DOMS IPO: – तारीख, कंपनी माहिती,ओव्हरव्ह्यू

Rate this post

DOMS Industries Limited ही प्रख्यात भारतीय स्टेशनरी आणि कला साहित्य निर्मिती कंपनी आहे. तुम्ही शाळेत असताना हा कंपनीचे प्रोडक्ट नक्कीचं वापरले असतील. DOMS Ltd आता लवकरच तिच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी (IPO) तयारी करत आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये, DOMS IPO च्या तारखा, IPO ची उद्दिष्टे आणि कंपनीबद्दल थोडक्यात माहिती समजुन घेणार आहोत.

आणि तुम्हाला माहीत आहे का? हा आयपीओ भारतातील पहिला आयपीओ असणारे जो नव्या T + 3 म्हणजेच Transaction + 3 या सेबीच्या नव्या रुलसोबत मार्केटमध्ये येणार आहे. एक उदाहरण घेऊ, समजा एखादा आयपीओ महिन्याच्या 5 तारखेला संपला तर पुढच्या 3 दिवसात म्हणजे 8 तारखेला तो स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झालाच पाहिजे. 

DOMS IPO ओव्हरव्ह्यू

DOMS IPO 13 डिसेंबर रोजी शेअर मार्केटमध्ये येणार आहे, 15 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शन विंडो बंद होणार आहे. कंपनीचे IPO द्वारे ₹1200 करोड रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये ₹250 करोडचा नवीन इश्यू आणि 850 करोड रुपयांची ऑफर फॉर सेल (OFS – Offer For Sale म्हणजे कंपनीचे मालक त्यांचे शेअर्स मार्केट मध्ये विकत आहेत) असा कंपनीचा प्लॅन आहे. या IPO मध्ये 10% कोटा हा रिटेल Investors साठी असेल, 75% Qualified Institutional Buyers साठी असेल. आणि उरलेला 15% उच्च नेट वर्थ व्यक्तींसाठी (HNIs) समाविष्ट आहे.

DOMS IPO MARATH

DOMS इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल माहिती

R.R इंडस्ट्रीज नावाची एक पार्टनरशिप फर्म म्हणून 1976 मध्ये स्थापना झाली. DOMS इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक क्रिएटिव्ह प्रोडक्ट कंपनी म्हणून विकसित झाली आहे. गुजरातमधील वलसाड येथे असलेल्या कंपनीने 2005 मध्ये आपला प्रमुख ब्रँड “DOMS” सादर केला. DOMS हा भारतातील ‘स्टेशनरी आणि आर्ट’ प्रोडक्टच्या मार्केटमध्ये एक प्रमुख खेळाडू आणि ब्रँड आहे, जो विविध प्रकारचे प्रॉडक्ट ऑफर करतो. 

वेबसाइट 👉 DOMS – Stationery Products Manufacturers in India | Art Material Suppliers (domsindia.com)

DOMS कंपनीचा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ

DOMS सात कॅटेगरीजमध्ये चांगल्या प्रकारे डिझाइन केलेली आणि दर्जेदार ‘स्टेशनरी आणि आर्ट मटेरियल’ प्रॉडक्ट्स ऑफर करते. यामध्ये शैक्षणिक स्टेशनरी, शैक्षणिक कला साहित्य, पेपर स्टेशनरी, किट्स आणि कॉम्बोज, ऑफिस सप्लाय, हॉबी आणि क्राफ्ट आणि Fine Arts प्रॉडक्ट यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे, कंपनीची मेन प्रॉडक्ट, जसे की पेन्सिल आणि Mathematics साठी लागणारी कंपास बॉक्स यांनी मार्केटचा जवळजवळ 29% आणि 30% भाग काबीज केला आहे.

DOMS कंपनी कोणकोणत्या देशात काम करते?

DOMS ने अमेरिका, आफ्रिका, आशिया पॅसिफिक, युरोप आणि मध्य पूर्व मध्ये पसरलेले एक मजबूत जागतिक मल्टी-चॅनल Distribution नेटवर्क स्थापित केले आहे. कंपनीचे प्रॉडक्ट अख्ख्या जगात विकणे हा हेतू बिझनेसच्या दृष्टीकोनातून उत्तम आहे.

DOMS IPO चा हेतू काय आहे?

आयपीओतून येणारे पैसे दोन प्राथमिक कारणांसाठी वापरले जातील. पहिलं म्हणजे, DOMS नवीन मॅन्युफॅक्चरिंगची सुविधा  स्थापन करण्यासाठी हा पैसा वापरला जाईल.   या नवीन मॅन्युफॅक्चरिंगच्या मदतीने नवीन लेखन उपकरणे, वॉटर कलर पेन, मार्कर आणि हायलाइटरसाठी उत्पादन क्षमता वाढवली जाईल. दुसरे म्हणजे, IPO मधून जमा झालेला पैसा इतर कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. 

DOMS कंपनीचा Financial Reports 

Year Revenue Expense PAT
2021 ₹409 ₹417 ₹6.07
2022 ₹686 ₹662 ₹17.14
2023 ₹1217 ₹1078 ₹102.87

 

DOMS IPO चा रजिस्ट्रार कोण असेल? 

Link Intime India Private Ltd ही DOMS IPO साठी रजिस्ट्रार आहे.

Link Intime India Private Ltd
Phone: +91-22-4918 6270
Email: domsind.ipo@linkintime.co.in
Website: https://linkintime.co.in/mipo/ipoallotment.html

DOMS IPO माहिती थोडक्यात (तुम्ही बिझी असाल तर)

घटक माहिती
तारीख 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर, 2023
उद्दिष्ट ₹1200 कोटी उभारणे
इश्यू प्रकार नवीन इश्यू (₹250 कोटी) आणि ऑफर फॉर सेल (₹850 कोटी)
कोटा रिटेल: 10%, QIB: 75%, HNI: 15%
कंपनीबद्दल 1976 मध्ये स्थापना झालेली स्टेशनरी आणि कला साहित्य कंपनी
प्रॉडक्ट पोर्टफोलिओ सात कॅटेगरीजमध्ये विविध प्रकारचे उत्पादने
बाजार भाग भारतात पेन्सिल आणि कंपास बॉक्समध्ये 29% आणि 30% भाग
उपस्थिती अमेरिका, आफ्रिका, आशिया पॅसिफिक, युरोप आणि मध्य पूर्व
IPO चा हेतू नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधा स्थापन करणे आणि इतर कॉर्पोरेट उद्देशांसाठी
आर्थिक रिपोर्ट 2023 मध्ये ₹1217 कोटीचे उत्पन्न आणि ₹102.87 कोटीचे नफा
रजिस्ट्रार Link Intime India Private Ltd
निष्कर्ष गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक संधी

 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Kross Ltd IPO: – SEBI सोबत ₹५०० कोटी IPO ची प्रक्रिया सुरू 

Plan for Financial Freedom: – आर्थिक स्वातंत्र्याचा सोपा मार्ग (जो तुम्हाला शक्य आहे)

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi