प्रत्येक जण अर्थिकरित्या सक्षम होण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि केलाच पाहिजे. कारण म्हातारपणी आता केलेली Saving आणि Investing कामी येते. PGIM India Mutual Fund ने नुकतच एक survey केला त्यात अस आढळून आले की, भारतामध्ये Retirement संबंधीचा Mindset लोकांचा आता बदलायला लागला आहे. हा Survey टोटल 3009 Respondents च्या मदतीने केला गेला.
या सर्वेमध्ये अस आढळून आले की, 2023 मध्ये 67% लोकांचा असा विश्वास आहे की ते रिटायरमेंटसाठी तयार आहात. आधी हाच आकडा 49% वर होता. याचा अर्थ असा की या काही वर्षात लोक त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनिंगला खूप Seriously घेत आहेत.
कोरोना आला पण Priorities बदलल्या
अजित मेनन जे PGIM India म्यूचुअल फंड कंपनीचे CEO आहेत त्यांनी अस सांगितल की, कोरोना महामारीने Retirement संबंधीचा लोकांचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे. आजकाल लोक फॅमिलीसोबत लोक स्वतचा विचारसुद्धा करत आहेत. लोकांच्या Mindset मध्ये झालेला हा बदल त्यांना त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी त्यांना Motivate करत आहे.
संगीत कौर (SVP of behvaiour Finance & Consumer Insights) यांनी अस म्हटल की Retirement प्लॅनिंगसाठी एक पॉजिटिव ट्रेंड बघायला मिळत आहे. त्यांनी सांगितल इन्वेस्टरमध्ये हा झालेला बदल हा इन्वेस्टरचा बदलता स्वभाव आहे. आणि यामध्ये मार्केटमधील विविध प्रॉडक्टचा देखील सहभाग आहे. संगीत कौर यांनी सांगितल की शॉर्ट टर्ममध्ये Emotions वर कंट्रोल ठेवण्यास सांगितल जेणेकरून तुम्ही लॉन्ग टर्ममध्ये योग्य रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता.
PGIM India MF Retirement Survey या सर्वेमधील काही महत्वाचे पॉईंट्स
Financial Allocation
भारतीय लोक त्यांची 59% इन्कम ही घरचे खर्च पूर्ण करण्यासाठी वापरत आहेत. त्यासोबत 18% इन्कम ही एखाद लोन वेगेरे फेडण्यासाठी वापरली जात आहे.
स्किल डेवलपमेंट
5% एवढी इन्कम ही खास करून नवीन स्किल शिकण्यासाठी किंवा एखाद एड्युकेशन लोन फेडण्यासाठी वापरली जात आहे. जमाना असा आला आहे की आजकाल 6 महिन्यात नवीन स्किल शिकावे लागत आहेत तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता.
कोरोना पॅडेमीकनंतर झालेला बदल
या सर्वे करताना 48% लोकांनी अस सांगितल की कोरोंना नंतर ते पैशाच्या बाबतीत ते जरा जास्त Active झाले आहेत. फायनॅनशियल प्लॅनिंग अशा गोष्टी ते शिकत आहेत. कठीण काळात पैसा किती महत्वाचा असतो याची जाणीव त्यांना झाली आहे.
इन्कम ग्रुपमधील बदल
लोवर इन्कम असलेले लोक जास्त इन्कम कशी कमविता येईल यावर फोकस करत आहेत. ते जास्त रिटर्न कुठे मिळेल याचा विचार करत आहेत. याऊलट ज्या लोकांकडे आधीपासून चांगला पैसा आहे म्हणजे हाय इन्कम ग्रुपमधील लोक, ते करियरमध्ये पुढे जाण्यावर फोकस करत आहेत. त्यासोबत Passive इन्कम कशी कमवीता येईल याकडे त्यांच लक्ष आहे.
Top Financial Concerns
आजकाल लोक महागाई, इकनॉमिमध्ये होणारी स्लो ग्रोथ यांना खूप Seriously घेत आहेत आणि त्या हिशोबाने त्यांची Retirement प्लॅनिंग करत आहेत. कारण महागाई तर वाढतच राहणार आणि रिटायर झालो की थोडेफार पैसे तर लागतील या काळजीमुळे लोक रिटायरमेंट प्लॅनिंग आतापासून करत आहेत.
इनवेस्टमेंट चॉइस
म्यूचुअल फंड हे आजकाल खूप जणांची पहिली चॉइस बनत आहेत जेव्हा पैसे इनवेस्ट करायची गोष्ट येते. 2020 मध्ये फक्त 10% लोक म्यूचुअल फंडला प्राध्यान देत होते मात्र 2023 मध्ये हा आकडा 23% वर पोचला आहे. स्टॉक निवडायच टेंशन लोकांना नकोय म्हणून ते म्यूचुअल फंडमध्ये पैसे इनवेस्ट करत आहेत.
(हे वाचा SIP काय आहे? फायदे आणि तोटे)
रिटायरमेंट प्लॅनिंगच महत्व
भारतामध्ये आता लोकांच अस ठाम मत आहे की, Retirement साठी आजकाल तुम्हाला तुमच्या इन्कमच्या 10-12 पट रक्कमची गरज लागेल. 2020 मध्ये जेव्हा असाच एक सर्वे केला गेला तेव्हा हा आकडा 8-9 पट असा होता. याचा अर्थ असा की, लोकांची बदलती लाइफस्टाइल, इकॉनमीमध्ये होणारे बदल, बदलत जॉब मार्केट इ. या सगळ्याचा विचार रिटायरमेंट प्लॅन करताना केला पाहिजे याची जाणीव लोकांना झाली आहे.
PGIM India MF’s Retirement Readiness Survey 2023 हे सांगत की, भारतामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी लोकांचा Attitude बदलला आहे. “हा नंतर बघू अजून खूप लाइफ बाकी आहे” अस न बोलता ते अगदी सुरुवातीपासून रिटायरमेंटसाठी पैसे Save आणि Invest करत आहेत.
तुम्ही सुद्धा रिटायरमेंटची तयारी केली नसेल तर करायला तयारी करायला घ्या. जास्त काही नाही महिन्याला थोडे पैसे एक रिटायरमेंटसाठी खास घेतलेला म्यूचुअल फंड किंवा इंडेक्स फंडमध्ये इनवेस्ट करायचे. रिटायरमेंटला अजून वेळ आहे त्यामुळे एक छोटी रक्कम पण हळूहळू का होईना रिटायरमेंट पर्यन्त मोठी होवू शकते.
1 thought on “फक्तं 67% भारतीय रिटायरमेंटसाठी तयार आहेत | PGIM India MF Retirement Survey”