Direct Fund Vs Regular Fund (कोणता फंड घ्यायचा?)

Rate this post

आपल्या इंस्टाग्राम पेजचा एक फॉलोवर विनोद पाटील याने एक प्रश्न विचारला की Regular Fund मधून Direct Fund मध्ये स्विच करु का? हाच प्रश्न तुमच्या Mind मध्ये कधी ना कधी आला असेलच. चला तर आजच्या पोस्टमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण सोधू. (आणि नंतर सगळ्यांनी कॉमेंटमध्ये विनोदला Thanks बोला.)

जेव्हा तुम्ही Lumpsum किंवा SIP करण्यासाठी एखादा Mutual Fund निवडता तेव्हा त्या फंडचे २ प्रकार बघायला मिळतात. आता काहींना याबद्दल एवढी माहिती नसते आणि Mutual Fund कंपन्या सहसा याबद्दल Investor ला जागरूक करत नाहीत. हा फरक समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ.

वरील दीलेल्या फोटोमध्ये एकच फंड आहे तो म्हणजे Parag Parikh Flexi Cap Fund. (एक गोष्ट लक्षात घ्या हा फंड आपण फक्त एक उदाहरण म्हणून घेत आहोत) आता फंडच नाव जरी एक असले तरीही त्यामध्ये प्रामुख्याने २ प्रकार आहेत. १) Parag Parikh Flexi Cap Direct Fund २)Parag Parikh Flexi Cap Regular Fund.  आता Regular Fund चा ३ वर्षांचा रिटर्न आहे २२.५१% आणि Direct Fund चा ३ वर्षांचा रिटर्न आहे २३.६८%. जवळ जवळ १.१७% रिटर्नचा फरक दिसत आहे. आणि या एवढ्या फरक लाँग टर्ममध्ये खूप मोठा फरक पडतो. 

Direct Mutual Fund काय आहे? 

Direct या शब्दावरून तुम्हाला थोडी आयडिया आलीच असेल की हे फंड आपण Direct Mutual Fund कंपनीकडून विकत घेतो. आजकाल बहुतेक जण ऑनलाईन ॲप्स जसे की Groww, Zerodha Kite, Upstox, Angel One किंवा इतर ॲप्स. आणि माझ्या माहिती प्रमाणे या सगळया ॲप्समध्ये तुम्हाला Direct Fund मिळतील. आधी या ॲप्समध्ये Regular Fund सुद्धा Invest करण्यासाठी दिसायचे जे आता बंद झाले आहेत. पण तरीही कोणत्याही Mutual Fund मध्ये Invest करण्याआधी तो फंड नक्की कसा आहे हे चेक करा. Direct Fund स्वस्त किंवा यामध्ये रिटर्न जास्त असतो कारण यामध्ये कोणी Middlemen येत नाही जसे Mutual Funds Agents किंवा Distributors. आता Mutual Fund कंपनीला फंड विकण्यासाठी जास्त खर्च येत नाही आणि कोणत्याही प्रकारचं कमिशन Mutual Fund एजेंटना द्यावं लागतं नाही म्हणून हे फंड स्वस्त आणि रिटर्न पण जास्त असतात. जेव्हा पण तुम्ही SIP करणार किंवा Lumpsum पैसै Invest करणार, नेहमी न चुकता Direct Plan घ्या.

Regular Fund काय आहे? 

आता Direct Fund काय आहे हे समजल्यावर Regular Fund काय आहे याची आयडिया तुम्हाला आलीच असेल.  Regular Fund असे फंड असतात जे तुम्ही Advisor, broker किंवा Mutual Fund एजंटकडून विकत घेता. आणि हो जेव्हा पण तुम्ही एखाद्या बँकमधून Mutual Fund विकत घेता तो नेहमीच Regular Fund असतो. आता Regular Fund महाग का असतात आणि यांचा रिटर्न कमी का असतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याच कारण अस की Mutual Fund कंपनीला या सगळ्या एजंट्स, Advisors किंवा बँक्सना कमिशन द्यावं लागतं. आणि हे कमिशन Mutual Fund कंपनी आपल्याकडून वसूल करते ते म्हणजे आपल्याला कमी रिटर्न देऊन. त्यामुळे जेव्हा पण SIP किंवा Lumpsum पैसै invest कराल तेव्हा Regular Fund पासून लांब रहा. आणि जर केलं असेल तर तुम्हाला Switch करा असा मेसेज येईल मग Direct Fund मध्ये स्विच करा.

हे वाचा:-Mutual Fund Exit Load काय आहे?

Direct आणि Regular Fund मध्ये काय फरक आहे? 

1) कमी Expense Ratio

Expense Ratio ही एक प्रकारची फी आहे जी Mutual Fund कंपनी आपल्याकडून घेत असते. पण तुम्ही Regular Fund ची Direct Fund सोबत तुलना केलीत ना तर Direct Fund चा Expense Ratio खूप कमी असतो. जर आपण आधीच उदाहरण घेतलं तर Parag Parikh Flexi Cap Fund Direct Fund चा Expense Ratio 0.67% आहे आणि ते Parikh Flexi Cap Fund Regular Fund चा Expense Ratio 1.47% आहे. आणि हा Expense Ratio आपल्या खिशातून घेतला जातो.

जर तुम्ही महिन्याचे ₹१००० रुपये SIP मध्ये Invest करत असाल तर पूर्ण ₹१००० रुपये Invest केले जात नाहीत. तुम्ही आज स्वतः तुमच्या SIP ची किती रक्कम नक्की Invest होते ते चेक करा. मी माझ उदाहरण घेतलं तर, मी महिन्याला ₹१,५०० ची एका फंड मध्ये SIP करतो पण त्यापैकी फक्त ₹1499.93  रुपये फंडमध्ये Invest केले जातात (खाली दिलेला स्क्रीनशॉट बघा) आणि त्या फंडचा चालू Expense Ratio 0.77% आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, Expense Ratio जितका कमी तितका आपला रिटर्न जास्त असतो. त्यामूळे Direct Fund निवडणे हे जास्त फायद्याचं ठरतं.

हे वाचा:-SIP काय आहे? फायदे आणि तोटे जाणून घ्या.

2) जास्त रिटर्न 

आता यावर अजून चर्चा करून आपण टाईम पास नको करुयात. कारण आपल्याला नीट समजल आहे की जर एखाद्या Mutual Fund चा Expense Ratio कमी असेल तर जास्त रक्कम Invest होते. आणि जितकी जास्त रक्कम Invest केली जाईल साहजिकच रिटर्न जास्तच बघायला मिळतील

3) चुकीचा फंड विकणे

आपल्याला नेहमीच वाटत कोणी Advisor असेल तर खूप बर होईल जो माझे सगळे पैसे निट मॅनेज करेल. पण बहुदा अस होत की Mutual Fund एजंट माहीत असून पण Regular Fund लोकांना विकतात. याच कारण त्यांचा बिझनेस त्यातून येणाऱ्या कमिशनमधून चालत असतो. आणि खर बोलू तर याला कुठे ना कुठे आपल्यासारखे Investor जबाबदार आहेत. कारण त्या एजंटने जर Direct Fund तुम्हाला विकला तर तो त्याच पोट कसं भरणार त्यासाठी त्याला तुमच्याकडून फी घ्यावी लागेल. आणि फी म्हंटल की कोणी द्यायला तयार नसत. आपल्याला सगळ फ्रिमध्ये हवं असत. आणि म्हणून मग ते Regular Fund विकतात जे जास्त नुकसानदायक असतात. कारण एकदा फी देऊन मोकळ झालेलं कधीही बर पण दर महिन्याला थोडी थोडी रक्कम आपल्या Investment रक्कम मधून कमी होणे योग्य नाही. लाँग टर्म याचा आपल्या रिटर्नवर खूप मोठा फरक पडतो. (आणि हो एखादया एजंट किंवा Advisor ला फी देण्याआधी तो खरचं त्यासाठी योग्य आहे का, हे नक्की बघा) 

4) स्वतःचा पूर्ण कंट्रोल

जेव्हा तुम्ही Direct Fund निवडता तेव्हा तो फंड चांगला आहे ना? त्याचा रिटर्न कसा आहे? फंड मॅनेजर कोण आहे? हे सगळ तुम्हाला स्वतःला नीट तपासायच आहे. आणि या सगळ्यासाठी तुम्हाला मेहनत तर घ्यावीच लागेल. इथे तुमची हेल्प करायला कोणी Advisor येणार नाही. (मी जितकी शक्य तितकी हेल्प या पोस्टच्या माध्यमातून करेन एवढं नक्की 😉) 


मला खात्री आहे विनोदसोबत खूप जणांचे Doubt क्लियर झाला असेल. पोस्ट आवडली असेल तर प्लीज शेअर करा. भेटू आता अशाच एक महितीशीर पोस्टमध्ये. Happy Investing!

Information Sources: - www.valueresearchonline.com, groww.in

2 thoughts on “Direct Fund Vs Regular Fund (कोणता फंड घ्यायचा?)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi