Share Market Tips in Marathi: शेअर मार्केटचा प्रवास रोमांचक असला तरी, तो गोंधळवून टाकणाराही वाटू शकतो. कधी मार्केट वर जात तर कधी लगेच खाली येत. या चढउतारांमधून मार्ग काढून तुमच्या कष्टाचे पैसे नक्की कुठे इन्वेस्ट करावे? त्यासाठी चांगले निर्णय कसे घ्यावे? हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक इन्वेस्टरच्या मनात असतो. पण टेंशन घेऊ नका. शेअर मार्केटमध्ये लॉन्ग टर्ममध्ये यशस्वी होण्यासाठी 5 प्रभावी टिप्स पुढीलप्रमाणे:
नवीन अपडेटसाठी जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance
1) स्टॉक निवडणे कठीण? मग म्यूचुअल फंड आणि ETF तुमच्यासाठी:
स्वता स्टॉक निवडणे आकर्षक असले तरी, त्यासाठी खोल अभ्यास आणि सतर्क निरीक्षण आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये 7000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. यामधून नेमक्या कंपन्या निवडणे संगळ्यांना शक्य होत नाही. यावर उपाय काय? तुम्ही म्यूचुअल फंड किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) चा विचार करा. इथे तुम्हाला सिंगल स्टॉक निवडायची गरज नाही. कारण म्यूचुअल फंड आणि ETF मध्ये आधीपासूनच स्टॉक निवडलेले असतात. तुम्हाला फक्त यामध्ये पैसे इन्वेस्ट करायचे असतात.
2) शेअर मार्केटचा ड्रामा टाळा, तुमच्या मार्गावर रहा:
शेअर मार्केटमध्ये नाट्यमय चढउतार पाहायला मिळतात. न्यूजमध्ये सतत भयानक वातावरण चित्रित केले जाऊ शकते, ज्यामुळे घाबरवून तुम्हाला स्टॉक किंवा म्यूचुअल फंड विक्री करण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्यामुळे अशा न्यूजपासून जरा सावध रहा.
इतर पोस्ट वाचा 👉म्यूचुअल फंड काय आहे? फायदे आणि तोटे?
3) नेहमी लॉन्ग टर्मचा विचार करा:
लॉन्ग टर्ममध्ये शेअर मार्केट नेहमी वरच गेल आहे. पण शॉर्ट टर्ममध्ये शेअर मार्केटमध्ये घसरण होतच असते. जरी शॉर्ट टर्ममध्ये घसरण होत असली तरी तुमच्या लॉन्ग टर्म ध्येयावर लक्ष केंद्रित केल्याने या अडचणी दूर होतात. लॉन्ग टर्ममध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे बनतात. म्हणून तात्कालिक चढउतारांनी तुमचे निर्णय डळमळू देऊ नका. लॉन्ग टर्म गुंतवणूक करा.
4) नियमितपणे पैसे इन्वेस्ट करत रहा:
शेअर मार्केटमध्ये संपत्ती तयार करणे ही छोटी शर्यत नाही तर मॅरेथॉन आहे. शेअर मार्केटचे वातावरण कसेही असो तुम्हाला सातत्याने पैसे इन्वेस्ट करायचे आहेत. रूपी-कॉस्ट एव्हरेजिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पद्धतीमुळे तुम्ही विविध किमतीमध्ये शेअर्स खरेदी करू शकता किंवा म्यूचुअल फंडचे यूनिटस घेऊ शकता.
रूपी-कॉस्ट एव्हरेजिंग म्हणजे मार्केट पडल की जास्त स्टॉक किंवा म्यूचुअल फंड युनिट घेता येतात, याउलट मार्केट वर गेल की आपल्याला कमी स्टॉक आणि म्यूचुअल फंड युनिट मिळतात. पण लॉन्ग टर्ममध्ये या किमती Average होवून जातात. त्यामुळे आज मार्केट वर आहे नंतर पैसे इन्वेस्ट करेन किंवा मार्केट अजून खाली येऊदेत मग इन्वेस्ट करेन. अस करणे बंद करा आणि नियमितपणे पैसे इन्वेस्ट करत रहा.
इतर पोस्ट वाचा 👉Long-Term Investing म्हणजे नक्की किती?
5) संयम तुमचा मित्र आहे:
शेअर मार्केटमध्ये तुमची सहनशीलता (Patience) फार महत्वाची आहे. एका रात्रीत श्रीमंत होण्याची अपेक्षा करू नका. संयमी राहिल्यास तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर टिकून राहाल. लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये हळूहळू आणि स्थिरपणे पैसे इन्वेस्ट करणारा जिंकतो.
The stock market is designed to transfer money from the impatient to the patient.
Warren Buffet
एक महान इणवेस्टर वॉरेंन बफेट यांनी म्हटल आहे, शेअर मार्केटची रचना असंयमी व्यक्तीकडून संयमी व्यक्तीकडे पैसे हस्तांतरित करण्यासाठी केली आहे. म्हणून जो टिकून राहतो तो पैसे कमवितो हे मात्र 100% खर आहे.
निष्कर्ष | Conclusion
शेअर मार्केटमध्ये यशस्वी होणं सोपं नाही, पण अशक्यही नाही. वरील 5 टिप्स तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात मदत करतील. लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये धीर धरणं आणि शिस्तबद्ध राहणं गरजेचं आहे. त्वरित श्रीमंत होण्याची अपेक्षा करू नका आणि लॉन्ग टर्म गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांचा आणि जोखीम सहनशीलतेचा (Risk Capacity) काळजीपूर्वक विचार करा. All The Best!
नवीन अपडेटसाठी जॉइन टेलीग्राम चॅनल (आजच) 👉 @marathifinance
1 thought on “Share Market Tips: या 5 हेल्पफुल टिप्स फॉलो करा, शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हा”