तुमच्या रिस्क क्षमतेनुसार म्यूचुअल फंड कसा निवडाल? | How to Select Mutual Fund in Marathi

Rate this post

Mutual Fund in Marathi: या लॉन्ग टर्म इनवेस्टिंगच्या प्रवासात स्वतच्या रिस्क क्षमतेला नीट समजणे खूप कठीण आहे.

आपण सगळेच बोलतो की माझी रिस्क क्षमता एवढी आहे आणि तेवढी आहे पण या रिस्क क्षमतेच नक्की मोजमाप करायच कस? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

आपल्याला माहीत रिस्कच्या 3 मुख्य कॅटेगरीज आहेत जस की लो रिस्क, मिडियम रिस्क आणि हाय रिस्क.  आपण आपल्याला वाटेल त्या एका कॅटेगरीला आपल करून बसतो. पण अशाप्रकारे रिस्क क्षमता ओळखणे योग्य आहे का? की अजून कोणता मार्ग आहे?

तेच आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया.

प्रत्येक इन्वेस्टर Mutual Fund निवडताना बोलतो की माझी रिस्क क्षमता एवढी एवढी आहे पण हा फक्त एक अंदाज असतो.

कदाचित एखाद्याला वाटत आहे की त्याची रिस्क क्षमता जास्त आहे पण मार्केट जेव्हा क्रॅश होत तेव्हा हजार वेळा हाच इन्वेस्टर त्याच Demat अकाऊंट चेक करत असतो. किंवा एखादा इन्वेस्टर असा आहे जो बोलतो माझी रिस्क घेण्याची क्षमता नाहीये. मी जास्त रिस्क नाही घेऊ शकत पण मार्केट 10-20% ने क्रॅश झाल तरी भावाला काहीच फरक पडत नाही. तो रात्री आरामात झोपतो आणि एकाची पूर्ण झोपच उडते.

तुमची रिस्क क्षमता काय आहे? 

तुम्हाला माहीत असेल की एखादा व्यक्ति किती हुशार आहे हे चेक करण्यासाठी त्याचा IQ (intelligence quotient) किती आहे हे चेक केल जात आणि त्यासाठी काही टेस्ट केल्या जातात.

आता मी तुम्हाला IQ टेस्ट करायला सांगणार नाहीये कारण मला माहीत आहे की तुम्ही सगळे हुशार आहात पण मी तुम्हाला तुमचा RQ (Risk Quotient) चेक करायला नक्की सांगेन. आता हे RQ काय आहे? तुम्ही किती हुशार आहात हे समजण्यासाठी IQ टेस्ट असते अगदी तसंच तुम्ही नेमकी किती रिस्क घेऊ शकता यासाठी असत RQ टेस्ट असते.

आता यासाठी तुम्हाला काही सिम्पल टेस्ट करायच्या आहेत. टेंशन घेऊ नका मी तुम्हाला कोणत्या डॉक्टरकडे पाठवत नाहीये. इथे तुम्हीच डॉक्टर आहात आणि तुम्हीच पेशंट. RQ टेस्ट करण्यासाठी काही प्रश्न स्वताला विचारा आणि हो त्याची खरी खरी उत्तर द्या. उगाच अंदाज लावू नका.

  1. तुम्हाला एखादा म्यूचुअल फंड (किंवा स्टॉक) निवडताना सतत कोणाची मदत लागते का?
  2. जरी तुम्ही चांगला म्यूचुअल फंड निवडलात तरी तो बेस्ट आहे की नाही अशी भीती सतत वाटत राहते का?
  3. जेव्हा मार्केट क्रॅश होत जस की 5% – 10% तेव्हा तुमच पहिल रिएक्शन काय असत?
  4. स्टॉक मार्केटमधून तुम्हाला नक्की किती रिटर्नची अपेक्षा आहे?

चौथा नंबरचा प्रश्न घेऊन काही दिवस अगोदर मी इनस्टावर पोस्ट टाकली होती.

त्या पोस्टमध्ये खूप जणांनी रीप्लाय केल आहे आणि त्यांना किती रिटर्न हवंय हे सांगितल आहे. पण इंट्रेस्टिंग गोष्ट अशी की कोणी 13% – 15% ची अपेक्षा करत आहे तर कोणी 20% तर कोणी 30%. एकाने तर 99% लिहिल आहे. मुद्दा हा नाही की तुम्ही किती नंबर लिहिला आहे. मुद्दा हा आहे की त्या नंबरमागे लॉजिक काय आहे. आणि ते आपण समजून घेणे खूप गरजेच आहे. (वेळ मिळाला तर या पोस्टवरील कमेन्ट वाचा)

वरील 4 प्रश्न आणि त्यांची प्रामाणिक उत्तरे तुम्हाला स्वताला द्यायची आहेत. कारण जस मी म्हटलं होत की या टेस्ट तुम्ही स्वतःच करणार आहात.

आता टेस्ट केल्यानंतर जर म्यूचुअल फंड किंवा स्टॉक निवडताना अजून पण तुम्हाला कोणाची गरज लागते तर तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका. जर तुम्हाला म्यूचुअल फंडमध्ये इनवेस्ट केल्यानंतर सतत ही चिंता असते की हा बेस्ट फंड आहे ना? की दुसरा फंड घेऊ? तर मार्केटमध्ये मोठी रिस्क घेण्यासाठी तुम्ही तयार नाही आहात.

कारण प्रत्येक वेळी तुम्हाला कोणी सल्ला देणार नाही. तुम्ही ठीक करत आहात अस Validation देणार नाही. एक दिवशी तुम्हाला इनवेस्टिंगचे निर्णय स्वता घ्यावे लागतील तेही अगदी विश्वासाने.

वरील 3 नंबरचा प्रश्न आणि सगळ्यात महत्वचा आहे कारण जेव्हा मार्केट क्रॅश होत ना तेव्हा कोण किती लॉन्ग टर्म इन्वेस्टर आहे हे आपल्याला समजत.

तुम्ही कितीही मार्केट क्रॅश झाल तरी शांत असता. तुम्हाला मार्केट क्रॅशचा फारसा काही फरक पडत नाही. 20% – 30% मार्केट डाऊन झाल तर तुमचा आत्मविश्वास लगेच डगमगायला लागत नाही ना हे बघा. ज्या लोकांनी 2020 मध्ये झालेला करोना मार्केट क्रॅश पाहिला असेल त्यांना चांगली माहिती असणार की ते किती रिस्क घेऊ शकतात.

कारण स्वता घेतलेला अनुभव आणि त्यातून मिळालेळी शिकवण ही सगळ्यात मोठी असते.

Your Mutual Fund & Your Risk

स्वतच्या रिस्कला समजून घेणे हे फक्त तुमच्या हातात आहे कारण स्वतापेक्षा चांगल तुम्हाला कोणी ओळखू शकत नाही.

तुम्ही कोणता म्यूचुअल फंड निवडता किंवा स्टॉक निवडता यापेक्षा तुम्ही तो म्यूचुअल फंड किंवा स्टॉक निवडल्यानंतर कसं वागता याला जास्त महत्व आहे. आपण बोलतो की मी एक लॉन्ग टर्म इन्वेस्टर आहे आणि एखादा फंड निवडताना त्याचा 3 वर्षाचा रिटर्न बघतो आणि तो फंड निवडतो. 3 वर्ष म्हणजे लॉन्ग टर्म तर अजिबात होत नाही आणि खास करून शेअर मार्केटमध्ये.

अजून एक गोष्ट म्हणजे सुरुवात करताना 5% – 10% रक्कम शेअर मार्केटमध्ये इनवेस्ट करा.

जस टाइम होईल तस तुमची इनवेस्टिंग रक्कम वाढवा. मार्केट कस वागत हे समजलात की मग तुम्हाला कसली भीती वाटणार नाही. तुम्ही जे निर्णय घ्याल ते पक्के असतील. आणि हो 50% -60% च्या वरती पैसे शेअर मार्केटमध्ये लावू नका. पैसा Diversify करणे गरजेच आहे. सगळे पैसे एकाच ठिकाणी नका ठेऊ.

लाइफमध्ये खरी परीक्षा हीच असेल की जेव्हा मार्केट क्रॅश सारखी परिस्थिती येते तेव्हा तुम्ही एका नवीन इनवेस्टर सारखे वागता आणि टेंशन घेता की एका स्मार्ट इनवेस्टर सारखे वागता आणि टेंशन न घेता तुमच्या म्यूचुअल फंड आणि स्टॉक्सवर विश्वास ठेवून तुमचा इनवेस्टिंग प्रवास चालू ठेवता.

आणि हो तुम्ही फंड कोणताही निवडा इंडेक्स फंड, फलेक्सि कॅप फंड किंवा Small कॅप फंड ते निवडल्यानंतर कसे वागता हे गरजेच आहे.

Warren Buffett mutual fund in marathi

वॉरेन बफेट यांनी अगदी सुंदररित्या सांगितल आहे, इन्वेस्टरची सगळ्यात महत्वाची क्वालिटी तो किती हुशार आहे यावरून ठरत नाही तर तो कसा वागतो ही आहे.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा👉मला फक्त बेस्ट म्यूचुअल फंड हवाय! (Mutual Fund Investing Mistake)

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

1 thought on “तुमच्या रिस्क क्षमतेनुसार म्यूचुअल फंड कसा निवडाल? | How to Select Mutual Fund in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi