HEALTH INSURANCE: हेल्थ इन्शुरेंस काय आहे? त्याचे प्रकार जाणून घ्या

5/5 - (1 vote)

HEALTH INSURANCE IN MARATHI: कल्पना करा, तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने घालवत आहात. नोकरी आहे, चांगली फॅमिली आहे. पण अचानक आयुष्यात एक मोठी अडचण येते ती म्हणजे मेडिकल इमर्जन्सी. हॉस्पिटलची बिलं वाढत जातात आणि चिंता वाढते. अशा वेळी विचार करूनही भीती वाटते, नाही का?

तुम्ही घरातील एकटे कमविणारे असाल आणि पूर्ण फॅमिलीची जबाबदारी तुमच्यावर असेल तर अशा परिस्थितीत स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे तुमचं कर्तव्य आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये आपण हेल्थ इन्शुरेंस काय आहे, त्याचे प्रकार, आणि ते का आवश्यक आहे याची सखोल माहिती घेणार आहोत. चला सुरुवात करूया.

जॉइन टेलीग्राम चॅनल   @marathifinance

हेल्थ इन्शुरेंस काय आहे? | What is Health Insurance?

हेल्थ इन्शुरेंस म्हणजे तुमच्या आरोग्याला कव्हर करणारे इन्शुरेंस. जीवनात कोणताही आजार कधीही येऊ शकतो आणि त्याचा अंदाज लावता येत नाही. हेल्थ इन्शुरेंस विविध आजारांचा खर्च कव्हर करतो, जसे की हॉस्पिटलला दाखल होणे, शस्त्रक्रिया, निदान चाचण्या, प्रिस्क्रिप्शन औषधे आणि इतर वैद्यकीय खर्च.

हेल्थ इन्शुरेंस कसे काम करते? | How Does Health Insurance Work?

तुम्हाला किती लाखांचा इन्शुरेंस कवर हवा आहे हे ठरवा. जर तुम्ही एकटे आहात आणि तरुण वयात असाल तर कमीत कमी 5 लाखांचा कवर हवा. नंतर एखाद्या चांगल्या हेल्थ इन्शुरेंस कंपनीकडून हेल्थ पॉलिसी घ्या. हेल्थ इन्शुरेंस कंपनी तुमच्याकडून ठराविक रक्कम म्हणजे प्रीमियम घेते. हे प्रीमियम तुमच्या वय, आरोग्य स्थिती, सिगरेट पिण्याच्या सवयी, मद्यपान, इत्यादी गोष्टींवर ठरवले जाते.

हेल्थ इन्शुरेंसचे प्रकार | Types of Health insurance

Individual Health Insurance: स्वतःसाठी घेतलेला हेल्थ इन्शुरेंस. तुमच्या आजारपणासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी हा हेल्थ इन्शुरेंस घ्यायचा असतो. सहसा याचा प्रीमियम स्वस्त असतो, जर तुम्ही तरुण वयात आणि निरोगी असाल.

Family Floater Health Insurance: फॅमिलमधील सर्व सदस्यांसाठी घेतलेला हेल्थ इन्शुरेंस. फॅमिलीमधील लोकांचे आजार आणि त्यासाठी लागणारा खर्च कव्हर करतो. याचा प्रीमियम थोडा महाग असतो कारण फॅमिलीमधील अनेक व्यक्तींच्या वयावर आणि आरोग्यावर अवलंबून असतो.

Senior Citizen Health Insurance: वृद्ध व्यक्तींसाठी घेतलेला इन्शुरेंस. वृद्धापकाळात येणाऱ्या आजारांचा खर्च कव्हर करतो. वृद्ध लोकांसाठी आजारपणाचा खर्च करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

Critical Illness Insurance: कॅन्सर, हार्ट अटॅक अशा गंभीर आजारांवर खर्च कव्हर करणारा इन्शुरेंस. जीवनात कोणताही मोठा आजार येऊ शकतो, अशा वेळी हा इन्शुरेंस खूप उपयोगी ठरतो.

Group Health Insurance: विशिष्ट ग्रुपसाठी बनवलेला इन्शुरेंस. बँका, आयटी कंपन्या किंवा इतर कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी ग्रुप इन्शुरेंसची सुविधा देतात.

Top-Up and Super Top-Up: अतिरिक्त सुरक्षा हवी असल्यास टॉप-अप किंवा सुपर टॉप-अप प्लान घ्यावा. बेस प्लानची लिमिट पूर्ण झाल्यावर हे प्लान्स चालू होतात.

Maternity Insurance: प्रेग्नंट महिला आणि होणाऱ्या बाळासाठी घेतलेला इन्शुरेंस. गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी हा इन्शुरेंस घेतला जातो.

ही पोस्ट वाचा  Best Health Insurance Policy कशी निवडाल?

हेल्थ इन्शुरेंस घ्यायला पाहिजे का? | Should I get health insurance?

निश्चितच, हेल्थ इन्शुरेंस घ्यायला पाहिजे! हेल्थ इन्शुरेंस हा खर्च नाही, तर इन्व्हेस्टमेंट आहे. ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आजारपणाचे खर्च टाळण्यास मदत करते. वय वाढत जाताना आजारपणाचा खर्च देखील वाढतो. अशा वेळी चांगली हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी असणे फार गरजेचे आहे.

समजा तुम्ही हेल्थ इन्शुरेंस घेतले नाही आणि तुम्हाला काही आजार झाला. हॉस्पिटलचे बिल 2 लाख आले. आता हे बिल तुम्ही कसे भरणार? जर तुमच्याकडे पुरेसा पैसा नसेल तर सेव्हिंग्ज, एफडी किंवा एसआयपी मोडावी लागेल. ही वेळ येऊ नये म्हणून हेल्थ इन्शुरेंस आवश्यक आहे.

हेल्थ इन्शुरेंस घ्यायला किती खर्च येईल? | How much does it cost to get health insurance?

हे प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. वय, आरोग्य स्थिती, आणि इन्शुरेंसची कालावधी यावर ते ठरवले जाते. एक वर्षासाठी किंवा एकत्र पैसे भरून दोन-तीन वर्षांसाठी हेल्थ इन्शुरेंस घेऊ शकता. त्यानंतर ते रिन्यू करावे लागेल.

निष्कर्ष | Conclusion

एक चांगली आणि पुरेसा कवर देणारी हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी असणे काळाची गरज आहे. मेडिकल आणि हॉस्पिटलचे खर्च वाढत चालले आहेत. मोठा आजार आल्यास सगळ्या सेव्हिंग्ज खर्च होऊ शकतात. म्हणून हेल्थ इन्शुरेंस घ्या आणि स्वतःला आणि फॅमिलीला सुरक्षित ठेवा.

ही पोस्ट वाचा  हेल्थ इन्शुरेंस को पेमेंट म्हणजे काय?

हेल्थ इन्शुरेंस विषयी काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. हेल्थ इन्शुरेंस काय आहे?

हेल्थ इन्शुरेंस म्हणजे तुमच्या आरोग्याशी संबंधित खर्च कव्हर करणारे इन्शुरेंस. यात हॉस्पिटलचे बिल, शस्त्रक्रिया, औषधे आणि इतर वैद्यकीय खर्च येतात.

2. हेल्थ इन्शुरेंस कसे काम करते?

तुम्ही इन्शुरेंस कंपनीकडून एक पॉलिसी घ्याल आणि त्यासाठी प्रीमियम भरेल. आजारपण आल्यास, कंपनी तुमच्या वैद्यकीय खर्चाचा कव्हर देईल.

3. हेल्थ इन्शुरेंस किती प्रकारचे असतात?

  • Individual Health Insurance: स्वतःसाठी घेतलेला इन्शुरेंस.
  • Family Floater Health Insurance: फॅमिलीमधील सर्व सदस्यांसाठी.
  • Senior Citizen Health Insurance: वृद्ध व्यक्तींसाठी.
  • Critical Illness Insurance: गंभीर आजारांसाठी.
  • Group Health Insurance: विशिष्ट ग्रुपसाठी.
  • Top-Up and Super Top-Up: अतिरिक्त सुरक्षा हवी असल्यास.
  • Maternity Insurance: प्रेग्नंट महिला आणि होणाऱ्या बाळासाठी.

4. हेल्थ इन्शुरेंस का घ्यायला पाहिजे?

हेल्थ इन्शुरेंस हा खर्च नाही, तर इन्व्हेस्टमेंट आहे. ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आजारपणाचे खर्च टाळण्यास मदत करते. मोठ्या आजाराच्या वेळी सेव्हिंग्ज वाचवण्यास मदत होते.

5. हेल्थ इन्शुरेंस घेण्यासाठी किती खर्च येतो?

हे तुमच्या वय, आरोग्य स्थिती आणि पॉलिसीच्या कालावधीवर अवलंबून असते. प्रत्येकासाठी खर्च वेगळा असू शकतो.

6. हेल्थ इन्शुरेंस किती वर्षांसाठी घेऊ शकतो?

तुम्ही एक वर्षासाठी, किंवा दोन-तीन वर्षांसाठी एकत्र पैसे भरून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला पॉलिसी रिन्यू करावी लागेल.

7. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरेंस म्हणजे काय?

हा इन्शुरेंस फॅमिलमधील सर्व सदस्यांसाठी असतो. यात फॅमिलीमधील लोकांचे आजार आणि त्यासाठी लागणारा खर्च कव्हर होतो.

8. सीनियर सिटिझन हेल्थ इन्शुरेंस का आवश्यक आहे?

वृद्धापकाळात आजारपण येण्याची शक्यता जास्त असते आणि मेडिकल खर्चही वाढतो. अशा वेळी सीनियर सिटिझन हेल्थ इन्शुरेंस उपयोगी पडतो.

9. क्रिटिकल इलनेस इन्शुरेंस म्हणजे काय?

कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या गंभीर आजारांसाठी क्रिटिकल इलनेस इन्शुरेंस घेतले जाते. अशा मोठ्या खर्चाच्या वेळी हा इन्शुरेंस मदत करतो.

10. टॉप-अप आणि सुपर टॉप-अप इन्शुरेंस म्हणजे काय?

हे प्लान्स बेस इन्शुरेंस प्लानची लिमिट पूर्ण झाल्यावर चालू होतात आणि अतिरिक्त खर्च कव्हर करतात.

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi