Term insurance काय आहे? फायदे आणि तोटे (Detailed Information in Marathi)

5/5 - (1 vote)

टर्म इन्शुरेंसची बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल की जर तुमचे निधन झाल्यास तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचे रक्षण टर्म इन्शुरेंसमुळे करता येते.

टर्म इन्शुरेंस हा लाइफ इन्शुरेंसचा एक भाग आहे आणि लाइफ इन्शुरेंसची सर्वात महत्वाची कॅटेगरी जी एखाद्या व्यक्तीने आज खरेदी केली पाहिजे ती म्हणजे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स तुम्हाला टॅक्स वाचवण्याचे फायदे देते आणि सर्वात वाईट परिस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देते. याशिवाय टर्म प्लॅनमध्ये इतरही अनेक फायदे दिले जातात.

या ब्लॉगमध्ये आपण टर्म लाइफ इन्शुरन्स प्लॅनच्या सर्वात ठळक फायदे आणि तोटे तसेच टर्म लाइफ इन्शुरन्सची व्याख्या समजून घेणार आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी ही पोस्ट अगदी शेवटपर्यन्त वाचा.

Term Insurance चा अर्थ

टर्म या नावावरून समजल असेल की टर्म (Term) म्हणजे एक ठराविक कालावधी आणि या ठराविक कालावधीसाठी घेतलेला इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स होय. टर्म इन्शुरन्स हा लाइफ इन्शुरन्सचा एक भाग आहे.

टर्म लाइफ इन्शुरन्स हा एक प्रकारचा जीवन विमा आहे जो पॉलिसीहोल्डरला तात्पुरते आर्थिक संरक्षण प्रदान करतो. पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीहोल्डर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कंपनी त्याच्या नॉमिनीला डेथ बेनिफिट देते.

टर्म लाइफ इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी तो निवडण्याचे महत्त्वाचे फायदे आणि कारणे जाणून घेतली पाहिजेत.

टर्म इन्शुरन्स प्लॅन मनी-बॅक किंवा मार्केट-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसींपेक्षा कमी प्रीमियममध्ये खूप जास्त कव्हरेज देते पण मॅच्युरिटीला कोणताच लाभ देत नाही. लाइफ इन्शुरेंस खरेदीचे उद्दिष्ट पॉलिसीहोल्डरला त्याच्या कुटुंबाला जीवन संरक्षण आणि आर्थिक स्थैर्य देणे आहे.

तुम्ही टर्म इन्शुरेंस दोन प्रकारे खरेदी करू शकता:

  • टर्म इन्शुरेंस किंवा Pure लाइफ इन्शुरेंस पॉलिसी घेणे

  • Endowment पॉलिसी घेणे ज्यामध्ये Savings करण्याचा ऑप्शन असतो

Term Insurance चा बेसिक फंडा

समजा, तुम्ही आता २५ वर्षाचे आहात आणि तुम्ही अगदी वयाच्या ६५ पर्यन्त एक टर्म पॉलिसी काढणार आहात म्हणजेच ४० वर्षांसाठी टर्म पॉलिसी काढलीत.

आता हा ४० वर्षांचा कालावधी म्हणजे पॉलिसी टर्म झाला आणि या ४० वर्षाच्या कालावधीत जर तुमच्या जीवाला काही झाल किवा तुमची डेथ(Death) झाली तर टर्म पॉलिसीची रक्कम ही तुमच्या नॉमिनीला मिळते.

कधी विचार केलात का ? आपण कोणीच आपल्या मरणाचा विचार कधी करत नाही आणि कोणाला करायला आवडेल? पण आर्थिक नियोजन करताना हा एक महत्वाचा भाग आहे. आपण गेल्यानंतर आपल्या फॅमिलीकडे कोण लक्ष देईल याचा विचार प्रतेकयाने करायला हवा आणि त्यानुसार पैशाच नियोजन केल पाहिजे.

तुमच्या मनात प्रश्न हाच आहे ना? मला काही झालच नाही तर, मी भरलेल्या पैशाच काय? पण जरा विचार करा, पुढील ४० वर्षात आपल्या जीवाला काही होण्याची शक्यता किती आहे? खूप जास्त शक्यता आहे, बरोबर ना?

Term Insurance घेण्यासाठी किती खर्च येईल?

एक उदाहरण घेऊत, जर तुम्ही २५ चे असताना टर्म इन्शुरेंस घेतलात तर त्यासाठी वर्षाला १२,००० एवढ प्रीमियम येईल आणि तुम्हाला ५० लाखाच टर्म इन्शुरेंस मिळेल (कमी जास्त होऊ शकत). म्हणजे महिन्याला फक्त १,००० रुपये तुम्हाला प्रीमियम येईल.

फक्त ४,८०,००० देऊन तुम्ही स्वताला Insured करणार आहात आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे तुमच्या फॅमिलीवर कोणताही आर्थिक ताण येऊ नये याची तयारी करणार आहात. आणि हो, जर तुम्ही टर्म इन्शुरेंस लवकर घेतलात तर तुमचा प्रीमियम या पेक्षा कमी असेल कारण टर्म इन्शुरेंसमध्ये एकदा प्रीमियम फिक्स झाल की आयुषभर तेच राहत, त्यात बदल होत नाही. टर्म इन्शुरेंस जितक शक्य तितक लवकर घ्या.

Term Insurance चे फायदे

1) कमी प्रीमियम सोबत जास्त कवर 

लाइफ इन्शुरेंस घेण्याचा एक सध्या आणि सरळ प्रकार म्हणजे टर्म इन्शुरन्स पॉलिसी. टर्म इन्शुरन्सची कमी किंमत हा त्याचा मुख्य फायदा आहे. टर्म इन्शुरन्स प्लॅन इतर प्रकारच्या लाइफ इन्शुरन्सपेक्षा अधिक परवडणाऱ्या प्रीमियमवर दिला जातो. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही टर्म इन्शुरन्स प्रीमियम जितक्या लवकर खरेदी कराल तितका त्याचा प्रीमियम कमी असेल. समजा तुम्ही 21 च्या वयात टर्म इन्शुरेंस घेतलात आणि तुमचा प्रीमियम 1000 रुपये आला तर जितक्या टाइम साठी तुम्ही ती टर्म पॉलिसी घेतली असेल तुमचा प्रीमियम 1000 रुपयेच राहणार. याव्यतिरिक्त, डिजिटल पद्धतीने टर्म इन्शुरन्स खरेदी केल्यास ऑफलाइन पेक्षा कमी प्रीमियम मिळू शकतो.

2) डेथ झाल्यानंतर नॉमिनीला पैसे मिळण्याचे विविध पर्याय

तुम्ही एखाद काढलेल पर्सनल लोन, नवीन कार किंवा तुमच्या नवीन घरावरील ईएमआयची परतफेड करायची असेल. जर तुमच्या जीवाला काही झाल तर या आपण  आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी तुमच्या कुटुंबातील सदस्य जबाबदार असू शकतात. आणि अशा वेळीच टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे विविध पेआउट ऑप्शन अत्यंत महत्वाचे आहेत.

पॉलिसीहोल्डरच्या निधनाच्या दुर्दैवी घटनेनंतर टर्म इन्शुरेंस पॉलिसीची नॉमिनीला एकत्र रक्कम शकते जी त्याला वरील आर्थिक जबाबदाऱ्या मॅनेज करण्यात मदत करेल. काही टर्म इन्शुरन्स प्लॅन एकरकमी डेथ बेनिफिटव्यतिरिक्त दर महिन्याला पेमेंट मिळवण्याचा पर्यायही देतात. तुमच्या कुटुंबाला या दर महिन्याला मिळणाऱ्या इन्कममधून दररोजचे खर्च मॅनेज करणे सोपे होईल.

3) विविध प्रकारचे कर फायदे

टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यामागे आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचे रक्षण करणे ही मुख्य प्रेरणा असली तरी तुम्ही असे करून टॅक्सवरील पैसे देखील वाचवू शकता.

Section 10 (10D): टर्म लाइफ इन्शुरन्समध्ये, कलम १० (१० डी) नुसार मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारा पैसा टॅक्स फ्री असतो त्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स अजिबात लागत नाही.

Section 80C: या सेक्शन नुसार तुम्ही टर्म इन्शुरेंस पॉलिसीवर जो काही प्रीमियम भरता त्यावर 1.5 लाख एवढ्या रककमेवर तुम्ही टॅक्स बेनिफिट घेऊ शकता पण यात अट अशी आहे की तुमच्या पॉलिसीचा वर्षभराचा प्रीमियम हा पॉलिसी रककमेच्या 10% किंवा त्यापेक्षा कमी असावा.  (समजा, तुम्ही 50 लाखची टर्म इन्शुरेंस पॉलिसी घेतली तर त्याचा 10% म्हणजे 5 लाख आणि सहसा एवढा जास्त  प्रीमियम सामान्य माणसाचा तरी येत नाही त्यामुळे इन्कम टॅक्स भरताना तुम्ही 80C या सेक्शनचा फायदा घेऊ शकता.)

4) Term Insurance समजायला सोपा आहे

कोणताही लाइफ इन्शुरेंस प्लॅन समजायला गेलात तर खूप साऱ्या गोष्टी अगदी डोक्याच्या वरुन जातात आणि कोणतीही इन्शुरेंस कंपनी असो की त्यांचे एजेंट आपल्याला पुरेपूर माहिती कधीच देत नाहीत. पण या सगळ्यात टर्म इन्शुरेंस एक साधा आणि समजायला सोपा इन्शुरेंस प्रॉडक्ट आहे.

यामध्ये तुम्हाला एक ठराविक कालावधीसाठी टर्म इन्शुरेंस घ्यायचा आहे ज्यासाठी तुम्ही इन्शुरेंस कंपनीला प्रीमियम देणार आहात. समजा तुम्ही वयाच्या 25 ते अगदी 65 पर्यन्त एखादा टर्म प्लॅन घेतलात म्हणजे 40 वर्षासाठी तुम्ही पॉलिसी घेत आहात. या 40 वर्षात जर तुम्हाला काही झाल तर या पॉलिसीचा सगळा पैसा तुमच्या नॉमिनीला मिळतो.

5) एक्स्ट्रा राइडर्सची सोय 

आधी हे Rider म्हणजे नक्की काय ते समजा.

जेव्हा तुम्ही एखादी टर्म इन्शुरेंस पॉलिसी घेता त्यासोबत काही एक्स्ट्रा बेनिफिट हवे असतील त्याला Rider अस म्हणतात. समजा तुम्ही तुमच्या टर्म इन्शुरेंस पॉलिसीसोबत Accidental Death Benefit हा रायडर घेतलात तर एखाद्या Accident मध्ये जर तुमच्या जीवाला काही झाल तर तुमच्या नॉमिनीला टर्म इन्शुरेंस पॉलिसीचे पैसे त्यासोबत या एक्स्ट्रा Rider चे पैसे देखील मिळतात.

एक्स्ट्रा रायडर्स घेतल्याने तुमच टर्म इन्शुरेंस पॉलिसीच प्रीमियम थोड्या पैशाने वाढेल पण पॉलिसीला मजबूत बनवताना आपण या छोट्या रककमेकडे लक्ष नाही दिल पाहिजे.

खालील रायडर्स तुम्ही तुमच्या टर्म इन्शुरेंस पॉलिसमध्ये नक्की Add केले पाहिजेत

  1. Accidental Death Benefit Rider – आताच आपण समजून घेतल याबद्दल

  2. Accidental Disability Rider – जर एखाद्या अपघातात पॉलिसीहोल्डरचा हात गेला किंवा पाय गेला किंवा तो काम करण्याचे स्थितीत नाही राहीला तर हा Rider घेऊन तुम्ही अशा वेळी एक्स्ट्रा बेनिफिट मिळवू शकता.

  3. Critical Illness Rider – विविध प्रकारचे आजार आहेत त्यापैकी मोठे आजार म्हणजे कॅन्सर, हार्ट अटॅक किंवा किडनी फेल्यर इ. तसेच अजून 25+ अशा आजार झाल्यावर एक्स्ट्रा बेनिफिटसाठी Critical Illness Rider घ्यावा.

  4. Waiver of Premium: जर पॉलिसीहोल्डरला काही झाल आणि तो आता कोणत्याही प्रकारची इन्कम करू शकत नाही तर अशा वेळी टर्म इन्शुरेंस पॉलिसीचे पुढील प्रेमीयम माफ केले जातात जर पॉलिसी काढताना तुम्ही  Waiver of Premium हा Rider घेतला असेल.

6) Term Insurance इतर लाइफ इन्शुरेंस पॉलिसीच्या तुलनेत कव्हरेज प्रदान करते

पारंपारिक, यूलिप (ULIP – Unit Linked Insurance Plan) किंवा एंडोमेंट पॉलिसी (Endowment Policies) एकूण इन्शुरेंसची रक्कम वार्षिक प्रीमियमच्या 7 -10% पर्यंत असते. दुसरीकडे, टर्म प्लॅनमध्ये इन्शुरेंसची रक्कम लक्षणीय प्रमाणात दिली जाते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी  पुरेसे पैसे सोडण्यास अनुमती देता. जेणेकरून त्यांना तुमच्या अनुपस्थितीत त्रास कोणत्याही प्रकारचा आर्थिक त्रास होणार नाही. दुसऱ्या शब्दांत, टर्म इन्शुरन्स प्लॅन पारंपारिक, यूलिप किंवा एंडोमेंट पॉलिसीपेक्षा अंदाजे 60 पट जास्त कव्हरेज प्रदान करते.

7) Term Insurance च्या काही खास गोष्टी 

इन्शुरेंस कंपन्या त्यांच्या विविध पॉलिसीसमध्ये सतत काहीतरी नाविन्यपूर्ण बदल करण्यास तत्पर असतात, परंतु टर्म प्लॅन्समध्ये त्यांच्याकडून सर्वात जास्त नाविन्य दिसून आले आहे. टर्म प्लॅन अगदी आहे तसेच साधे आणि समजायला सोपे आहेत आणि हेच त्यांना इतर इन्शुरेंस प्रॉडक्टपेक्षा खास बनवते.

धूम्रपान न करण्याऱ्या लोकांना अतिरिक्त सूट प्रदान करण्यात इन्शुरेंस कंपन्या नेहमीच तत्पर आणि सक्रिय आहेत. इंटरनेटमुळे टर्म इन्शुरन्स खरेदी करणे खूप सोयीस्कर झाले आहे. अजून एक गोष्ट म्हणजे काही इन्शुरेंस कंपन्या जर तुम्ही अगदी फिट आणि फाइन असाल तर कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता ऑनलाइन टर्म प्लॅन खरेदी करण्यास परवानगी देतात.

Term Insurance तोटे काय आहेत? 

1. नो कॅश Value

Term Insurance मध्ये कोणत्याही प्रकारचं Investment चा भाग नसतो. तुम्ही एका ठराविक कालावधीसाठी टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढून त्यासाठी प्रीमियम भरता. पण हे प्रीमियम काही Savings किंवा Investing म्हणून केलं जात नाही. जर पॉलिसीच्या कालावधी दरम्यान पॉलिसीहोल्डरचा मृत्यू नाही झाला (जी चांगली गोष्ट आहे) तर ते पैसे परत भेटत नाही. 

2. फारसे बदल करता येत नाही

Term Insurance एक साधा आणि सोपा Financial Product आहे ज्यांच उद्देश एकच असत की पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाला की त्याचा फायदा नोमिनीला पैशाच्या रूपाने द्यायचा. Term Insurance घेताना फारसे ऑप्शन मिळत नाही. फक्तं रायडर Add करायचा ऑप्शन असतात. 

3. वेळेसोबत महाग होत जात

तुम्ही Term Insurance जितक्या लवकर घेणार तेवढं तुम्हाला ते स्वस्त पडेल. जस तुमचं वय वाढतं जाणार ते अजून महाग होत जात. खूप उशीर केल्यास नंतर प्रीमियम एवढं येत की अजिबात परवडत नाही. 

आपण काय पोस्टमध्ये काय शिकलो? 

Term Insurance एक अस Financial प्रॉडक्ट आहे जे प्रत्येक व्यक्तीकडे असल पाहिजे. आपण याचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेतले. पण माझं स्पष्ठ मत आहे की तुम्ही टर्म इन्शुरन्सचे जे तोटे आहेत त्याकडे दुर्लक्ष करा. सहसा मी एखाद्या प्रॉडक्टच्या विषयी बोलत नाही पण टर्म इन्शुरन्सचे फायदे हे जास्त आहेत. तुमच्या नंतर तुमच्या फॅमिलीसाठी एक आर्थिक सपोर्ट म्हणून टर्म इन्शुरन्स नेहमीच एक योग्य निर्णय असेल.

मी संगळ्यांना आवर्जून सांगेन की जर तुम्ही लाइफ इन्शुरेंस पॉलिसी घेतली नसेल तर टर्म इन्शुरेंस हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि जितक्या लवकर घ्याल तेवढ जास्त फायद्यात राहाल. भेटू आता पुढच्या पोस्टमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन! 

इतर महत्वाच्या पोस्टस:-

Direct Fund Vs Regular Fund (कोणता फंड घ्यायचा?)

Sector Funds काय आहेत? इनवेस्ट कराव की नाही?

SIP काय आहे? फायदे आणि तोटे जाणून घ्या.

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi