मी नोकरी करतोय पण आर्थिक स्वातंत्र्यासाठी अजून काय केल पाहिजे? | Financial Freedom in Marathi

Rate this post

तुमच्याकडे नोकरी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही आर्थिकदृष्ट्या मुक्त होण्यासाठी दुसर काम करू शकत नाही.

कॉलेज झालं की आजकाल मनासारखी नोकरी मिळणे कठीण झालाय. त्यात आजकाल सतत न्यूजवर येत असत की अमुक तमुक कंपनीने एवढ्या एम्प्लॉइजना कामावरून काढल.

पण  या सगळ्यात जर तुमच्याकडे एक नोकरी आहे तर तुम्ही खरंच नशीबवान आहात. आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवण्यासाठी  नोकरी हा एक मजबूत पाया बनू शकतो. कारण 99% लोक नोकरी करूनच त्यांची पहिली कमाई करतात.

पण नोकरी मिळाली की काम झालं अस होत नाही. नोकरी सोबत तुम्ही अजून काय काय करू शकता किंवा केलं पाहिजे, जेणेकरुन तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळवू शकता.

टाईम मॅनेजमेंट शिका 

आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पूर्ण वेळ फक्त काम करत बसणार. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट पण आल पाहिजे. कारण योग्यरित्या टाइम मॅनेज कराल तेव्हाच तुमचा टाइम काही महत्वाच्या गोष्टींवर देता येईल जस की

वाचन करणे:- Investing, पर्सनल फायनॅन्स किंवा एखाद नवीन स्किल शिकणे जे तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम करण्यास मदत करेल. ही कामे तुम्ही दिवसभरात थोडा वेळ काढून शिकू शकता.

Side Hustle चालू करणे:- Side Hustle म्हणजे एक्स्ट्रा इन्कमसाठी चालू केलेल एखाद काम. मग ते ब्लॉगिंग असू शकत, फोटोग्राफी असू शकत किंवा यूट्यूब करणे. दिवसाचे काही तास तुम्हाला चांगली इन्कम देऊ शकतात.

इतर पोस्ट वाचा 👉श्रीमंत व्हायचय ना? मग या 4 स्टेप्स नक्की फॉलो करा

बचत करण्यास प्राध्यान द्या

तुमच्या नोकरीमधून तुम्हाला एक फिक्स इन्कम येत असते. पण ही आलेली इन्कम तुमच्यापासून लगेच दूर जाणार नाही यासाठी तुम्ही खालील गोष्टी केल्या पाहिजेत.

खर्च ट्रक करा:- पैसे तर येतात पण ते नक्की जातात कुठे आणि किती जातात, याची माहिती तुम्हाला असायला हवी. ते जर माहीत असेल तर तुम्ही वायफळ खर्च टाळू शकता.

बचत ऑटोमॅटिक करा:- जसा पगार झाला की एक ठराविक रक्कम बाजूला झाली पाहिजे जिचा वापर तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी करणार आहात.

पैसे कसे वाढतील यावर लक्ष द्या 

पैसे वाढलेले कोणाला नाही आवडणार. पैसे तसेच राहिले की फक्त महागाईच शिकार होतात. म्हणून पैशाला कामाला लावणे गरजेच आहे. यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.

Investing: – तुमच्या नोकरीमधून येणाऱ्या पैशातून तुम्ही म्यूचुअल फंड, इंडेक्स फंड, स्टॉक्स किंवा रीयल इस्टेट इ. मध्ये इन्वेस्ट करु शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमचे पैसे इन्वेस्ट करता तेव्हा खर तर पैशापासून पैसा बनायला सुरुवात होते.   .

इतर पोस्ट वाचा 👉 तुमच्या पैशापासून पैसा कसा बनवाल? 

तुमची कमाईची क्षमता वाढवा

नोकरी व्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्कम संगळ्यांना हवी असते. पण ती एक्स्ट्रा इन्कम नक्की कशी होणार याचा विचार तुम्ही केला पाहिजे. एक काम तुम्ही करू शकता ते म्हणजे

स्वतःचे स्किल्स वाढवणे: आजकाल AI चा जमाना आलाय. सहा महीने आधी शिकलेली एखाद गोष्ट किंवा स्किल आजकाल काही कामच राहत नाही. सतत काहीतरी नवीन बदल होत असतात. सतत काहीतरी नवीन गोष्टी येत असतात. आता या सगळ्यात तुम्ही स्वताला कस टिकवून ठेवता ही खरी परीक्षा आहे.

तुमच्याकडे असे स्किल्स हवेत की कोणी तुम्हाला बदलू शकत नाही किंवा तुमची जागा घेऊ शकत नाही.

नेहमी लक्षात ठेवा 

जर तुम्ही नोकरीसोबत अगदी प्रामाणिकपणे दुसऱ्या मार्गाने इन्कम करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. नोकरीतून आलेल्या पैशाचा वापर करून एक्स्ट्रा पैसे कमवा. आणि हो सगळ तुम्हाला सातत्याने करायच आहे. तरच तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) गाठू शकता.

जॉइन टेलीग्राम चॅनल👉 (@marathifinance)

6 thoughts on “मी नोकरी करतोय पण आर्थिक स्वातंत्र्यासाठी अजून काय केल पाहिजे? | Financial Freedom in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi