म्यूचुअल फंड काय आहे? फायदे आणि तोटे? | Mutual Fund in Marathi

5/5 - (1 vote)

Mutual Fund in Marathi: जर आपण शेअर मार्केटमध्ये पैसे इन्वेस्ट करण्याचा विचार केला तर पहिलं डोक्यात येत ते म्हणजे म्यूचुअल फंड. कारण शेअर्स निवडून स्वतः पैसे इन्वेस्ट करणे हे सगळयांना शक्य नाही होत. म्यूचुअल फंड हे अस माध्यम आहे ज्याचा वापर करून तुम्ही पैसे अनेक कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करू शकता. या पोस्टमध्ये म्यूचुअल फंड काय आहे? फायदे आणि तोटे, इ. आपण अगदी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. जेणेकरून तुझी पैसे इन्वेस्ट करण्यासाठी एक योग्य म्यूचुअल फंड निवडण्यास सक्षम व्हाल.

Mutual Fund काय आहे?

म्यूचुअल फंड हे एक प्रकारच गुंतवणूकिच साधन आहे ज्यामध्ये आपल्या सारख्या अनेक लोकांकडून एकत्रीतपणे पैसे जमा केले जातात आणि विविध कंपन्यांचे शेअर्स, बॉण्ड्स किंवा इतर Assets मध्ये इनवेस्ट केले जातात. हे पैसे योग्यरित्या इन्वेस्ट करायचं काम एक किंवा अधिक फंड मॅनेजर्स करतात. फंड मॅनेजर्स हे एकत्र जमा केलेला पैसे त्याच्या हिशोबाने, नीट रिसर्च करून चांगल्या कंपन्यांमध्ये इनवेस्ट करतात. त्याचं मेन काम हेच असत की, आपल्या सारख्या इनवेस्टरना शेअर मार्केटपेक्षा जास्त रिटर्न आणून देणे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Mutual Fund चे फायदे 

1. पैशाचं Diversification:  

मार्केटमध्ये 7000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. आता यामधील चांगल्या कंपन्या निवडणे सगळ्यांना शक्य होत नाही आणि त्यासाठी पुरेसा टाइमसुद्धा नसतो. अशा लोकांसाठी शेअर मार्केटमध्ये पैसे इनवेस्ट करण्यासाठी म्यूचुअल फंड हा उत्तम पर्याय आहे. म्यूचुअल फंडचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही इन्वेस्ट केलेले पैसे विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट केले जातात.

जर एखादा नवीन इन्वेस्टर  स्वतः एखादा शेअर घ्यायला जातो तेव्हा तो खूप महाग असतो. त्यासोबत महाग शेअर घेणे म्हणजे फक एकाचं कंपनीमध्ये पैसे इन्वेस्ट  करणे जे खूप Risky असत. पण म्यूचुअल फंडच्या बाबतीत तस अजिबात नाही कारण तुम्ही 500 रुपये इन्वेस्ट करा की 5000, हे पैसे फंड मॅनेजर  वेगवेगळ्या शेअर्समध्ये इन्वेस्ट  करतो. आणि त्यामुळे पैसै चांगल्याप्रकारे Diversify होतात.

2. प्रोफेशनल मैनेजमेंट: 

म्यूचुअल फंड हे फायनान्स या क्षेत्रात एक्स्पर्ट असलेले फंड मॅनेजर्स चालवत असतात. कोणताही शेअर निवडण्यातआधी हे फंड मॅनेजर्स योग्य रिसर्च करतात. एक सामान्य माणूस आणि एकीकडे एक्स्पर्ट फंड मॅनेजर यामध्ये खूप मोठा फरक असतो. फंड मॅनेजर्सकडे योग्य ती साधने असतात कंपन्यांबद्दल डिटेल रिसर्च करण्यासाठी त्यामुळे चांगले शेअर्स निवडतात. याचा फायदा सामान्य Investors ला चांगल्या रिटर्न्सच्या स्वरूपात दिला जातो.

3. पैसे काढणे Easy आहे:

 तुम्ही जितक्या लवकर एखादया Asset मधून पैसे काढू शकता त्याला Liquidity अस म्हणतात. आणि म्यूचुअल फंड या बाबतीत कुठेच कमी नाही. म्यूचुअल फंड दर दिवशी NAV च्या हिशोबाने खरेदी किंवा विकले जातात. अचानक पैशाची गरज लागलीच तुम्ही लगेच त्यातून पैसे काढू शकता.

आधी म्यूचुअल फंडमधून पैसे काढले की T + 3 दिवस लागायचे पण आता ते टायमिंग T + 2 आहे आणि लवकरच T + 1 करण्यात येणार आहे.  (T = Transaction Date ज्या दिवशी तुम्ही पैसे काढता आणि पुढील किती दिवसात तुम्हाला पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळतील हे 2 किंवा 3 दिवसांनी ठरवलं जातं)

4. Mutual Fund स्वस्त आहेत: 

जरा कल्पना करा एखादा नवीन इन्वेस्टर जो आताच जॉबला लागला आहे आणि पहिल्या सॅलरीमधून त्याला 500 रुपये इन्वेस्ट करायचे आहेत. अशा वेळी तो जर एखादा शेअर घ्यायला गेला तर कदाचित तो फक्त एक शेअर तो घेऊ शकेल. आणि जास्त घ्यायचे असतील तर एखादया छोट्या कंपनीचे घेणार जे खूप Risky असतील .

पण  म्यूचुअल फंडच्या माध्यमातून तो 500 रुपयाची SIP करू शकतो आणि हे 500 विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट केले जातात. त्यामूळे कोणीही अगदी छोटया रक्कमेने म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करू शकतो.

5. ऑटोमॅटिक इन्वेस्टमेंट: 

जेव्हा तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये SIP करता तेव्हा महिन्याची एक ठराविक तारीख तुम्हाला फिक्स करायची असते. एकदा का ते केलत की दर महिन्याला आपोआप पैसे तुम्ही निवडलेल्या म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट केले जातात.

त्यासाठी सतत तुम्हाला पोर्टफोलिओ चेक करायची किंवा स्वतः पैसे इन्वेस्ट करायची गरज नाही. याचा फायदा असा होतो की पैसे चांगल्याप्रकारे सेव  आणि इन्वेस्ट केले जातात. यामुळे इन्वेस्टरमध्ये एक Discipline बघायला मिळत.

6. Transparency: 

दर दिवशी अगदी न चुकता प्रत्येक म्यूचुअल फंडला त्यामध्ये किती शेअर्स विकले आणि किती बाकी आहेत हे सगळ सांगाव लागत. तसेच NAV किती हे देखील स्पष्ट करावं लागत. याचा फायदा असा होतो की इन्वेस्टर त्या फंडबद्दल माहिती घेऊन, नीट समजून पैसे इन्वेस्ट करू शकतो.

7. खूप सारे ऑप्शन्स: 

म्यूचुअल फंड हे अनेक प्रकारचे असतात. जर तुम्हाला कमी रिस्क घ्यायची आहे तर इंडेक्स फंड घ्या, जर जास्त रिस्क घेऊ शकता तर स्मॉल कॅप फंड घेऊ शकता. तसेच टॅक्सची बचत करायची असेल तर ELSS फंड घेऊ शकता. अजून खूप सारे म्यूचुअल फंड मार्केटमध्ये आहेत. तुम्ही तुमचे Financial Goals आणि रिस्क घेण्याची क्षमता समजून तुम्हाला योग्य असा फंड निवडू शकता.

8. छोट्या रककमेपासून सुरुवात: 

चांगल्या कंपन्याचे शेअर्स सहसा खूप महाग असतात आणि एका नवीन इन्वेस्टरला तेवढे पैसे फक्त एका शेअरसाठी देणे शक्य होत नाही. पण म्यूचुअल फंडच्या माध्यमातून तुम्ही अगदी 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. आणि आजकाल तर काही फंडमध्ये अगदी १० रुपयांपासून Investing ला सुरुवात करता येते.

ही पोस्ट वाचा 👉 Flexi Cap Fund की Multi Cap Fund कोणता फंड तुमच्यासाठी बेस्ट आहे?

Mutual Fund चे तोटे 

1. फी आणि इतर खर्च: 

जेव्हा तुम्ही एखाद्या म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करता तुम्ही ते पैसे एक किंवा अनेक फंड मॅनेजर्सकडे देत असता. हे फंड मॅनेजर्स तुमच्यासाठी चांगल्या कंपन्या निवडून त्यात तुमचे पैसे इन्वेस्ट करतात.

आता हे सगळी कामे ते फ्रीमध्ये तर करणार नाहीत. यासाठी ते Expense Ratio म्हणून एक फी घेतात. अजून एक खर्च म्यूचुअल फंडमध्ये असतो तो म्हणजे पैसे काढताना एक Exit Load भरावा लागतो. काही फंडसमध्ये Exit Load असतो तर काहींमध्ये नसतो. फंड निवडताना Exit Load आधी चेक करा.

2. तुमचा कमी कंट्रोल: 

तुम्ही पैसे म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट केले म्हणजे आता सगळे निर्णय तुमच्या वतीने फंड मॅनेजर घेतो. कोणती कंपनी निवडायची आणि कोणती नाही यावर तुमचा काही कंट्रोल नसतो.

3. Underperformance ची रिस्क: 

जरी एक्स्पर्ट फंड मॅनेजर एखादा फंड मॅनेज करत असला तरीही त्यामध्ये Underperformance ची रिस्क कायम असते. खूप वेळा अस होत की एखादा फंड Nifty 50 पेक्षा जास्त रिटर्न देऊ नाही शकत. पण इन्वेस्टरकडून फी मात्र घेतली जाते. अशा परिस्थतीमध्ये चांगले रिटर्न तुम्हाला नाही मिळू शकतं.

4. मार्केट रिस्क: 

आता म्यूचुअल फंड म्हंटल की तो एक शेअर मार्केटचा भाग झाला. कारण म्यूचुअल फंडच्या माध्यमातून पैसे हे शेअर मार्केटमध्येच इन्वेस्ट केले जातात. आणि जिथे शेअर मार्केट तिथे मार्केट खाली पडण्याची तर कधी वर जाण्याची पूर्ण शक्यता असते. मार्केटच्या चढ उतराना सहन करायची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. 

Mutual Fund मध्ये कस इनवेस्ट कराव? 

आता म्यूचुअल फंडमध्ये पैसे इनवेस्ट करण्याचे खूप सारे मार्ग आहेत जस की तुम्ही एखाद्या एजेंटच्या मदतीने पैसे इनवेस्ट करू शकता किंवा तुमच्या बँकमध्ये जावून पैसे इनवेस्ट करू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की कोणातही एजेंट किंवा बँक नेहमी तुम्हाला म्यूचुअल फंडचे Regular Plan विकणार कारण त्यामध्ये त्यांच कमिशन असत. दुसरा आणि सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे इनवेस्टिंग  Apps जस की Zerodha Coin, Groww, Angel One आणि असे बरेच apps. एक चांगली गोष्ट या Apps बद्दल ती म्हणजे हे तुम्हाला Direct Plan विकतात ज्यामध्ये तुम्हाला जास्त रिटर्न मिळू शकतो. 

Conclusion

शेअर मार्केटचा प्रवास सुरू करण्यासाठी आणि चांगली वेल्थ बनविण्यासाठी म्यूचुअल फंड एक उत्तम पर्याय आहे. म्यूचुअल फंडमध्ये इनवेस्ट केल्यावर एक्स्पर्टची मदत मिळते आणि सोबत पैसे विविध कंपन्यांमध्ये इन्वेस्ट केले जातात त्यामुळे रिस्क मोठ्या प्रमाणत कमी होते. 

एकंदरीत, म्यूचुअल फंड एक सुरक्षित, सोपी आणि प्रगत गुंतवणूक पर्याय आहे जो तुमच्या वित्तीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उपयुक्त ठरतो. परंतु, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास आणि वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने आणि योग्य निर्णय घेऊन म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

ही पोस्ट वाचा   👉 Navi Mutual Fund ची रिसर्च: तरुणांच्या म्यूचुअल फंड इन्वेस्टिंगमधील चुकांचा पर्दाफाश
तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi