टर्म इन्शुरेंसमध्ये अमाऊंट सेटलमेंट रेशियो काय आहे? (Term Insurance Amount Settlement Ratio in Marathi)

कोरोनानंतर संगळ्याना Term Insurance किंवा लाइफ इन्शुरेंसच महत्व काय आहे हे लक्षात आल आहे.

घरचा कमविता व्यक्ती गेला की फॅमिलीच्या आर्थिक सपोर्टसाठी टर्म इन्शुरेंस असणे फार गरजेचं आहे. टर्म इन्शुरेंसबद्दल जागरूकता वाढली आहे. पण जेव्हा तुम्ही टर्म इन्शुरेंस घ्यायला मार्केटमध्ये जाता तेव्हा नक्की काय बघितल पाहिजे यावर आज चर्चा करुत. (अधिक माहितीसाठी Term insurance काय आहे? फायदे आणि तोटे )

अशा वेळी सगळ्यात आधी एखाद्या कंपनीचा अमाऊंट सेटलमेंट रेशियो बघा. आता हा अमाऊंट सेटलमेंट रेशियो काय ते समजून घेऊ.

 Amount Settlement Ratio (ASR) काय आहे? 

अमाऊंट सेटलमेंट रेशियो म्हणजे कस्टमरकडून जितके क्लेम इन्शुरेंस कंपनीकडे येतात आणि त्यापैकी किती क्लेम इन्शुरेंस कंपनी पुरे करते यातला फरक. याचा फॉर्म्युला खालीलप्रमाणे

Amount Settlement Ratio = (Total amount of Claims settled / Total amount. of Claims filed/requested) x 100

समजा कंपनीकडे 100 करोडचे क्लेम आले त्यापैकी कंपनीने 90 करोडचे क्लेम सेट्टल केले तर कंपनीचा अमाऊंट सेटलमेंट रेशियो होतो,  90/100*100= 90%

Ideal Amount Settlement Ratio किती असला पाहिजे? 

कंपनीचा अमाऊंट सेटलमेंट रेशियो हा दरवर्षी बदलत राहतो. तुम्ही जर बेसिक नियम घेतला तर ज्या कंपनीचा अमाऊंट सेटलमेंट रेशियो 90% च्या वरती असतो ती एक चांगली टर्म इन्शुरन्स कंपनी आहे. पण तरीसुद्धा कोणत्याही कंपनीचा अमाऊंट सेटलमेंट चेक करताना खालील पॉईंट लक्षात ठेवा. 

  • त्या कंपनीचा मागील तीन वर्षांचा अमाऊंट सेटलमेंट रेशियो  घ्यायचा आणि त्याचा आवरेज करून बघायचं. 
  •  आता हे करून झालं की इन्शुरन्स मार्केटमध्ये एवरेज अमाऊंट सेटलमेंट रेशियो काय आहे तो बघायचा, या दोन्ही रेशियोना कम्पेअर करून बघायचं.  सध्या मार्केटमध्ये 90.9% हा इंडस्ट्री ऍव्हरेज अमाऊंट सेटलमेंट रशिया आहे त्यामुळे याच्या तीन पॉईंट जास्त एखाद्या कंपनीचा रेशियो  असेल तर ती कंपनी चांगली आहे.
  • आता हे  कंपन्यांचे अमाऊंट सेटलमेंट रेशियो तुम्हाला कुठे मिळतील? IRDAI च्या वेबसाईटवर किंवा गुगल केलंतरी सुद्धा मिळू शकतात.

अमाऊंट सेटलमेंट  रेशियो का महत्त्वाचा आहे?

काही इन्शुरन्स कंपन्या तुमच्यासोबत गेम खेळतील. तुम्ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाईटवर गेला तर तिथे क्लेम सेटलमेंट रेशियो दाखवला जातो अमाऊंट सेटलमेंट रेशियो हा दाखवला जात नाही. एक उदाहरण घेऊ.

समजा एक कंपनी आहे जिचा क्लेम सेटलमेंट रेशियो ९१% आहे आणि अमाऊंट सेटलमेंट रेशियो  फक्त 56% आहे. याचा अर्थ असा की कंपनी छोटे छोटे  क्लेम्स पटापट क्लियर करत आहे आणि त्यामुळे कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशियो एवढा चांगला आहे. दुसरीकडे कंपनी मोठे क्लेम्स किंवा मोठ्या रकमेचे क्लेम्स रिजेक्ट करत आहे त्यामुळे अमाऊंट सेटलमेंट रेशियो हा कमी आहे. 

फक्त क्लेम सेटलमेंट रेशीओच्या आधारावर कधी टर्म इन्शुरन्स घेऊ नका. सगळ्यात आधी अमाऊंट सेटलमेंट रेशीओ बघा कारण तो जास्त जास्त महत्त्वाचा आहे.

अमाऊंट सेटलमेंट रेशियोवर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो? 

 जर टर्म इन्शुरन्स पॉलिथ पॉलिसी घेताना तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन लपवली जसं की तुम्ही स्मोक करता की नाही, दारू पिता की नाही, आधीपासून एखादा आजार आहे, एज्युकेशन चुकीची सांगितली आहे, नोकरी चुकीची सांगितली आहे इ. गोष्टींचा परिणाम क्लेमच्या वेळी होतो. या कारणांमुळे टर्म इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकते. त्यामुळे कधीही टर्म इन्शुरन्स असो की हेल्थ इन्शुरन्स असो, जे खरं आहे तेच सांगायचं.

 जर टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना नॉमिनीची माहिती नीट दिली नाही तर त्याचा परिणाम क्लेम सेटल करताना होतो. याचं नुकसान पॉलिसी होल्डरला पण होतं आणि त्यासोबतच कंपनीचा अमाऊंट सेटलमेंट रेशीओ पण कमी होतो.

Conclusion 

अमाऊंट सेटलमेंट रेशियो हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना नक्कीच चेक केला पाहिजे.

पण फक्त या एकाच पॉईंटकडे लक्ष देऊन चालणार नाही. तुम्ही कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशियो, कंप्लेंट किती येतात, कंपनीकडे कोण कोणते प्रॉडक्ट आहेत, कंपनी कोण कोणते रायडर्स देत आहे या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत आणि मगच एखादी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली पाहिजे. 

असं केल्याने एक योग्य टर्म इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्यानंतर तुमच्या फॅमिलीला आर्थिक मदतीसाठी ही इन्शुरन्स पॉलिसी नेहमीच कामी येईल.

इतर पोस्ट वाचा👉Term Insurance Riders काय आहेत?

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

Leave a Comment