UPI New Rules: – RBI ने UPI पेमेंटच्या नियमांमध्ये केले नवे बदल जाहीर

Rate this post

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी UPI (Unified Payment Interface) साठी नवीन नियम जाहीर केले. त्यासोबत सेंट्रल बँकच्या गव्हर्नरनी E-Mandates पेमेंट्स साठी नवीन मर्यादा जाहीर केल्या.

UPI व्यवहार मर्यादा वाढ

आतापर्यन्त UPI साठी Transaction लिमिट दिवसाला 1 लाख एवढी होती. पण आता ती लिमिट RBI ने वाढवली असून ती आता 5 लाख झाली आहे. आता UPI Apps जसे की गूगलपे, फोनपे, Paytm आणि इतर Apps  वापरुन तुम्ही मोठे व्यवहार करू शकता. 

RBI गव्हर्नर यांनी अस सांगितल आहे की, हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना पेमेंटसाठी UPI व्यवहार मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये प्रति व्यवहार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, ज्याचे उद्दिष्ट शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी UPI सेवा देण्याचा आहे. याचा फायदा असा होईल की, हॉस्पिटलची मोठी Bills आणि कॉलेजची फी UPI च्या मदतीने आरामात करता येईल.

UPI व्यवहारांची मर्यादा वाढवल्याने डिजिटल पेमेंटची Efficiency वाढवता येईल कारण आजकाल आपण सगळेच छोट्या मोठ्या पेमेंटसाठी UPI चा वापर करतो. RBI चा लिमिट वाढवण्याचा निर्णय अनेक क्षेत्रांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिजिटल पेमेंट सिस्टमला अनुकूल करण्याचा एक सक्रिय दृष्टीकोन दर्शवितो. संपूर्ण भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी हे मोठे पाऊल आहे.

Recurring पेमेंट्ससाठी नवीन नियम

Recurring पेमेंट म्हणजे अशा पेमेंट ज्या तुम्ही पुन्हा पुन्हा करत असता. जस की म्यूचुअल फंडची SIP, हेंल्थ इन्शुरेंस प्रीमियम भरणे किंवा क्रेडिट कार्डच पेमेंट करणे.

अशा पुन्हा केल्या जाणाऱ्या पेमेंटसाठी कस्टमर E-Mandate देऊन ठेवतात की ठराविक तारखेला एक रक्कम तुमच्या बँक अकाऊंटमधून कट व्हावी.

अशा Recurring Transaction ची लिमिट आधी 15,000 एवढी होती. तसेच यासाठी अतिरिक्त Authentication आवश्यक आहे. पण आता E-Mandate ची लिमिट 1 लाख रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे पेमेंटसाठी ई-आदेशाचा वापर आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

लवकरच येतोय DOMS IPO: – तारीख, कंपनी माहिती,ओव्हरव्ह्यू 

DOMS IPO: – डॉम्स आयपीओची किंमत झाली फिक्स 750-790 रुपये प्रति शेअर 

Zomato Share: – सॉफ्टबँक झोमॅटोमधील 1.1% ची हिस्सेदारी विकणार (उद्या शेअर पडणार?) 

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi