MUTUAL FUND SIP: एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?

5/5 - (1 vote)

MUTUAL FUND SIP: सध्याच्या आर्थिक परिस्थितीत, बचत आणि गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. विशेषतः तरुणांसाठी आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी. SIP (Systematic Investment Plan) हा गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग आहे जो तुम्हाला दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवून दीर्घकाळात मोठा फायदा मिळवण्यास मदत करतो.

या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण SIP मध्ये ₹500 ते ₹1000 गुंतवून तुम्हाला किती फायदा होऊ शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत.

जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance

SIP मध्ये गुंतवणूक कशी केली जाते? | How to invest in SIP?

SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे Demat अकाऊंट असलच पाहिजे अस अजिबात नाही. तुम्ही अनेक बँका आणि AMC (Asset Management Companies) द्वारे म्युचुअल फंडमध्ये डायरेक्ट पैसे इन्वेस्ट करू शकता. पण आजकाल प्रत्येकाकडे एकतरी Demat Account नक्कीच असत जस की Groww, Zerodha इ. तुम्ही या Investing Apps च्या मदतीने  तुमच्या SIP साठी फंड निवडू शकता आणि दर महिन्याला गुंतवण्याची एक रक्कम निश्चित करू शकता.

SIP मध्ये गुंतवणुकीचे फायदे | Benefits of SIP

नियमितपणे गुंतवणूक: SIP तुम्हाला दर महिन्याला एका निश्चित तारखेला एका निश्चित रकमेची गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. यामुळे तुमच्या गुंतवणुकीची शिस्त राखण्यास मदत होते आणि दीर्घकाळात चांगला रिटर्न मिळवता येतो.

रुपये-सरासरी लागत: SIP मुळे तुम्हाला शेअर बाजाराच्या अस्थिरतेचा फायदा घेता येतो. जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा तुम्हाला कमी किमतीत जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार वाढतो तेव्हा तुम्हाला कमी किमतीत खरेदी केलेल्या युनिट्सचा फायदा मिळतो.

दीर्घकालीन संपत्ती निर्मिती: SIP मुळे तुम्हाला दीर्घकालात तुमची संपत्ती वाढवण्यास मदत होते. शक्तिशाली चक्रवाढी व्याजामुळे (Power of Compounding) तुमची गुंतवणूक वेळेनुसार झपाट्याने वाढते.

इतर पोस्ट वाचा 👉स्टेप अप एसआयपी काय आहे? का केली पाहिजे? | Step Up SIP in Marathi

तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला ₹500 ते ₹1000 गुंतवून किती फायदा मिळवू शकता हे अनेक घटकांवर अवलंबून आहे, जसे की:

तुम्ही निवडलेला म्युचुअल फंड: मार्केटमध्ये खूप प्रकारचे म्यूचुअल फंड उपलब्ध आहेत. तुम्ही कोणता फंड निवडता यावर तुम्हाला किती रिटर्न मिळणार हे अवलंबून असते. जर इंडेक्स फंड निवडलात तर 12 -14%, जर फलेक्सि कॅप फंड निवडलात तर 15- 18% आणि जर तुम्ही खूप रिस्क घेऊन Small कॅप फंड निवडलात तर त्यावर 20% पेक्षा जास्त रिटर्न पण मिळू शकतो.

गुंतवणुकीचा कालावधी: तुम्ही किती वर्षासाठी SIP करत आहात यावरून तुम्ही किती संपत्ती बनवणार हे ठरत. सुरुवातीचे 5-10 वर्ष हे नेहमीच कठीण असतात. कारण यामध्ये पैसे खूप हळू हळू वाढत असतात. पण त्यानंतर खरी कमाल व्हायला सुरुवात होते. नेहमी लॉन्ग टर्मचा विचार करून SIP करा. लॉन्ग टर्म 20,30 त्याहून जास्त वर्षे.

शेअर बाजाराची कामगिरी: तुम्ही जो म्यूचुअल फंड निवडता त्याचा फंड मॅनेजर तुमच्यासाठी शेअर बाजारातील चांगल्या कंपन्या निवडत असतो. जर मार्केट बेकार पेरफॉर्म करत असेल आणि त्याला चांगल्या कंपन्या नाही मिळाल्या तर तुम्हाला पण चांगला रिटर्न मिळणार नाही.

इतर पोस्ट वाचा 👉 तुमच्या रिस्क क्षमतेनुसार म्यूचुअल फंड कसा निवडाल?

एक गणित करून बघूयात की 1000 रुपयाची SIP फक्त 12% च्या रिटर्नवर किती रिटर्न देईल तेही विविध वर्षाच्या कालावधीमध्ये? 

वर्षे टोटल गुंतवणूक टोटल रिटर्न  (₹) फायनल रक्कम  (₹)
10 ₹120,000 ₹23,866 ₹143,866
20 ₹240,000 ₹207,892 ₹447,892
30 ₹360,000 ₹811,621 ₹1,171,621
40 ₹480,000 ₹2,285,582 ₹2,765,582
50 ₹600,000 ₹6,760,625 ₹7,360,625

500 रुपयाची SIP फक्त 12% च्या रिटर्नवर किती रिटर्न देईल तेही विविध वर्षाच्या कालावधीमध्ये? 

वर्षे टोटल गुंतवणूक  (₹) टोटल रिटर्न  (₹) फायनल रक्कम  (₹)
10 ₹60,000 ₹11,010 ₹71,010
20 ₹120,000 ₹123,764 ₹243,764
30 ₹180,000 ₹440,425 ₹620,425
40 ₹240,000 ₹1,294,826 ₹1,534,826
50 ₹300,000 ₹3,773,155 ₹4,073,155

जर तुम्ही नीट लक्ष दिलत तर समजेल की शेवटच्या वर्षात पैसा किती वेगाने वाढतो. भलेही छोटी रक्कम का होईना आपल्याला लॉन्ग टर्मसाठी इन्वेस्ट करत राहायच आहे. आणि आपण इथे  फक्त 12% चा रिटर्न घेतला आहे. जर तुम्ही फलेक्सि कॅप किंवा SMALL कॅप फंड किंवा इतर फंड SIP साठी निवडलात तर तुम्हाला त्यावर रिटर्न अजून जास्त मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला रिस्कसुद्धा जास्त घ्यावी लागेल.

मुख्य मुद्दा असा आहे की, SIP एक बेस्ट मार्ग आहे लॉन्ग टर्ममध्ये वेल्थ बनविण्याचा. सुरुवात करा. इन्वेस्ट करा आणि करत रहा

इतर पोस्ट वाचा 👉तुमच्या टाइम आणि पैशाचा योग्य वापर कसा आणि कुठे कराल ? | How to Use Time and Money Properly in Marathi 

10 thoughts on “MUTUAL FUND SIP: एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi