Zero Cost Term Insurance नक्की आहे तरी काय? Term Insurance आणि Zero Cost Term Insurance मध्ये नक्की फरक काय आहे? आणि Zero Cost Term Insurance खरंच झिरो कॉस्टवर मिळणार का ? नक्की चक्कर काय आहे? हेच आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया.
आजकाल YouTube असो की Instagram वरील पेजेस सगळीकडे Zero Cost Term Insurance ची चर्चा केली जात आहे. आता नावात झीरो कॉस्ट असं सांगितल आहे, हे ऐकल्यावर कोणालाही वाटेल की इन्शुरन्स कंपनी आपल्याला फ्रीमध्ये टर्म इन्शुरन्स पॉलिसी देत आहे. पण नीट तपासून पाहिलं तर सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, फायनान्सच्या जगात फ्री अस काहीच नसत. काही ना काही लपलेली किंमत आपल्याला द्यावी लागते. बहुतेक लोकांना या किंमतीचा पत्ता कधी लागतच नाही कारण अनेक कंपन्या हे लपवण्यात एकदम एक्स्पर्ट झाल्या आहेत.
Zero Cost Term Insurance काय आहे?
Zero Cost Term Insurance ला समजून घेण्या आधी तुम्ही Term Insurance काय हे समजून घेतलं पाहिजे (आणि यासाठी तुझी ही पोस्ट वाचा) पण तरीहि थोडक्यात सांगायचं झालं तर Term Insurance म्हणजे की एका ठराविक टाईमसाठी काढलेला इन्शुरन्स. या कालावधीत जर पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाला तर Term Insurance ची सगळी रक्कम त्याच्या नोमिनीला मिळते.
पण जर का पॉलिसीहोल्डर काही झालं नाही, त्याचा मृत्यु नाही झाला तर त्याला त्या ठराविक कालावधीनंतर काही रक्कम मिळत नाही. त्याने जे प्रीमियम भरले आहेत ते देखील त्याला परत मिळत नाही. आणि हेच सगळ्यात मोठे कारण आहे की अनेक लोक Term Insurance घेण्यास टाळाटाळ करत असतात. त्यांना वाटत की यामध्ये मोठा लॉस होत आहे.
आणि खास अशा लोकांसाठी इन्शुरन्स कंपन्यांनी Return of Premium चा ऑप्शन चालू केला आहे. Return of Premium म्हणजे Term Insurance च्या ठराविक कालाधीत पॉलिसीहोल्डरचा मृत्यु नाही झाला तर प्रीमियम म्हणून भरलेले सगळे पैसे रिटर्न मिळतात. आता हे एकायला खूप बरं वाटतं, आणि पैसे रिटर्न मिळणार तर कोणाला नाही आवडणार? पण इन्शुरन्स कंपन्यां हे फुकटमध्ये तर करत नाहीत. यासाठी एका साध्या Term Insurance पॉलिसीपेक्षा Return of Premium मध्ये तुम्हाला जास्त Premium भराव लागते. आता Return of Premium पण खूप महाग असतात म्हणून लोकं घेत नाहीत आणि म्हणून इन्शुरन्स कंपन्यांनी आजकाल Zero Cost Term Insurance ही नवीन ऑप्शन चालू केला आहे.
(हे नक्की वाचा :- टर्म इन्शुरन्स काय आहे?)
Zero Cost Term Insurance ला एक उदाहरण घेऊन समजुयात.
समजा, एका व्यक्तीचं वय आता ३० वर्षे आहे आणि त्याने १ करोडच Zero Cost Term Insurance घेतलं आहे. आणि त्यासाठी तो दर वर्षाला १५,००० रुपये + २७०० रुपये GST म्हणजे टोटल १७,७०० रुपये भरत आहे.
परिस्थिती नंबर १
आता अस समजा की, १० वर्षानंतर त्याला अस वाटलं की आता मला Term Insurance ची फारशी गरज नाहीये, त्याच्यावर फारस कोणी जबाबदार नाहीये, मुलांचं शिक्षण झालं आहे इत्यादी. त्यामुळे आता त्याने Term Insurance पॉलिसी बंद करायचं ठरवलं आहे.
अशा परिस्थितीत इन्शुरन्स कंपनी काय करते त्याने पहिले १० वर्षे जितकं प्रीमियम भरलं होत ते सगळ त्याला रिटर्न करते.
१० वर्षे × १५,००० रुपये = १,५०,००० रुपये
एक गोष्ट लक्षात घ्या की GST चे पैसे पुन्हा रिटर्न मिळतं नाही म्हणून फक्तं १५,००० घेतले आहेत.
परिस्थिती नंबर २
त्याला अस वाटत की Zero Cost Term Insurance पॉलिसी बंद न करता असच चालू ठेवाव, तर काय होईल?
जर पूर्ण ३० वर्षे त्याने प्रीमियम भरले आणि त्याच्या जीवाला काही झालं नाही किंवा त्याचा मृत्यु झाला नाही तर इन्शुरन्स कंपनी त्याने भरलेल्या सगळ्या प्रीमियमचे पैसे त्याला रिटर्न देते.
३० वर्षे × १५,००० रुपये = ४,५०,००० रुपये
मुद्दा असा आहे की
Zero Cost Term Insurance मध्ये तुम्ही पॉलिसी काही वर्षांनी बंद करा किंवा पूर्ण प्रीमियम भरा. पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला की तुम्हाला तुमच्या प्रीमियमचे सगळे पैसे रिटर्न मिळतात. आणि म्हणून याला इन्शुरन्स कंपन्या Zero Cost Term Insurance अस बोलतात.
कारण जस आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं की पॉलिसी पूर्ण झाली आणि ज्याने पॉलिसी काढली आहे म्हणजे पॉलिसीहोल्डर त्याचा मृत्यूसुध्दा झाला नाही तर इन्शुरन्स कंपनी सगळे पैसे रिटर्न देते. त्यामुळे बघायला गेलं तर जोपर्यंत पॉलिसी चालू होती म्हणजे ३० वर्षासाठी, तो पर्यंत टर्म इन्शुरन्सचे कव्हर पॉलिसीहोल्डरला मिळणार होतच म्हणजे १ करोड. आणि काही झालं नाही तर सगळे प्रीमियमचे पैसे पण रिटर्न. हे नीट समजून घ्या की, ती १ करोड कव्हरची रक्कम तेव्हाच नॉमिनीला तेव्हाच मिळते जेव्हा पॉलिसीहोल्डरचा मृत्यू होतो.
हे सगळ वाचून किती मस्त वाटत ना! की राव किती मस्त प्लॅन आहे. पण जरा थांबा आणि डोक्यावर थोडा जोर द्या आणि मी सुरूवातीला काय बोललो होतो की फायनान्समध्ये किंवा बिझनेसमध्ये काहीच फ्री अस नसत. तेच आपण खालील प्रश्नांच्या मदतीने नीट समजून घेऊ.
कोणती कंपनी Zero Cost Term Insurance पॉलिसी देते?
सद्या मार्केटमध्ये सगळ्याच इन्शुरन्स कंपन्या Zero Cost Term Insurance पॉलिसी देत नाहीत. काही नेमक्याच कंपन्या ही सुविधा देतात जस की Bajaj Allianz, HDFC Life, ICICI Pru Life, and Max Life. पण फ्युचरमध्ये अनेक कंपन्या ही सुविधा द्यायला सुरुवात करतील एवढं नक्की.
Zero Cost Term Insurance मध्ये टॅक्सची बचत होते का?
सद्या इन्शुरन्स कंपन्यांकडून यावर पूर्ण Clarity नाही पण जेव्हा तुम्ही तुमच्या प्रीमियमचे पैसे रिटर्न घेता ते टॅक्स फ्री असतात. आणि जेव्हा तुम्ही पॉलिसीचे प्रीमियम भरत असता तेव्हा तुम्ही त्यावर सेक्शन 80C च्या अंतर्गत टॅक्स deduction घेऊ शकता. (टॅक्स हा जरा किच्कड विषय आहे तरीहि आपण यावर पुढे येणाऱ्या ब्लॉग पोस्टमध्ये डिटेलमध्ये चर्चा करूच🤝)
तुम्ही हवं तेव्हा Zero Cost Term Insurance पॉलिसीमधून बाहेर पडू शकता का?
नाही! बाहेर पडण्यासाठी काही नियम इन्शुरन्स कंपनी तुमच्यावर लागू करते जस की पॉलिसीच्या १५-२० वर्षानंतर तुम्ही बाहेर पडू शकता पण पॉलिसीच्या शेवटच्या ५ वर्षामध्ये नाही. आणि हो हे सगळ पॉलिसी काढताना तुमच्यापासून लपवलं जात नाहीतर पॉलिसी फॉर्मवर अगदी बारीक बारीक अक्षरात लिहिलेले असते. जरा सावध रहा.
Zero Cost Term Insurance Vs Term Insurance फरक स्पष्ट करा.
- दोन्ही प्रकारच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जर पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाला तर त्याच्या नोमिनिला टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळतात.
- Zero Cost Term Insurance मध्ये जर तुम्ही पॉलिसी पूर्ण व्हायच्या आधीच बाहेर पडलात तर तुम्हाला तुम्ही जितके premium भरले असतील ते रिटर्न मिळतात. पण नॉर्मल Term Insurance मध्ये तुम्हाला काही पैसे रिटर्न मिळत नाहीत जर तुम्ही पॉलिसी मध्येच बंद केलीत.
- Zero Cost Term Insurance मध्ये जर पॉलिसी पूर्ण होईपर्यंत जर पॉलिसीहोल्डरला काही झालं नाही तर त्याने भरलेले प्रीमियमचे पैसे त्याला परत मिळतात पण नॉर्मल Term Insurance मध्ये काही परत मिळतं नाही.
- नॉर्मल Term Insurance च्या तुलनेत Zero Cost Term Insurance चा प्रीमियम जरा जास्त असतो.
Zero Cost Term Insurance चे नुकसान
वरील फायदे कितीही चांगेल वाटत असले तरीही त्यामध्ये काही Negative पॉइंट्स लपलेले आहेत त्यामूळे आपण यावर चर्चा करुयात.
- जस आपण अगदी सुरुवातपासूनच बोलत आलोय की काही फ्री नसत. Return of Premium प्लॅन देणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा Zero Cost Term Insurance जास्त फायदेशीर वाटत ते अगदी बरोबर आहे. पण नॉर्मल Term Insurance च्या तुलनेत हे खूप महाग असत. आणि एक वेळ तुम्ही Zero Cost Term Insurance प्लॅन घ्या पण Return of Premium वाला टर्म इन्शुरन्स प्लॅन अजिबात घेऊ नका. (आता मी अस का बोलतोय यावर एक डिटेल पोस्ट बनवावी लागेलच)
- Zero Cost Term Insurance पॉलिसीमधून तुम्ही हवं तेव्हा बाहेर पडू शकता अस इन्शुरन्स कंपनी कितीही ओरडून सांगत असेल तरीही परिस्थिती फार वेगळी असते. बाहेर पडू शकता पण इन्शुरन्स कंपनीच्या Terms आणि Conditions ना पूर्ण केल्यावरच.
आता तुम्हाला एक काम करायचं आहे?
जेव्हा पण तुम्ही Term Insurance पॉलिसी काढायला जाणार तेव्हा तुम्हाला तिन्ही Options तपासून पाहायचे आहेत
ऑप्शन नंबर १ – एक साधा सोपा Term Insurance Plan (जिथे पॉलिसी संपली की प्रीमियम रिटर्न मिळतं नाही पण वर्षाला प्रीमियम खूप खूप स्वस्त असते)
ऑप्शन नंबर २ – Zero Cost Term Insurance Plan (जिथे रिटर्न परत मिळतं पण सोबत काही Conditions पण असतात, पाहिल्या ऑप्शनपेक्षा इथे रिटर्न थोड महाग असत)
ऑप्शन नंबर ३ – Return of Premium Plan (मी हे कधीचं आणि कोणालाच Recommned करत नाही. कारण पॉलिसी संपली की इथे प्रीमियम तर रिटर्न मिळेल पण मागच्या दोन्ही ऑप्शन्सपेक्षा इथे सगळ्यात जास्त प्रीमियम भराव लागेलं)
आपण या पोस्टमधून काय शिकलो?
Zero Cost Term Insurance मध्ये नुसत मोठा Zero लावला की तो प्लॅन फ्री होत नाही. एखाद्या सिंपल Term Insurance Plan पेक्षा हे खूप कीच्कड आहे. आणि यासोबत खूप साऱ्या Conditions पण येतात. मी तर एक साधा सरळ Term Insurance Plan घेतला आहे ज्यामध्ये पॉलिसी संपली की रिटर्न वेगेरे काही मिळतं नाही कारण मला ते योग्य वाटत. बाकी आता तुम्ही ठरवा की तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन कोणता.
पोस्ट वाचून काहीतरी नवीन शिकलात याची खात्री मला आहे. त्यामुळे पोस्ट आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटू आता पुढच्या पोस्टमध्ये. तो पर्यंत काळजी घ्या. Keep Investing, Keep Learning!
Information Sources :- basunivesh.com, Economic Times, YouTube Videos
2 thoughts on “Zero Cost Term Insurance काय आहे?”