Navi Mutual Fund ची रिसर्च: तरुणांच्या म्यूचुअल फंड इन्वेस्टिंगमधील चुकांचा पर्दाफाश

5/5 - (4 votes)

जून 11, 2024 रोजी Navi Mutual Fund ने एक रिसर्च स्टडी पब्लिश केली ज्यात असे सांगितले आहे की 1981 नंतर जन्मलेल्या 50% म्यूचुअल फंड इन्वेस्टर आणि नॉन-इन्वेस्टर यांच्यासाठी कोणताही म्यूचुअल फंड निवडताना रिटर्न ही टॉप प्रायोरिटी आहे. जास्त रिटर्नची अपेक्षा इन्वेस्टर इंडेक्स फंड तसेच Active म्यूचुअल फंड दोन्हीकडून करतात.

यासोबतच या रिसर्चमध्ये असेही आढळून आले की जवळजवळ 30% इन्वेस्टर (3 पैकी 1) असे आहेत ज्यांना वाटते की म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करण्यासाठी मोठी रक्कम हवी. या रिसर्चमधून हे स्पष्ट होते की अजूनही मार्केटमध्ये म्यूचुअल फंड असो की शेअर मार्केट याबद्दल पुरेशी जागरूकता लोकांमध्ये नाहीये.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

Navi Mutual Fund च्या रिसर्चमधील काही महत्त्वाचे पॉइंट्स:

1) 3 पैकी 1 इंडेक्स फंड इन्वेस्टरला इंडेक्स फंड नक्की काय असतात हेच माहीत नाहीये. ते इंडेक्स फंड फक्त यासाठी घेतात की त्यामध्ये फीज कमी द्यावी लागते किंवा फ्रेंड्स आणि फॅमिलीमधील कोणी इंडेक्स फंडमध्ये इन्वेस्ट करत आहे.

2) आजकालची तरुण पिढी त्यांचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी सोशल मीडियावरील Finfluencers तसेच फायनॅन्स यूट्यूबरवर अवलंबून असतात. जवळजवळ 80% लोक आर्थिक निर्णय घेण्यासाठी सोशल मीडियावरील Finfluencers वर अवलंबून आहेत.

3) सगळेच सोशल मीडियावरील Finfluencers तुम्हाला योग्य सल्ला देतील असे होत नाही. ज्यांचे फॉलोवर्स जास्त आहेत तो चांगला असा समज लोकांचा असतो, जो अगदी चुकीचा आहे. काही सोशल मीडियावरील Finfluencers नको ते फायनॅन्स प्रॉडक्ट लोकांना विकत असतात.

4) जवळजवळ 60% लोकांचा असा गैरसमज आहे की म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करण्यासाठी खूप साऱ्या नॉलेजची गरज लागते. त्यामुळे अनेक जण अजूनही म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करत नाहीत.

5) तसेच 50% लोकांना असे वाटते की जर Investment App जसे की Groww, Zerodha Coin बंद पडले तर त्यांचे पैसे बर्बाद होतील आणि त्यांना परत मिळणार नाहीत. परंतु, जर ऑनलाइन Investing Apps बंद पडले तरी तुम्ही ज्या म्यूचुअल फंड कंपनीमध्ये पैसे इन्वेस्ट करत आहात त्यांच्या Official App, वेबसाइट किंवा CAMS ची साइटवरून पैसे काढता येतील. फक्त तुम्हाला तुमचे म्यूचुअल फंड Folio Number माहीत पाहिजे.

ही पोस्ट वाचा  👉 SEBI च्या नव्या निर्णयामुळे Mutual Fund गुंतवणूकदारांना मोठा दिलासा! जाणून घ्या काय आहेत हे बदल

  Frequently Asked Questions

  या स्टडीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या निष्कर्षांवर भर दिला आहे?

  1981 नंतर जन्मलेल्या 50% म्यूचुअल फंड इन्वेस्टर आणि नॉन-इन्वेस्टरसाठी रिटर्न ही टॉप प्रायोरिटी आहे. 30% इन्वेस्टरना वाटते की म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करण्यासाठी मोठी रक्कम हवी.

  लोकांना म्यूचुअल फंड्सबद्दल कोणते गैरसमज आहेत?

  60% लोकांना वाटते की म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करण्यासाठी खूप साऱ्या नॉलेजची गरज लागते. 50% लोकांना असं वाटतं की जर Investment Apps बंद पडले तर त्यांचे पैसे बर्बाद होतील.

  इंडेक्स फंडबद्दल कोणते गैरसमज आढळून आले आहेत?

  3 पैकी 1 इंडेक्स फंड इन्वेस्टरला इंडेक्स फंड काय असतात हेच माहीत नाहीये. ते इंडेक्स फंड फक्त कमी फीज किंवा मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याने घेतात.

  आजकालची तरुण पिढी आर्थिक निर्णय कसे घेतात?

  आजकालची तरुण पिढी आर्थिक निर्णय घेण्यासाठी सोशल मीडियावरील Finfluencers आणि फायनॅन्स यूट्यूबरवर अवलंबून असतात. जवळजवळ 80% लोक सोशल मीडियावरील Finfluencers वर अवलंबून आहेत.

  सोशल मीडियावरील Finfluencers बद्दल कोणते गैरसमज आहेत?

  सगळेच Finfluencers योग्य सल्ला देतील असे नाही. ज्यांचे फॉलोवर्स जास्त आहेत ते चांगले असे लोकांना वाटते, पण काही Finfluencers नको ते प्रॉडक्ट विकतात.

  जर Investment Apps बंद पडले तर काय करावे?

  जर Investment Apps बंद पडले तरी तुम्ही ज्या म्यूचुअल फंड कंपनीमध्ये पैसे इन्वेस्ट केले आहेत त्यांच्या Official App, वेबसाइट किंवा CAMS ची साइटवरून पैसे काढता येतील. फक्त तुमचे म्यूचुअल फंड Folio Number माहीत असणे आवश्यक आहे.

  Navi Mutual Fund च्या या रिसर्चमधून काय समजते?

  या रिसर्चमधून समजते की मार्केटमध्ये अजूनही म्यूचुअल फंड आणि शेअर मार्केटबद्दल पुरेशी जागरूकता लोकांमध्ये नाहीये आणि अनेक गैरसमज आहेत.

  Leave a Comment

  तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi