Term Insurance for Home Loan in Marathi: प्रत्येकाच एक स्वप्न असत ते म्हणजे स्वताच घर घेणे. पण जेव्हा तुम्ही घर घ्यायच प्लान करणार तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पैसा. कारण आजकाल घरांचे भाव एवढे वाढले आहेत की विचारू नका. आणि प्रत्येकाकडे एवढे पैसे नसतात की ते लगेच एखाद घर घेऊ शकतात. अशा वेळी एकच मार्ग सुचतो तो म्हणजे होम लोन घेणे.
पण होम लोन घेणे एवढे पण सोप नाही. आणि होम लोन घेताना टर्म इन्शुरेंस कस कामी येत हे आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरवात करूया.
Home Loan घ्यायला बँकमध्ये जाता तेव्हा…
तुम्ही कधी बँकमध्ये होम लोन कस घ्यायच याची चौकशी करून बघा. पहिला प्रश्न ते विचारणार तो म्हणजे तुमची इन्कम की किती आहे? मग तुम्ही किती वर्ष काम करत आहात? आणि असे बरेच प्रश्न.
एवढ सगळ करून जर तुम्हाला होम लोन द्यायला बँक तयार झाली तर बँक अजून एक प्रश्न नक्की विचारेल की तुमच्याकडे टर्म इन्शुरेंस आहे का? आता तुम्हाला प्रश्न पडेल की टर्म इन्शुरेंस आणि होम लोनचा संबंध काय?
Home Loan आणि Term Insurance संबंध आहे.
टर्म इन्शुरेंस काय आहे हे थोडक्यात समजू. जर तुम्हाला काही झाल किंवा ठराविक कालावधीच्या आधी तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या फॅमिलीला टर्म इन्शुरेंस पॉलिसीचे पैसे मिळतात. (तुम्ही टर्म काय ते डीटेलमध्ये इथे वाचा 👉Term insurance काय आहे? फायदे आणि तोटे )
समजा, तुम्ही बँकमधून 50 लाखाच होम लोन घेतलत ज्याचा कालावधी 20 वर्षे आहे. आता या होम लोनचे EMI हे तुम्ही भरणार आहात. आणि समजा या 20 वर्षाच्या आत तुम्हाला काही झाल तर या होम लोनचे पैसे भरणार कोण?
हा प्रश्न बँकेला पडतो. आणि म्हणून बँक तुमच्याकडे टर्म इन्शुरेंस आहे का हे बँक विचारते. आणि त्याला तुमच्या होम लोनसोबत Attached करते. जेणेकरून तुम्हाला काही झाल किंवा तुमचा मृत्यू झाला तर टर्म इन्शुरेंसच्या पैशातून तुमच होम लोन क्लियर करता येईल.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
आणि म्हणून Term Insurance असणे गरजेच आहे.
त्यामुळे होम लोन घेताना टर्म इन्शुरेंस असणे गरजेच आहे. आणि जर तुमच्याकडे टर्म इन्शुरेंस नसेल तर काही बँका आधी ते घ्यायला सांगतात. पण इथे एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे टर्म इन्शुरेंस प्रीमियम महाग येत.
तुम्ही होम लोन जर तुमच्या वयाच्या 28 किंवा 30 मध्ये घ्यायला गेलात (Normally या वयात लोक घर घ्यायच प्लान करतात) आणि त्यानंतर तुम्ही टर्म इन्शुरेंस घ्यायला गेलात तर तुम्हाला चालू वयानुसार प्रीमियम येणार जे खूप महाग असेल.
आणि जर तुम्ही आता किंवा जेव्हा जॉबला लागता (Normally 21 – 23 या वयात) तेव्हा टर्म इन्शुरेंस घेतलत तर ते खूप स्वस्त मिळेल. आणि टर्म इन्शुरेंसची चांगली गोष्ट ही आहे की त्याच प्रीमियम वाढत नाही. एकदा फिक्स झाल की लाइफटाइमसाठी तेच राहत.
जर फ्युचरमध्ये होम लोन घेणार आहात तर…
शक्य तितक्या लवकर एक टर्म इन्शुरेंस घ्या. आता टर्म इन्शुरेंस नेमका किती घ्यायचा प्रश्न आहेच. एक साधा रुल हा आहे की तुमच्या वार्षिक इन्कमच्या 20 पट टर्म इन्शुरेंस असावा. समजा तुमची सॅलरी 20,000 आहे तर 20,000 * 12 महीने = 2,60,000 वर्षाची इन्कम झाली.
2,60,000 * 20 पट = 52,00,000 लाख (कमीत कमी 50 लाख एवढ टर्म इन्शुरेंस तुमच्याकडे असायला हव)
अजून एक गोष्ट टर्म इन्शुरेंस घेताना तुमचे फ्युचर प्लान काय आहेत. तुमच्या जबाबदाऱ्या काय असतील याचा विचार करा. जी मूल किंवा मुली आताच जॉब लागलेत ते आता लग्न, मूल मग त्यांच शिक्षण यांचा विचार करणार नाहीत. पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला दादा ताई असतील त्यांना विचारा की जबाबदाऱ्या वाढल्या की खर्च कसे वाढतात.
आणि मग त्यानुसार टर्म इन्शुरेंस घ्या.
2 thoughts on “होम लोन घेताना टर्म इन्शुरेंसची गरज लागेल (कस? ते जाणून घ्या) | Term Insurance for Home Loan in Marathi”