TATA Technologies IPO: Date, Price, Lot Size आणि इतर माहिती

Rate this post

TATA Technologies IPO (Initial Public Offering) पुढच्या आठवड्यात दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला Primary मार्केटमध्ये येणार आहे. 

टाटा ग्रुपने Tata Technologies या IPO ची किंमत ₹475 ते ₹500 या दरम्यान ठरवली आहे. एका लॉटमध्ये तुम्ही टोटल 30 शेअर्स घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,250 रूपये असेल. या IPO च्या मदतीने टाटा ग्रुप ₹3042.51 करोड रुपये जमा करायचा हेतू आहे. 

Tata Technologies IPO ॲप्लिकेशन डिटेल्स

Investor 2 पुढील कॅटेगरीमध्ये Apply करू शकतात.

1) Regular Investor म्हणून Apply करा

  • किंमत = ₹475-₹500 रूपये
  • तुम्ही टोटल ₹200000 पर्यंत Apply करू शकता 

2) High Net Worth Individual म्हणून Apply करा

  • किंमत = ₹475-500 रूपये
  • तुम्ही टोटल ₹200,000 रुपये – 5,00,000 रुपये पर्यंत Apply करू शकता.

Tata Technologies कंपनीबद्दल माहिती 

टाटा टेक्नॉलजीस या कंपनीची सुरुवात 1994 मध्ये झाली. या कंपनीचे मॅनिजिंग डायरेक्टर Warren Kevin Harries आहेत.

टाटा टेक्नॉलजीस ही एक ग्लोबल इंजीनीरिंग सर्विस कंपनी आहे. या कंपनीचा उद्देश तीच्या Clients साठी मोटमोठे इंजीनीरिंग प्रॉब्लेम्स सोडवणे आहे. Tata Technologies त्यांच्या Clients ना विविध प्रॉडक्ट डेवलपमेंट आणि डिजिटल सोल्यूशन्स पुरवतात. टाटा टेक्नॉलजीस ही कंपनी Automative इंडस्ट्री मध्ये अग्रगण्य आहे. त्यासोबत त्यांच्या Clients ला Aerospace, Transportation and Construction Heavy Machinery इत्यादीसाठी प्रॉडक्ट डिझाईन करून देते. 

थोडक्यात सांगायचं झालं तर, टाटा टेक्नॉलजीस ही कंपनी इतर छोट्या मोठ्या कंपन्यांना Manufacturing Systems आणि Digital Products पुरवते. 

एक उदाहरण घ्यायचं झालं तर, समजा एखादी कंपनी आहे जी इलेक्ट्रिक स्कूटर बनवते पण त्यांना या स्कूटर बनवायला Manufacturing Systems हवीय आणि हे काम टाटा टेक्नॉलजीस करते.

Tata Technologies Ltd बिझनेस सेगमेंट

  • Automobile – विविध गाड्या बनविण्यासाठी वापरली जाणारी सिस्टिम्स
  • Aerospace – उडणारे द्रोन, विमाने, रॉकेट इ. साठी लागणारी सिस्टम्स
  • Industrial Machinery – मोठे मोठे Bulldozers, JCB, Tractors तसेच एखादया Industry मध्ये लागणारी साधने बनविण्याची सिस्टीम देणे.

Tata Technologies Ltd प्रॉफिट, रेविन्यू  आणि टोटल Assets

टाटा टेक्नॉलजीसचा 65% -70 %  रेविन्यू हा अमेरिका आणि युरोपमधील मार्केटमधून येते. टाटा टेक्नॉलजीस मोठ्या प्रमाणात बाहेर देशातील कंपन्यांना आपल्या सर्विसेस देत आहे. याचा अर्थ बाहेर देशात होणारे बदल, Policies मध्ये होणारे बदल याचा डायरेक्ट फरक Tata Technologies Ltd च्या बिझनेसवर बघायला मिळेल. उरलेला रेविन्यू 30% – 35% रेविन्यू हा भारतीय मार्केटमधून येतो.

Tata Technologies Ltd IPO रिव्यू 

  • टाटा टेक्नॉलजीस ही टाटा ग्रुपची कंपनी असल्याने या ग्रुपवर लोकांचा चांगला भरोसा आहे त्यामुळे Investor यामध्ये नक्की पैसे इनवेस्ट करणार. 
  • टाटा टेक्नॉलजीस ही कंपनी प्रॉफिटमध्ये असून तो दर वर्षी वाढत आहे. तसेच रेविन्यू सुद्धा वाढत आहेत. सध्या खूप सारे IPO मार्केटमध्ये येत असतात.
  • नुकताच आलेला MamaEarth चा आयपीओ पाहिला तर ती कंपनी प्रॉफिटमध्ये नाही. त्यामुळे जर तुम्ही एक चांगला IPO पैसे इनवेस्ट करण्यासाठी बघत आहात तर टाटा टेक्नॉलजीस ही एक चांगली संधी ठरू शकते. 

Tata Technologies Ltd IPO बद्दल FAQ (Frequently Asked Questions) 

👉टाटा टेक्नॉलजीस IPO चा इश्यू साइज किती आहे? 

टाटा टेक्नॉलजीस आयपीओची इश्यू साइज 95,708,984 इक्विटि शेअर्स एवढा आहे. 

👉 टाटा टेक्नॉलजीस IPO टोटल किती रककमेचा आहे? 

टाटा टेक्नॉलजीसचा IPO टोटल Rs. 3042.51 करोंड एवढा आहे. 

👉टाटा टेक्नॉलजीस या IPO कोणत्या तारखेला चालू आणि बंद होणार आहे? 

टाटा टेक्नॉलजीस हा IPO दिनांक 22 नोवेंबर 2023 ला चालू होणार आणि 24 नोवेंबर 2023 ला बंद होणार आहे. 

👉 टाटा टेक्नॉलजीसच्या IPO ची किंमत काय असणार आहे? 

टाटा टेक्नॉलजीस च्या एक शेअरची किंमत Rs. 475 – 500 पर्यन्त असणार आहे. 

👉 टाटा टेक्नॉलजीस IPO मध्ये तुम्ही एका लॉटमध्ये  किती शेअर घेऊ शकता? 

टाटा टेक्नॉलजीस च्या IPO मध्ये तुम्हाला एका लॉटमध्ये टोटल 30 शेअर विकत घेता येतील. 

👉 टाटा टेक्नॉलजीस IPO कोणत्या एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे? 

टाटा टेक्नॉलजीस ही कंपनी भारताचे दोन्ही मोठे स्टॉक एक्स्चेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे. 

👉 टाटा टेक्नॉलजीस IPO चा रजिस्ट्रार कोण आहे? 

टाटा टेक्नॉलजीस या IPO साठी Link Intime India Pvt Ltd ही कंपनी रजिस्ट्रार आहे. 

👉 IPO म्हणजे काय ? 

IPO म्हणजे Initial Public Offering. याचा अर्थ असा की जेव्हा पण एखादी कंपनी तिचे शेअर्स  स्टॉक मार्केटमध्ये विकायला काढते. 

👉 Primary Market म्हणजे काय? 

स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्कटचे मुख्य दोन प्रकार असतात

एक म्हणजे Primary Market जिथे एखादी कंपनी अगदी नव्याने तिचे शेअर मार्केटमध्ये विकायला काढते जस की IPO

दुसर म्हणजे Secondary Market जिथे एखादी कंपनी तिचे जुने शेअर विकते तरी किंवा खरेदी करते. 

👉 FPO म्हणजे काय? 

FPO म्हणजे Further Public Offering याचा अर्थ असा की जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या वेळी की एक पेक्षा जास्त टाइम तिचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये विकायला आणत आहे. 

इतर महत्वाच्या पोस्ट

अधिक माहितीसाठी विडियो सोर्स 

4 thoughts on “TATA Technologies IPO: Date, Price, Lot Size आणि इतर माहिती”

  1. I was employee of Tata Motors and retired in 1999
    I m holding about 500 shares of Tata Motors long back from Employees quota. Now want to invest 50000 Re in Tata Tech IPO
    PL Guide how to apply. Mob 9420732001

    Reply
    • If you’re applying with offline mode, then you can ask your broker for the form

      And if you’re applying online especially using Zerodha, Groww, or any other app, there is an option for existing Tata shareholders (I’m using Zerodha)

      Reply

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi