Whole Life Insurance in Marathi: आजकाल लाइफच काही सांगता येत नाही.
श्रेयस तळपडे यांना नुकतंच काही दिवस अगोदर हार्ट अटॅक येऊन गेला. सुदैवाने त्यांची तबियत आता ठीक आहे. पण अस काही जेव्हा होत तेव्हा आपल्या फॅमिलीच काय? घरच्या कमवित्या व्यक्तीला काही झालं तर फॅमिलीकडे कोण बघेल? असे विचार मनात येतात.
अशा वेळी लाइफ इन्शुरेंस खूप मदतीला येत. तुम्ही नसल्यास तुमच्या फॅमिलीच्या आर्थिक मदतीसाठी लाइफ इन्शुरेंस घेणे प्रत्येक कमवित्या व्यक्तीला गेरजचे आहे.
पण जेव्हा पण लाइफ इन्शुरेंस घ्यायची वेळ येते तुमच्यासमोर 2 ऑप्शन असतील. एक म्हणजे टर्म इन्शुरेंस आणि दुसर म्हणजे व्होल लाइफ इन्शुरेंस. आज आपण व्होल लाइफ इन्शुरेंस काय आहे ते समजून घेऊ (आणि जर तुम्हाला टर्म इन्शुरेंस काय आहे ते समजून घ्यायच असेल तर तुम्ही ही पोस्ट वाचा)
What is Whole Life Insurance?
व्होल लाइफ इन्शुरेंस म्हणजे एक प्रकारच पेरमानेन्ट लाइफ इन्शुरेंस आहे जे पॉलिसीहोल्डरला पूर्ण आयुष्यभरासाठी इन्शुरेंस कवर देते. टर्म इन्शुरेंसमध्ये इन्शुरेंस हे फक्त ठराविक कालावधीसाठी दील जात पण व्होल लाइफ इन्शुरेंसमध्ये लाइफटाइमसाठी Protection मिळत जोपर्यन्त तुम्ही प्रीमियम भरत आहात.
Key Features of Whole Life Insurance:
Lifetime Coverage: व्होल लाइफ इन्शुरेंसमध्ये पॉलिसीहोल्डरला पूर्ण आयुष्यभरासाठी ग्यारंटीड कवरेज मिळत त्यामुळे पॉलिसीहोल्डरसोबत त्याच्या फॅमिली मेंबरना सुद्धा एक शांती मिळते की जीवाला काही झालाच तर लाइफ इन्शुरेंस आहे.
Cash Value Accumulation: एक खास फीचर व्होल लाइफ इन्शुरेंसमध्ये असतो तो म्हणजे Cash value component. या फीचरचा फायदा असा होतो जे प्रीमियम तुम्ही भरणार त्यातील काही रक्कम कॅश अकाऊंटमध्ये जमा होते आणि जसा टाइम जाईल ही रक्कम वाढते. पॉलिसीहोल्डरला ही रक्कम बोनसच्या स्वरूपात दिली जाते.
Guaranteed Premiums: व्होल लाइफ इन्शुरेंसमध्ये तुम्हाला भरावे लागणारे प्रीमियम हे फिक्स आणि ग्यारंटीड असतात याचा फायदा असा होतो की पॉलिसीहोल्डरला माहीत राहत की इन्शुरेंससाठी भविष्यात एवढा खर्च येणारे आणि त्या हिशोबाने तो त्याची तयारी करू शकतो.
Death Benefit: व्होल लाइफ इन्शुरेंसमध्ये जर पॉलिसी होल्डरची डेथ होते तर त्याच्या नॉमिनीला डेथ बेनेफिटची रक्कम दिली जाते. आणि हे पैसे नॉमिनी एखाद कर्ज असल्यास किंवा इतर आर्थिक खर्चासाठी वापरू शकतो.
Benefits of Whole Life Insurance
Wealth Transfer: व्होल लाइफ इन्शुरेंसला तुम्ही एक इन्वेस्टमेंट साधन म्हणून वापरता येत ज्याचा वापर करून तुम्ही वेल्थ बनवून ती तुमच्या पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर करू शकता. डेथ बेनिफिटवर मिळणारी रक्कम फॅमिलीला आर्थिक सपोर्टसाठी वापरता येते.
Tax Advantages: जस आपण आधी चर्चा केली की व्होल लाइफ इन्शुरेंसमध्ये cash value component असत आणि त्यातून मिळणारे पैसे तसेच डेथ बेनिफिटमधून मिळणारे पैसे हे टॅक्स फ्री असतात. त्यामुळे पॉलिसीहोल्डर किंवा त्यानंतर त्याच्या नॉमिनीला व्होल लाइफ इन्शुरेंस टॅक्स बेनिफिटसाठी वापरता येऊ शकते.
Financial Security: व्होल लाइफ इन्शुरेंसमध्ये पॉलिसीहोल्डर तो जो पर्यन्त जीवंत आहेत तो पर्यन्त इन्शुरेंस कवर मिळत. त्यासोबत कॅश वॅल्यूमुळे रक्कम ग्रो होत राहते तसेच त्याच्या डेथनंतर फॅमिलीला डेथ बेनिफिटचे पैसे मिळतात.
आता तुम्हाला व्होल लाइफ इन्शुरेंस काय आहे याची पूर्ण कल्पना असली असेल. तर तुम्ही तुमच्यासाठी काय बेस्ट आहे ते ठरवू शकता. लाइफ इन्शुरेंस घेताना टर्म इन्शुरेंस घ्यावा की व्होल लाइफ इन्शुरेंस यामध्ये अजूनपण कन्फ्युजन असेल तर खाली कमेन्ट करा. यावर आम्ही एक डिटेल पोस्ट नक्की बनवू.
Get Insured, Protect Your Family!