflated MRP आपल्याला दाखवली जाते आणि मग त्यावर डिस्काउंट देऊन आपल्याला जास्त पैसे खर्च करण्यास मजबूर केलं जात.  

हे तुम्हाला ऑनलाईन ॲप्समध्ये खूप बघायला मिळेल. एखाद्या शॉपिंग सीजनच्या आधी काही प्रॉडक्टची किंमत कमी असते मग त्या किंमती वाढवून त्यावर डिस्काउंट दिलं जातं. (खास करून मोबाईल फोन आणि Laptops इ) 

3. जादूई आकडा 9

Charm Price ही एक Psychological ट्रिक आहे जीचा वापर खूप ठिकाणी केला जातो. ट्रिक खूप सिंपल आहे. कोणतेही प्रॉडक्ट असुदेत त्याचीं किंमत नेहमी 9 नंबरने संपवायची. याने होत काय आपल्या सारख्या कस्टमरना वाटत किंवा असा भ्रम होतो की प्रॉडक्टची किंमत कमी आहे. 

जेव्हा तुम्ही एखादा मोबाईल घ्यायला जाता ज्याची किंमत 19,999 रूपये असते हे बघून आपल्याला मेंदुला वाटत की याची किंमत फक्त 19,000 रूपये आहे. 

ही ट्रिक तुम्ही खूप वेळा बघत असाल, शॉपिंग ॲप्स असो ऑफलाईन मार्केटमधील एखाद दुकान. 9 नंबरने प्रॉडक्टच्या किंमती संपवल्याने त्या कमी आहेत अस आपल्याला वाटत आणि आपण जास्त खर्च करून येतो.

4. किमतीमधून Comma घालवणे 

ही एवढी मोठी ट्रिक नाही तरीही खूप सारे दुकानदार आणि ऑनलाईन ॲप्स याचा वापर करत असतात. 

या ट्रिकमध्ये प्रॉडक्टच्या किमतीमधून Comma हटवला जातो जेणेकरून कस्टमरला त्या प्रॉडक्टची किंमत कमी वाटेल. जेव्हा एखाद्या प्रॉडक्टच्या किंमतीमध्ये Comma नसतो तेव्हा आपल्या मेंदूला असा वाटत की किंमत कमी आहे. 

Example

Comma सोबत किंमत – 1,129

Comma नसताना किंमत – 1129

आता हे वाचताना एवढा फारसा फरक जाणवनार नाही पण तुम्ही जेव्हा Actual मध्ये शॉपिंग करायला जाल तेव्हा मात्र अशा किंमती बघून नीट विचार करा. 

तुमचा मेंदू तुम्हाला जास्त खर्च करण्यात तर Convince करत नाहीये याकडे लक्ष द्या.

5. खोटी Urgency बनविणे 

खूप सारे दुकानदार आणि खास करून ऑनलाईन ॲप्स एक प्रकारची Urgency बनवितात. उगाचच घाई करतात जेणेकरून तुम्ही ते प्रॉडक्ट लवकरात लवकर घ्याल. 

तुम्ही काही ठिकाणी असे मेसेज नक्कीचं पाहिले असतील जस की 

  • काहीच प्रॉडक्ट बाकी आहेत 
  • स्टॉक संपत आहे 
  • किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना Countdown दाखवल जात.

हे असे मेसेज बघून आपल्याला वाटत की लवकर विकत घेतो नाहीतर माझ्या हातातून चांगली ऑफर निघून जाईल आणि आपण पैसे खर्च करतो.

याच उदाहरण द्यायचं झालं तर मी स्वतः दिवाळीची शॉपिंग करत आहे आणि मी सहसा कपडे Myntra वरून विकत घेतो. तिथे सुद्धा या ट्रिकचा वापर केला जात आहे. 

आपण जेव्हा असे मेसेज बघतो तेव्हा एक प्रकारची घाई आपल्या Mind मध्ये क्रिएट होते किंवा आपण FOMO म्हणजे Fear of Missing Out चे शिकार होतो.

6. फॅमिली पॅक डिस्काउंट

एका प्रॉडक्ट घेतलात की त्यासोबत दुसरं फ्री मिळणार अशी ऑफर तुम्हाला दिली जाते. किंवा काही Bundle प्रॉडक्ट तुम्हाला दाखविले जातात. 

अशा ऑफर बघून कधी कधी गरच नसलेले प्रॉडक्ट आपण विकत घेतो. अशा ऑफर तुम्ही दिवाळीची शॉपिंग करायला जाल तेव्हा बघालच. मी अशा ऑफर Flipkart वर खूप पाहतो. आणि जर तुम्ही D Mart ला फेरी मारली असेल तर तिकडे अशा Bundle किंवा Combo ऑफर्स खूप बघायला मिळतात. 

Example:

  • 5 बॉटल्स खरेदी करा 3 बॉटल्सच्या किंमतीत 
  • मोबाइल फोन सोबत चार्जर आणि कवर कॉम्बो ऑफर 
  • अशा काही ना काही ऑफर्स (तुम्हाला आयडिया आली असेल) 

तुम्हाला कदाचित 3 बॉटल्स ची गरज नसेल पण अशी ऑफर बघून तुम्ही पैसे खर्च करता आणि कॉम्बो पॅक विकत घेता.

थोडक्यात काय तर नको तो खर्च होतो.

7. स्वस्त वस्तूचा भ्रम

ही एक नवीन ट्रिक आहे जी आजकाल मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

एखादी महागडी वस्तू तुम्ही EMI च्या मदतीने कशी विकत घ्याल हे दाखवल जात. या ट्रिकने एखादं महागडा प्रॉडक्ट खूप स्वस्त वाटायला लागतो. आताच नवीन iPhone 15 लाँच झाले आहेत. त्याच्या Ad मध्ये तुम्ही बघू शकता की कस्टमरला EMI चा ऑप्शन मोठ्या प्रमाणात दाखविला जातो.

Example:

– Monthly EMI: Rs 12,483 

– Original Price: 79,900

या अशा ऑफरना अनेक जण बळी पडतात आणि असे महागडे प्रॉडक्ट परवडत नसताना पण EMI वर खरेदी करतात. (काही दिवसांपूर्वी अशी न्यूज आली होती की इंडियामध्ये 7 पैकी 10 iPhone हे EMI वर घेतलेले असतात म्हणजे लोक या ऑफरना बळी पडत आहेत)

अशा मोहक ऑफर्सना तुम्ही कसे सामोरे जाणार? 

  • कोणताही प्रॉडक्ट घेताना आधी स्वतःला विचारा की मला या प्रॉडक्टची खरंच गरज आहे का? 
  • एखादी चांगली ऑफर दिसली की जरा नीट विचार करा की एवढी स्वस्त का आहे? किंमत तर बरोबर आहे ना? 
  • इतर ठिकाणी किंमती Compare करा आणि मगच हवं ते घ्या.

या पोस्टमधून आपण काय शिकलो?

दुकानदार आणि ऑनलाईन ॲप्सवरील अशा Tricks संबंधी जागरूक राहणे फार गरजेचं आहे. 

त्यामुळे कोणतही प्रॉडक्ट विकत घेताना तुम्हीं कळत नकळत जास्त खर्च करून येणार नाही. दिवाळी शॉपिंग असो की कोणत्याही प्रकारची शॉपिंग नेहमी सावध रहा. 

खूप सारी शॉपिंग करा पण जे गरजेच आहे तेच घ्या. Happy Diwali!

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi