HDFC Life Click 2 Protect Life: टर्म इन्शुरन्स रिव्यू

Rate this post

HDFC Life Click 2 Protect Life Review

एचडीएफसी लाइफ क्लिक टू प्रोटेक्ट लाईफ हा एक टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे जो एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून दिला जातो. इन्शुरन्स पॉलिसी हा तुमच्या Financial Planning चा एक महत्त्वाचा घटक आहे त्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही.  जर तुमच्या जीवाला काही झालं तर फॅमिलीच्या आर्थिक सपोर्टसाठी टॉम इन्शुरन्स पॉलिसी खूप गरजेची असते. आजच्या पोस्टमध्ये आपण एचडीएफसी लाइफ क्लिक टू प्रोटेक्ट लाईफ या प्लॅनला समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया.

ही पोस्ट आधी वाचा 👉 Term insurance काय आहे? फायदे आणि तोटे

About HDFC Life Insurance Co. Ltd (कंपनी माहिती)

एचडीएफसी लाइफ किंवा एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे भारताच्या काही मोठ्या इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीची सुरुवात 2000 मध्ये झाली होती. एचडीएफसी लिमिटेड आणि बाहेर देशातील एक मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी Standard Life Aberdeen या दोन्ही कंपन्यांमध्ये जॉईंट व्हेंचर ने एचडीएफसी लाइफची सुरुवात झाली. एचडीएफसी लाइफचा हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे.  एचडीएफसी लाइफच्या जवळजवळ 420 पेक्षा जास्त शाखा देशभर पसरल्या आहेत. 

Features of HDFC Life Click 2 Protect Life (महत्वाचे फीचर्स)

✅ Life Cover Benefit: 

ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसी टर्म दरम्यान जर पॉलिसी होल्डरला काही झालं किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला गॅरेंटेड टर्म इन्शुरन्सची रक्कम दिली जाते. एक गोष्ट लक्षात घ्या जर पॉलिसी टर्म दरम्यान पॉलिसी होल्डरला काही झालं नाही तर या पॉलिसीचे पैसे रिटर्न मिळत नाहीत. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 25 चे असताना टर्म इन्शुरेंस पॉलिसी काढलीत ते अगदी 65 व्या वयापर्यंत, म्हणजे 40 वर्षांसाठी. जर या 40 वर्षाच्या आतमध्ये पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाला तर नॉमीनीला पैसे मिळतात नाहीतर काहीच मिळत नाही. 

✅ Entry Age for the Policy: 

18 ते 60 वर्ष या वयोगटातील व्यक्ति  या टर्म इन्शुरन्स पॉलिसी साठी अप्लाय करू शकतात.

✅ Cover Duration: 

इतर काही टर्म इन्शुरन्स पॉलिसीज आहेत जिथे तुम्हाला फक्त 60-65 वयापर्यंतचा टर्म इन्शुरन्स कव्हर मिळतो पण या एचडीएफसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वयाच्या 85 पर्यंत टर्म इन्शुरन्स कव्हर मिळतो.  पण खर बोलू तर टर्म इन्शुरन्स हा माझ्या मते तरी जास्तीत जास्त 65 किंवा 67 वयापर्यंत घ्यावा.

✅ Limited Pay Option:

एचडीएफसी लाइफच्या या टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये लिमिटेड पे ऑप्शन मिळतो.  समजा तुम्ही 40 वर्षासाठी  पॉलिसी काढली पण तुम्हाला प्रीमियम पहिल्या 10 वर्षांमध्ये भरायचा आहे तर टस तुम्ही करू शकता.  पण लिमिटेड पे ऑप्शनमध्ये प्रीमियम जास्त भरावा लागेल कारण तुम्ही 40 वर्षाचा प्रीमियम 10 वर्षात एकत्र भरणार आहात. 

✅ Claim Payout Option:

नॉमिनीला क्लेमची रक्कम ही एकत्र दिली जाते. ती रक्कम डायरेक्ट नॉमिनीच्या बँक अकाऊंटमध्ये क्रेडिट केली जाते. क्लेमचे पैसे एकत्र मिळणे चांगल असत जर एखाद लोन फेडायच आहे जे पॉलिसीहोल्डरने घेतल होत. पण खूप वेळा अस होत की नॉमिनी हा पैसा कसा मॅनेज करायचा यात एवढा चांगला नसतो मग या पैशाच दुरुपयोग होवू शकतो. 

❌ Increasing Cover: 

या पॉलिसीमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की जस तुमच वय वाढत जात तुमच कवर वाढवता येत नाही. समजा, तुमची आता सॅलरी 25,000 रुपये आहे आणि त्याच्या आधारावर तुम्ही 50 लाखाच टर्म इन्शुरेंस कवर घेतल. पण काही वर्षानी तुम्ही सॅलरी वाढली आणि तुम्हाला टर्म इन्शुरेंस कवर वाढवायच आहे तर या पॉलिसीमध्ये ते काही करता येत. 

यासाठी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सचा एक दुसरा प्लॅन आहे त्यावर आपण नेक्स्ट पोस्टमध्ये चर्चा करू. नाव पण तेच आहे फक्त SUPER लावल आहे नावाच्या पुढे आणि काही बदल आहेत. HDFC Life Click 2 Protect Life Super

HDFC Life Click 2 Protect Life Riders (एक्स्ट्रा बेनिफिट) 

✅ Critical Illness Rider

हे एक Optional रायडर आहे जे तुम्ही तुमच्या Term Insurance पॉलिसीमध्ये Add करू शकता. या रायडरचा फायदा असा होतो की पॉलिसी होल्डरला जर एखाद्या क्रिटिकल इलनेससाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आणि या सगळ्याचा खर्च या रायडरच्या माध्यमातून दिला जातो. काही क्रिटिकल इलनेस जस की Cancer (except for initial stages, HIV-related, and skin cancer), Heart attack, Stroke, Kidney failure इ. (हा रायडर तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे यासाठी जास्त खर्च येणार नाही) 

Accidental Death Benefit Rider:

या रायडरच्या मदतीने तुमच्या फॅमिलीला एक्स्ट्रा अमाऊंट दिली जाते जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू एखाद्या एक्सीडेंट मध्ये होतो. टर्म इन्शुरन्स कव्हर पुरेसा नसेल तर हा रायडर तुम्ही ऍड केला पाहिजे.  दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक धोकादायक ठिकाणी काम करतात जसं की सतत गाडी चालवणे (ड्रायवरची नोकरी) जिथे तुमच्या जीवाला धोका असतो तर त्यांनी हा रायडर नक्की घ्या.

Waiver of Premium due to Critical Illness Rider:

जर पॉलिसीहोल्डर आजारपणामुळे किंवा जॉब गेल्याने पॉलिसीचे पुढचे प्रीमियम भरू शकत नाही तेव्हा त्याचे प्रीमियम माफ केले जातात. हे Rider घेणे अगदी स्वस्त आहे. जास्त काही खर्च येत नाही. त्यामुळे टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना हा Rider त्यामधे नक्की Add करा.

ही पोस्ट वाचा👉Term Insurance Riders काय आहेत?

Term Insurance Policy काढताना काही इम्पॉर्टंट पॉईंट्स 

Claim Settlement Ratio:

एचडीएफसी लाइफ जितकी Claims त्यांच्याकडे येतात त्यापैकी 98.69% सेटल करतात. मार्केटमध्ये हा रेशियो ९७% आहे त्यामुळे बघायला गेलं तर एचडीएफसी लाइफ चा क्लेम सेटलमेंट रेशो हा उत्तम आहे.

Amount Settlement Ratio

अमाऊंट सेटलमेंट रेशियो हा खूप इम्पॉर्टंट असतो कारण काही कंपन्या काय करतात की, छोटे छोटे Claims पटापट सेटल करतात ज्यामुळे त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशियो  वाढतो. एचडीएफसी लाईफचा क्लेम सेटलमेंट अमाऊंट सेटलमेंट रेशियो 87.3% आहे. याउलट मार्केटमध्ये अवरेज रेशियो 87% आहे. त्यामुळे इथे आपण ओके ओके बोलू. पण हा रेशियो  एवढा पण वाईट नाही.

Medical Test: 

एचडीएफसी लाइफचा टर्म प्लान घेताना काही मेडिकल टेस्ट होतात जसं की ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट इत्यादी. एचडीएफसी लाइफकडून तुमच्या घरी त्यांचा मेडिकल स्टाफ येतो आणि या टेस्ट केल्या जातात. (किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या क्लिनिकमध्ये स्वता टेस्ट करून त्याचे रीपोर्ट त्यांना पाठवू शकता, पण हे तुम्ही त्यांना विचारून करा आधीच नको)

Basic Information:

ही पॉलिसी घेताना काही बेसिक माहिती तुम्हाला द्यायची असते जस की तुमची इन्कम,  तुमची हाईट, तुमचं वजन,  तंबाखू खाता का, दारू पिता का इत्यादी.

Click 2 Protect Life Term Insurance Plan कुठून घ्यायचा? 

1. HDFC Life App 

हा टर्म प्लान घेण्यासाठी एचडीएफसी लाइफचा ॲप सगळ्यात बेस्ट आहे. ॲप थोडा स्लो आहे पण काम होऊन जातं.

2. HDFC Bank Branch

तुम्ही एचडीएफसी बँकच्या एखाद्या ब्रांचमध्ये जाऊन या टर्म प्लान बद्दल  चौकशी करू शकता आणि तिथून हा टर्म प्लान घेऊ शकता.

3. HDFC Life Office 

तुमच्या जवळपास एखादे एचडीएफसी लाइफ इन्शुरेंस कंपनीच ऑफीस आहे का ते बघा आणि तिथे जाऊन चौकशी करा आणि तिथून हा टर्म प्लान घ्या.

4. Insurance Agent 

तुमच्या जवळपास कोणी इन्शुरन्स एजंट असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही हा टर्म प्लॅन घेऊ शकता.  पण त्यासाठी तुम्हाला त्या एजंटला एक कमिशन द्यावे लागेल जे तुमच्या पॉलिसीमधून घेतलं जाईल त्यामुळे प्रीमियम थोडं वाढू शकतं. पण जेव्हा तुम्हाला कधीप्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्ही त्या एजंटकडे हेल्प मागू शकता (हा एक फायदा असतो)

5. PolicyBazaar

काही लोक बोलतील की पॉलिसी बाजार वरून प्लॅन घेणे चांगलं आहे की नाही. त्यावर तुम्हाला चांगला डिस्काउंट पण मिळेल पण मी हे रेकमेंड करत नाही कारण पॉलिसी घेताना ठीक आहे त्यानंतरची सर्विस एवढी चांगली नाहीये असा माझा एक्सपिरीयन्स आहे.

Conclusion 

HDFC Life Click 2 Protect Life हा एक चांगला टर्म इन्शुरेंस प्लॅन आहे. त्यासोबत HDFC ब्रॅंडचा भरोसा पण आहे. तुम्ही तुमच्या वयानुसार प्रीमियम चेक करा. तुम्हाला हा प्लॅन चांगला वाटला असेल तर नक्की घ्या.  या कंपनीच घ्या किंवा दुसऱ्या कोणत्याही. पण टर्म इन्शुरेंस घ्या. 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Term insurance काय आहे? फायदे आणि तोटे 

Zero Cost Term Insurance काय आहे?

Term Insurance Riders काय आहेत?

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi