Flexi Cap Fund की Multi Cap Fund कोणता फंड तुमच्यासाठी बेस्ट आहे?

5/5 - (1 vote)

Flexi Cap Fund Vs Multi Cap Fund in Marathi: जेव्हा गोष्ट म्यूचुअल फंडमध्ये पैसे इनवेस्ट करण्याची येते, मार्कटमध्ये तुमच्या रिस्क क्षमतेनुसार आणि तुमच्या Financial Goals नुसार पैसे इन्वेस्ट करण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. 

त्यापैकी दोन पर्याय म्हणजे फलेक्सि कॅप फंड आणि मल्टी कॅप फंड जे वाटतात एक सारखेच पण तस नाहीत. या दोन्ही म्यूचुअल फंडचे काही फायदे आहेत तर काही तोटे आणि हेच आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत.

या पोस्टनंतर तुमच्यासाठी कोणता बेस्ट असेल याच उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. चला तर सुरुवात करूया. 

Flexi Cap Fund काय आहे? 

Flexi म्हणजे Flexible.

फलेक्सि कॅप फंड म्हणजे फंड जिथे तुमचा फंड मॅनेजर अगदी त्याच्या मनाप्रमाणे शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये पैसे इनवेस्ट करतो. फलेक्सि कॅप फंडमध्ये फंड मॅनेजरला टोटल 65% एवढी रक्कम Equity म्हणजेच विविध कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये इनवेस्ट करण्याची सूट असते.

याचा अर्थ असा की या 65% पैकी एक ठराविक रक्कम तो त्याच्या पद्धतीने शेअर मार्केटच्या परिस्थितीनुसार थोडे पैसे Small Cap Stocks मध्ये, तर थोडे पैसे Mid Cap Stocks किंवा Large Cap Stocks मध्ये इनवेस्ट करू शकतो. 

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Flexi Cap Fund चे फायदे काय आहेत? 

1. विविधता: फलेक्सि कॅप फंडमध्ये जेव्हा तुम्ही पैसे इन्वेस्ट करता तेव्हा एकाच फंडमध्ये मार्केटमधील विविध कॅटेगरीतील कंपन्यांमध्ये इनवेस्ट करण्याची संधी मिळते.

जस आपण आधी चर्चा केली की फलेक्सि कॅप फंडमधील पैसे हे लार्ज कॅप स्टॉक्स, मिड कॅप स्टॉक्स आणि Small कॅप स्टॉक्स इ. मध्ये इन्वेस्ट केले जातात. याचा फायदा असा होतो की एकाच फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करून पण मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये इन्वेस्ट होतात आणि पैसे Diversify करता येतात. 

2. सतत काम करणारी मॅनेजमेंट: फलेक्सि कॅप फंडचे फंड मॅनेजर्स सतत रिसर्च करत असतात. मार्केटमधील चांगल्या कंपन्या सोधून इन्वेस्टरला चांगला रिटर्न आणून देणे हे त्यांच पहिल काम असत. जस मार्केटमध्ये बदल होतात तस फंड मॅनेजर फंडमधील कंपन्यांमध्ये पैसे इनवेस्ट करत असतात. 

3. Risk-Adjusted Returns: फलेक्सि कॅप फंडमध्ये फंड मॅनेजरकडे एक फ्रीडम असत की तो त्याच्या हिशोबाने पैसे मार्केटमधील विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये इनवेस्ट करू शकतो.

कधी कधी अस होत की, मार्केटमधील  Small कॅप स्टॉक्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तर अशा वेळी फंड मॅनेजर इतर कॅटेगरीतून जसे की लार्ज कॅप आणि मिड कॅप मधून पैसे कमी करून Small कॅप स्टॉक्समध्ये इनवेस्ट करू शकतो. अस केल्याने रिस्कला मॅनेज करून रिटर्न पण चांगला येतो. 

4. लॉन्ग टर्ममध्ये मोठी वाढ: फलेक्सि कॅप फंड अशा इन्वेस्टरसाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे जो लॉन्ग टर्म साठी पैसे इन्वेस्ट करणार आहे कारण जस मार्केटची परिस्थिती बदलत राहते तस फंड मॅनेजर फंडची इनवेस्टमेंटमध्ये बदल करत राहतो.

Flexi Cap Fund चे तोटे काय आहेत? 

1. मॅनेजरच्या स्किलवर अवलंबून राहणे: एखाद्या फलेक्सि कॅप फंडचा परफॉर्मेंस त्याच्या फंड मॅनेजरच्या स्टॉक्स निवडण्याच्या स्किलवर अवलंबून असते.

कधी एखादा स्टॉक विकत घ्यायचा, कधी विकायचा याची समज त्याला असली पाहिजे तरच उत्तम रिटर्न इन्वेस्टरला मिळतील. जर फंड मॅनेजर नवीन असेल, त्याच्याकडे फारस मार्केटचा अनुभव नसेल तर मोठ नुकसान नक्कीच होवू शकत. 

2. Expense Ratio जास्त असतो: आता फंड मॅनेजर एवढी रिसर्च करणार, चांगले स्टॉक्स निवडणार आणि हे सगळ तो फ्री मध्ये तर करणार नाही. यासाठी कोणताही म्यूचुअल फंड असो तो एक फी घेतो त्याला Expense Ratio अस म्हणतात.

Expense Ratio चा वापर करून म्यूचुअल फंड कंपनी फंडचे इतर खर्च पुरे करत असते. त्यामुळे काही फंडचा Expense Ratio खूप जास्त असतो. 

3. मार्केट टाइमिंगची रिस्क: एखादा स्टॉक कधी घ्यायचा आणि कधी विकायचा हे फंड मॅनेजरला समजणे खूप गरजेच आहे. नाहीतर एखाद्या वेळी अस होत की एखादा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत असतो पण फंड मॅनेजर अजून थोडी किंमत कमी झाली की स्टॉक घेईन याचा विचार करत बसतो. आणि ज्या वेळी तो स्टॉक विकत घेतो नेमक तेव्हा तो स्टॉक अजून जास्त पडायला सुरुवात होते. 

4. अस्थिरता: फलेक्सि कॅप फंडमध्ये खूप चढ उतार होत असतात कारण या फंडमध्ये सगळ्या प्रकारच्या कंपन्या असतात. फलेक्सि कॅप फंड इतर फंडस् जसे की लार्ज कॅप फंड  किंवा इंडेक्स फंडच्या तुलनेत जास्त Risky असतात.

Multi Cap Fund काय आहे? 

मल्टी कॅप फंड पण थोडेफार फलेक्सि कॅप फंडसारखे असतात पण यांमध्ये खूप छोटा फरक आहे.

मल्टी कॅप फंडएक वेगळी इनवेस्टमेंट स्ट्रॅटजी फॉलो करतात. मल्टी कॅप फंड मार्केटमधील विविध मार्केट कॅपमध्ये पैसे इनवेस्ट करतात जस की Large-cap, mid-cap,आणि  small-cap स्टॉक्स.

मल्टी कॅप फंडमधील 75% रक्कम ही हे इक्विटि म्हणजेच कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये इनवेस्ट करावे लागतात. पण यामध्ये थोडा फरक असा आहे की या 75% पैकी 25% लार्ज कॅप स्टॉक्स, 25% मिड कॅप स्टॉक्स आणि उरलेले 25% हे समल कॅप स्टॉक्समध्ये इनवेस्ट करावेच लगतात. 

Multi Cap Fund चे फायदे काय आहेत? 

1. विविधता: अगदी फलेक्सि कॅप फंडप्रमाणे मल्टी कॅप फंडसुद्धा तुमच्या इनवेस्टमेंटला विविधता देतात कारण या फंडमधील पैसे मार्केटमधील सगळ्या कॅटेगरीतील कंपन्यांमध्ये इनवेस्ट करता येतात. याचा फायदा असा होतो की फंडची रिस्क कमी होते आणि पैशाला Stability येते. 

2. अँक्टिव मॅनेजमेंट: मल्टी कॅप फंड हे Actively मॅनेज केले जातात. याचा अर्थ असा की काही फायनॅन्स एक्स्पर्ट म्हणजेच फंड मॅनेजर सतत या फंडच्या परफॉर्मेंससाठी प्रयत्न करत असतात. ते चांगले स्टॉक्स घेतात आणि बेकार विकतात जेणेकरुन इन्वेस्टरला चांगला रिटर्न मिळेल. 

3. Flexibility: सेबीच्या नियमानुसार मल्टी कॅप फंड प्रत्येकी 25% एवढी रक्कम लार्ज कॅप स्टॉक्स, 25% मिड कॅप स्टॉक्स आणि 25% स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये इनवेस्ट करू शकतात. बाकीचे उरलेले पैसे इतर Assets मध्ये इनवेस्ट केले जातात. त्यामुळे पैसे फक्त स्टॉक्समध्ये इनवेस्ट न होता इतर Assets जसे की Bonds इ मध्ये इनवेस्ट होतात.

4. विविध Investors साठी योग्य: मल्टी कॅप फंड हे विविध प्रकारच्या Investors साठी एक बेस्ट पर्यात बनतात. ज्याला Investor ला  एकाच फंडमध्ये सगळया टाइपच्या कंपन्या हव्या आहेत तो हा फंड निवडू शकतो. तसेच ज्याला रिटर्न सोबत Stability पण हवीय त्याच्यासाठी पण हा पर्याय योग्य ठरू शकतो.

Multi Cap Funds चे तोटे काय आहेत?

1. लिमिटेड Exposure: जस की आपण आधी चर्चा केली की मल्टी कॅप फंडमध्ये टोटल 25% टक्के रक्कम ही प्रत्येक कॅटेगरीसाठी देणे गरजेच आहे पण जेव्हा फंड मोठा होतो तेव्हा पूर्ण 25% एका कॅटेगरीसाठी देणे खूप कठीण होते.

उदाहरण:- समजा एखाद्या मल्टी कॅप फंडची काही वर्षानी AUM (Asset Under Management) 10,000 करोंड एवढी झाली की मग यातील 25% रक्कम म्हणजेच 2,500 करोंड स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये इनवेस्ट करणे फंड मॅनेजरसाठी खूप कठीण होते कारण स्मॉल कॅप स्टॉक्स खूप Risky असतात.

2. रिटर्नसाठी मॅनेजरवर अवलंबून राहणे: अगदी फलेक्सि कॅप फंडसारख फंडच्या परफॉर्मेंससाठी तुम्हाला फंड मॅनेजरवर अवलंबून रहाव लागत. तो जे स्टॉक्स निवडेल ते जर चांगले असतील तर तुम्हाला रिटर्न चांगला मिळेल. नवीन फंड मॅनेजर्स सहसा चांगले रिटर्न आणून द्यायला असमर्थ ठरतात. 

3. फंडची रिस्क: मार्केटमधील सगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये पैसे इनवेस्ट करण्याचे फायदे पण आहेत पण तेवढेच तोटे पण. फायदा असा की रिटर्न चांगला मिळतो पण रिस्क पण मोठ्या प्रमाणात वाढते. 

कोणता फंड बेस्ट आहे? Flexi Cap Fund की Multi Cap Fund 

या दोन्ही फंड्सपैकी कोणता बेस्ट आहे हे तुमचे इनवेस्टमेंट गोल्स, रिस्क क्षमता आणि स्वतच्या चॉइसवर अवलंबून आहे. दोन्ही फंड तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे इनवेस्ट करण्याची संधी देते. तरीही खालील पॉईंट्स तुम्हाला योग्य फंड निवडण्यास नक्कीच हेल्प करतील. 

  1. जर तुमचा इनवेस्टमेंट टाइम लॉन्ग टर्म आहे आणि त्यासोबत तुम्ही जास्त रिस्क घ्यायला तयार आहात तर फलेक्सि कॅप फंड तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पण तुम्हाला एक Balanced Approach हवाय तर मल्टी कॅप फंड तुमच्या योग्य ठरू शकतो. 
  2. जर तुमची रिस्क घेण्याची क्षमता जास्त आहे तर तुम्ही फलेक्सि कॅप फंड निवडा. फलेक्सि कॅप फंडमध्ये फंड मॅनेजर हवे तसे पैसे एका कॅटेगरीतून काढून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये इनवेस्ट करू शकतो. समजा सध्या मार्केटमध्ये स्मॉल कॅप स्टॉक वाढत आहेत तर तो पैसे तिकडे Invest करू शकतो पण मल्टी कॅप फंडमध्ये ही सुविधा त्याला मिळत नाही. 
  3. जर तुमच्याकडे एखादा इंडेक्स फंड किंवा Large Cap Fund आधीपासून आहे तर तुम्ही मल्टी कॅप फंड निवडू नका कारण तुम्ही ऑलरेडी Large Cap मध्ये पैसे Invest करत आहात. अजून एक मल्टी कॅप फंड घेतलात की अजून त्यातील 25% रक्कम Large Cap Stocks मध्ये Invest होणार त्यापेक्षा फलेक्सि कॅप फंड तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकेल.
  4. कोणताही फंड निवडण्याआधी त्या फंडचा फंड मॅनेजर कोण आहे हे बघा आणि त्याने या आधी कोणते फंड मॅनेज केले आहेत ते बघा यावरून तुम्हाला त्याच्या Investment स्टाईलची आयडिया येईल. जर फंड मॅनेजर एकदम नवीन असेल तर शक्यतो पैसे Invest करणे टाळा मग फंड मल्टी कॅप फंड असो की Flexi Cap Fund
  5. तुमचे Financial Goals काय आहेत हे स्पष्ट करा. त्यानुसार कोणता फंड बेस्ट राहील हे ठरवा. तुम्ही जर मला विचारलत की मी कोणता फंड निवडेन तर मी नेहमीच एक फलेक्सि कॅप फंड निवडेन. 

Conclusion हेच आहे की…

म्यूचुअल फंडच्या दुनियेत Flexi Cap Fund आणि मल्टी कॅप फंडचे त्यांचे त्यांचे काही फायदे आहेत तर काही तोटे.

त्यापैकी तुम्ही कोणता फंड निवडायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन्ही फंडस तुम्हाला तुमचे पैसे चांगल्या प्रकारे Diversify करायची संधी देतात.

कोणताही फंड निवडाल नेहमी लाँग टर्मसाठी निवडा जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा पैसा ग्रो करू शकता. 

Happy Investing! 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 म्यूचुअल फंडवर लोन काढता येत का? | Loans Against Mutual Funds in Marathi (marathifinance.net)

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi