तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की या जगात आपल्या सर्वांसाठी एकच प्लान बनवला आहे. शाळा-कॉलेज संपवून नोकरी मिळवणं, अनेक वर्षं त्याच नोकरीत घालवून मग 60 च्या दशकात निवृत्ती घेणं हेच बहुतेकांचं आयुष्य असतं. अस करून अनेक जण आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळवू शकत नाहीत.
जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance
पण आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) मिळविण्यासाठी यापेक्षा काही चांगला पर्याय उपलब्ध आहे का?
उत्तर आहे हो, नक्कीच आहे!
हे खरं आहे की नोकरीमुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळतं. पण पैसे मिळाल्यावर तुम्हाला इतर गोष्टींसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. जसे की तुमचे छंद, वेळेवर नियंत्रण इत्यादी. पण सत्य हेच आहे की एक आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला 9-5 च्या नोकरीत अडकून राहायची गरज नाही.
खाली दिलेली रणनीती (Strategy) तुम्हाला 9-5 च्या नोकरीच्या जाळ्यातून बाहेर पडण्यास मदत करू शकते:
1. नोकरीपासून सुरुवात करा: कितीही झालं तरी पहिल्या कमाईची सुरुवात ही आपल्या पहिल्या नोकरीपासून होते. सुरुवात करताना असा जॉब बघा जिथे तुम्हाला चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळेल. त्यातील काही उत्पन्न तुम्हाला बचत (Save) करायचं आहे.
2. पैसे फक्त खर्च करू नका तर गुंतवा: नोकरीमधून मिळणारं उत्पन्न हे एका प्रकारे बीज आहे. त्यातील थोडी रक्कम तुम्हाला भविष्यासाठी गुंतवायची आहे. स्टॉक, म्युच्युअल फंड, ETF इत्यादीमध्ये पैसे गुंतवा. असं केल्याने काही वर्षांनी तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकता.
इतर पोस्ट वाचा 👉एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?
3. साइड हसल सुरू करा: येथे खरी जादू घडते. अशी एखादी गोष्ट ज्यामध्ये तुम्ही खूप पॅशनेट आहात. मग ते फ्रीलांसिंग असो, ब्लॉगिंग असो की YouTube किंवा इतर काही. नोकरीसोबत तुम्हाला एक साइड हसल हवं जे लगेच नाही पण भविष्यात तुम्हाला चांगल्या प्रमाणात उत्पन्न करून देईल.
4. नोकरी सोडून साइड हसलवर पूर्ण लक्ष केंद्रित करा: जस तुमच्या साइड हसलमध्ये चांगले परिणाम दिसायला लागतील, त्यातून चांगल्या प्रमाणात उत्पन्न व्हायला लागेल तेव्हा तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करू शकता. हवं तर ६ महिन्यांचा खर्च भागेल असा एक Emergency Fund तुम्ही आधीच बनवून ठेऊ शकता.
इतर पोस्ट वाचा 👉काय तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवय? मग हे 3 नियम फॉलो करा
5. स्वतःचे बॉस बना: तुम्ही नोकरी सोडून स्वतःचा एक व्यवसाय सुरू केलात. पण आता तुम्हाला यासोबत तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढायचा आहे. जर तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही तर नोकरी किंवा साइड हसल यात काहीच फरक राहणार नाही.
लक्षात ठेवा:
- घाई करू नका. तुमच्या साइड हस्टलवर पूर्ण विश्वास ठेवा आणि मगच नोकरी सोडा.
- स्वतःचे बॉस बना. स्वातंत्र्य मिळाल्यावर, आवडीनिवडींसाठी वेळ द्या.
- मेहनत आणि शिस्त आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी काही वर्षे आणि समर्पण लागेल.
या सगळ्यासाठी वेळ लागेल पण आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) असलेली जीवनशैली तुम्ही नक्कीच बनवू शकता. आजच पहिले पाऊल उचला आणि “सामान्य” मार्गापेक्षा वेगळा मार्ग निवडा. तुमचे स्वातंत्र्य आणि छंद तुमची वाट पाहत आहेत! ALL THE BEST!
इतर पोस्ट वाचा 👉इतरांना इम्प्रेस करण्यापेक्षा स्वतःसाठी जगणे (आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग?)