Plan for Financial Freedom
आजकाल तुम्ही यूट्यूब ओपन करा की इन्स्ताग्राम जो तो फायनान्स आणि Investing बद्दल बोलत आहेत. वेगवेगळया Investing Strategies, मार्केट न्युज, सतत स्टॉकवर चर्चा आणि अस बरच काही. पण या सगळया गोष्टींकडे पाहिलं की अस वाटत की Wealth बनविणे हे एवढं कठीण काम आहे आणि ते करायला मला जमेल की नाही? तुम्हाला पण असा प्रश्न कधी ना कधी पडला असेल.
पण तुम्ही या कठीण वाटणाऱ्या Strategies आणि मार्केट न्यूज बाजुला केल्यात तर Financial Freedom असा एक मार्ग आहे जो खरंच सोपा आहे आणि आपल्या सगळ्यांना जमेल असा आहे. आणि आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण यावरच चर्चा करणार आहोत.
Financial Freedom साठी इन्कमवर फोकस करून सगळ्यात आधी पाया मजबूत करा.
सगळ्या प्रकारच्या Wealth बनविण्याच्या Strategies ची पहिली स्टेप म्हणजे आधी एखादा इन्कम सोर्स बनविणे. कारण इन्कम नसेल तर तुम्ही Investing ला सुरुवात करूच शकत नाही. याचा अर्थ असा नाही की Wealth बनविण्यासाठी तुम्हाला फायनान्स आणि Investing च सगळ नॉलेज असल पाहिजे. पण जर तुम्ही काही बेसिक गोष्टींवर फोकस केलात जसं की बजेट बनिवणे, पैसै Saving करणे, पैशाचे इतर मार्ग कसे बनविता येतील याचा विचार करणे तरच तुमच्या Financial Freedom चा मार्ग सोपा होईल.
मला आठवतंय, माझा मित्र सतीश आणि मी नेहमी कॉलेज असताना हीच चर्चा करायचो की आपलं कॉलेज संपलं की पहिल्या 6 महिन्यात आपल्याला जॉब बघायचा आहे. छोटा मोठा कसाही चालेल पण. जॉब हवा. मग सतीश पण एका प्रायव्हेट बँकमध्ये लागला आणि मी पण एका को ऑपरेटिव्ह बँकमध्ये. आणि त्यातूनच आम्ही पाहिली SIP चालू केली होती. म्हणून सगळ्यात आधी एका इन्कम सोर्सवर फोकस करा.
Financial Freedom साठी इंडेक्स फंड काय वाईट आहे का?
तुम्ही जेव्हा पैसे कमवायला स्टार्ट कराल त्यानंतर पहिला प्रश्न तुम्हाला पडेल तो म्हणजे आता हे पैसे मी कुठे Invest करू? आणि इथेच खूप जण फसून असतात. स्टॉक घेऊ की Mutual Fund मध्ये पैसे Invest करू? असे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. आता प्रतेकाला स्टॉक निवडायला जमत नाही आणि जरी जमल त्यात रिस्क प्रचंड असते. आता तुमच्याकडे राहिला ऑप्शन एकच तो म्हणजे Mutual Fund. त्यामध्ये पण एवढ कन्फ्युजन आहे की कोणता फंड निवडायला हेच कळत नाही. यावर सोपा उपाय म्हणजे एक Low-Cost Index Fund.
इंडेक्स फंड खूप सोपे असतात शिवाय यावर जास्त खर्च येत नाही कारण expense ratio कमी असतो. तुम्ही उगाच बेस्ट फंड निवडणार मग invest करणार या नादात महिने घालवण्यापेक्षा आधी एक छोटी SIP इंडेक्स फंडमध्ये करा. मग हवं तर शोधा नवीन फंड. अस तर नाही ना की फक्त एकच SIP तुम्ही करणार आहात. पुढे जाऊन दुसरी SIP करताना तुम्ही नवा फंड निवडू शकता. (मी पण हेच केलं होत आणि आता मी नवीन SIP साठी एखादा नवीन फंड शोधतो गरज असेल तरच नाहीतर ३-४ Funds पुरेसे होतात)
Financial Freedom साठी महिन्याला नियमित SIP करेनच अशी लाँग टर्म Commitment हवी
Power of Compounding म्हणजे तुमच्या पैशापासून जेव्हा अजून पैसा बनतो. त्यासाठी तुम्हाला सतत काही करायची गरच नाही. दर महिन्याला न चुकता जर तुम्ही साधी SIP केलीत तरी तुम्ही पुढच्या 10 वर्षात चांगली Wealth बनवू शकता. आणि दर महिन्याला SIP करायचे फायदे पण खूप सारे आहेत. कोण सतत ते स्टॉक शोधा, हा घ्या तो विका करत बसेल. शॉर्ट टर्ममध्ये कसाही असो.
जरी तुम्ही 1000 रुपयाची एक Step Up SIP केलीत तर पहिल्या 10 वर्षात किती रिटर्न येईल आणि मग पुढील 10 वर्षात रिटर्न कसा मोठ्या प्रमाणात वाढतो हे बघू शकता. आणि SIP की मोठ्या रककमेची करायची नाहीये. जेवढ शक्य असेल तेवढ्या रककमेची करा.
Parameter | Value |
---|---|
रक्कम (Amount) | 1000 रुपये |
अपेक्षित रिटर्न (Expected Return) | 12% प्रतिवर्ष फक्त |
दर वर्षी Step up (Annual Step-up) | 10% वाढ |
10 वर्षात टोटल रिटर्न | 3,37,433 रुपये |
20 वर्षात टोटल रिटर्न | 19,88,872 रुपये |
30 वर्षात टोटल रिटर्न | 88,34,124 रुपये |
40 वर्षात टोटल रिटर्न | 3,50,44,023 रुपये |
पहिले 10 वर्ष खूप कठीण असतात हे टेबलवरून समजल असेलच. पण त्यानंतर Power of Compounding बघायला मिळते. आणि हे फक्त 1000 रुपायाच एक उदाहरण झाल. ज्याना शक्य असेल तर तुम्ही SIP ची रक्कम मोठी ठेवू शकता.
Wealth बनविण्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा
तुम्ही हे नोटीस केलत की नाही ते तुम्हाला ठाऊक पण मी नेहमीच करतो. कुठेही जा स्टॉक मार्केट एक चर्चेचा विषय बनला आहे. आणि जो कोणी स्टॉक मार्केटवर बोलतो तो लगेच असा Cool टाईप वाढतो (हो की नाही?) म्हणुन आजकाल खूप जण फ्री टिप्स देत असतात आणि घेणारे घेत असतात. पण या सगळ्याचा प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही कितीही ठरवल की मी तर लाँग टर्मसाठी Invest केलं आहे, मला काय फरक पडतो या शॉर्ट टर्म हालचालीनी. पण सतत तेच एकून आपल्याला कळत नकळत फरक पडत असतो.
अशा वेळी तुम्ही तुमचं सगळ्यात मोठ Goal ते म्हणजे Financial Freedom याकडे लक्ष दिले पाहिजे. Investing साठी एक Discipline Mindset तुम्ही बनविला पाहिजे.
Post by @marathifinanceView on Threads
भारतातील फक्त 3-4 % लोकं शेअर मार्केटमध्ये पैसे Invest करतात याची कारणे आहेत की भीती, Complicated Financial प्रॉडक्ट यामुळे ज्याला शेअर मार्केटमध्ये यायचं असत पण नेहमी त्यापासून दूर राहतो. अशा परिस्थतीमध्ये काही सिंपल, डोक्याला जास्त ताप न देणारा प्लॅन तुमच्याकडे असेल तर तुम्ही खूप सार Financial Knowledge नसल तरीही तूम्ही Financial Freedom गाठू शकता.
आणि हो, इंडेक्स फंड सिंपल वाटत असले याचा अर्थ असा नाही की इथे रिटर्न कमी मिळतील. इंडेक्स फंड म्हणजे की तुम्ही इतर गोष्टी जशा मार्केट न्युज, मार्केटचे चढ उतार यापासून येणाऱ्या टेन्शनपासून दूर राहू शकता.
Khup bhari sir agadi yogy bolle
dhanyavad saurav