Quant Mutual Fund वर सेबीची चौकशी, फ्रंट रनिंग केल्याचे आरोप, काय आहे फ्रंट रनिंग?

5/5 - (1 vote)

तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की Quant Mutual Fund चे खूप सारे म्युच्युअल फंड आपल्या आपल्या कॅटेगरीमध्ये नेहमी टॉपवर असतात. या म्यूचुअल फंडने इन्वेस्टरना चांगला पैसा बनवून दिला आहे. पण नुकतंच सेबीने फ्रंट रनिंगसंबंधी (Front Running) या फंडकडे चौकशी करत आहे. Value Research नुसार Quant Mutual Fund कडे आजच्या तारखेला जवळजवळ 84,000 कोटी AUM (Asset Under Management) आहे. हा फंड जास्त नाही फक्त 10 वर्षे जुना आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

फ्रंट रनिंग म्हणजे काय? | What is Front Running?

जेव्हा एखाद्या म्यूच्युअल फंड मॅनेजरला माहीत असतं की तो किंवा त्याची कंपनी म्यूच्युअल फंडकडे आपल्या सारख्या सामान्य लोकांकडून आलेल्या पैशाचं काय करणार आहे किंवा नक्की कोणत्या स्टॉकमध्ये इन्वेस्ट करणार आहेत, तेव्हा तो फंड मॅनेजर आधीच स्वतःच्या अकाऊंटवर किंवा फॅमिलीच्या अकाऊंटवर ते स्टॉक्स आधीच घेऊन ठेवतो. याला फ्रंट रनिंग असं म्हणतात. आता त्या फंड मॅनेजरला यातून खूप सारा प्रॉफिट होतो कारण म्यूच्युअल फंड कंपन्या मोठ्या मोठ्या रकमांचे स्टॉक्स विकत घेतात.

Quant Mutual Fund चे काही प्रसिद्ध फंड आणि त्याचे रिटर्न

फंडाचे नाव१ वर्षाचा रिटर्न (%)३ वर्षांचा रिटर्न (%)५ वर्षांचा रिटर्न (%)
Quant Infrastructure Fund Direct84.8237.7338.92
Quant Mid Cap Fund Direct75.6135.1837.42
Quant Value Fund Direct75.27NoneNone
Quant Business Cycle Fund Direct70.86NoneNone
Quant BFSI Fund Direct70.61NoneNone
Quant Large and Mid Cap Fund Direct69.7931.9729.90
Quant Small Cap Fund Direct68.5334.8644.39
Quant Quantamental Fund Direct63.9934.73None
Quant Flexi Cap Fund Direct63.6527.9634.41
Quant Dynamic Asset Allocation Fund Direct62.14NoneNone

तुम्ही Quant Mutual Fund मध्ये पैसे इन्वेस्ट करता? तुम्ही काय केल पाहिजे?

सेबीने फक्त चौकशी करत आहेत. या फंडवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे टेंशनमध्ये येऊन म्यूचुअल फंडमधील सगळे पैसे काढू नका. Quant च्या काही फंडमधून लोकांनी पैसे काढायला सुरुवात केली आहे. पण आधी पूर्ण माहिती समजून घ्या. मग काय तो निर्णय घ्या.

ही पोस्ट वाचा : एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?

FAQs

1. Quant Mutual Fund म्हणजे काय?

Quant Mutual Fund एक म्यूच्युअल फंड कंपनी आहे जी विविध प्रकारचे म्यूच्युअल फंड ऑफर करते. या फंडने अल्पावधीतच इन्वेस्टरना चांगले रिटर्न दिले आहेत, आणि त्यांचे अनेक फंड आपल्या कॅटेगरीमध्ये नेहमीच टॉपवर असतात.

2. फ्रंट रनिंग म्हणजे काय?

फ्रंट रनिंग म्हणजे म्यूच्युअल फंड मॅनेजरला माहीत असते की तो किंवा त्याची कंपनी कोणत्या स्टॉकमध्ये इन्वेस्ट करणार आहे. ही माहिती वापरून, तो मॅनेजर आधीच स्वतःच्या किंवा फॅमिलीच्या अकाऊंटवर ते स्टॉक्स खरेदी करतो. यामुळे त्या मॅनेजरला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होतो.

3. Quant Mutual Fund ची सध्याची स्थिती काय आहे?

आजच्या तारखेला, Value Research नुसार Quant Mutual Fund कडे जवळजवळ 84,000 कोटी AUM (Asset Under Management) आहे. हा फंड फक्त 10 वर्षे जुना असून त्याने इन्वेस्टरना चांगले रिटर्न दिले आहेत. मात्र, सेबीने फ्रंट रनिंगसंबंधी चौकशी सुरू केली आहे.

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi