स्टेप अप एसआयपी काय आहे? का केली पाहिजे? | Step-Up SIP in Marathi

Rate this post

Step Up SIP in Marathi:  म्यूचुअल फंडच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैसे इन्वेस्ट करण्यासाठी SIP किंवा Systematic Investment Plan हा एक आवडता मार्ग बनला आहे. शेअर मारेत. 

SIP तुम्हाला नियमितपणे एक निश्चित रक्कम गुंतवण्याची सुविधा देते. तसेच वेळोवेळी Rupee-Cost Averaging च्या मदतीने लॉन्ग टर्ममध्ये चांगली संपत्ती निर्माण करता येते.

पण तुमची इन्कम वाढत असताना तुम्ही SIP मध्ये इन्वेस्ट करत असलेले पैसे देखील वाढले पाहिजेत. हो की नाही? हे करण्याचा काही काही सोपा मार्ग आहे का?

मार्ग आहे तो म्हणजे स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP)

स्टेप-अप एसआयपी काय आहे (What is a Step-Up SIP?)

स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP) म्हणजे SIP रक्कममध्ये ठराविक कालावधीनंतर होणारी वाढ. आता ही वाढ तुम्ही 6 महिन्याने करू शकता किंवा 1 वर्षाने. सहसा लोक 1 वर्षाच्या हिशोबाने चालू SIP मध्ये वाढ करतात.

एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही या वर्षी एका म्यूचुअल फंडमध्ये 1000 रुपायची SIP केली. पण पुढच्या वर्षी तुम्हाला या SIP मध्ये 10% रक्कम वाढवायची आहे. म्हणजेच 100 रुपये वाढवायचे आहेत तर हे तुम्ही स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP) च्या मदतीने करू शकता. म्हणजे दुसऱ्या वर्षी तुम्ही SIP 1000 रुपयाची न राहता 1100 रुपयाची होईल तेही आपोआप.

ही पोस्ट वाचा :- SIP काय आहे? फायदे आणि तोटे | SIP in Marathi (marathifinance.net)

स्टेप-अप एसआयपी का केली पाहिजे? (Why Choose a Step-Up SIP?)   
इन्कम वाढली की SIP वाढली पाहिजे:

नवीन जॉब आहे. पगार कमी आहे. म्हणून SIP ची रक्कम कमी आहे. पण पगार एवढाच राहणार नाहीये. फ्युचरमध्ये पगार नक्कीच वाढणार. जसा पगार वाढेल तस तुमच्या SIP ची रक्कम वाढली पाहिजे आणि हे शक्य होत ते म्हणजे स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP) माध्यमातून आणि त्यासाठी जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही.

Power of Compounding चा फायदा:

जेव्हा तुम्ही दर वर्षी SIP ची रक्कम वाढवत असता, तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला Power of Compounding च्या रूपाने मिळत असतो. कारण तुम्ही Invest केलेली सुरुवातीची रक्कम, त्यावर मिळालेला रिटर्न + स्टेप अप करून वाढवलेली रक्कम, या सगळ्यांवर तुम्हाला रिटर्न मिळत असतो.

शिस्तबद्ध इन्वेस्टमेंट: 

स्टेप अप (Step Up) SIP केल्याने तुम्हाला दर वर्षी स्वताला SIP ची रक्कम वाढवायची गरज नाही लागत. त्यामुळे आपोआप तुमच्या SIP ची रक्कम वाढत राहते. अस केल्याने सतत SIP मध्ये बदल होत नाहीत. कधी रक्कम काढम कधी रक्कम काढ इ, कामे बंद होतात, परिणामी तुम्ही लॉन्ग टर्ममधील आर्थिक ध्येय गाठू शकता.

महागाईसोबत लढायची तयारी: 

तुम्ही न्यूजमध्ये एकत असाल की दर वर्षी महागाई 6-7% ने वाढत असते. महागाई वाढणे म्हणजे काय तर आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या किंमती वाढणे. आता दर वर्षी किंमती वाढणार आणि तुमच्या SIP ची रक्कम तेवढीच राहून कस चालेल. म्हणून स्टेप अप (Step Up) SIP हवी. (मी तर दर वर्षी SIP ची रक्कम 10% ने वाढवतो)

स्टेप अप SIP कशी चालू करायची? (How to set up Step-Up SIP?)

आता इथे तुम्ही कोणता Investing App वापरता यावर सगळी प्रोसेस अवलंबून आहे. तुम्ही जर बँक किंवा एखाद्या एजेंटच्या मदतीने SIP करत असाल तर तिथे तुम्हाला सहसा स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP) करायचा ऑप्शन नाही मिळत.

पण जर तुम्ही Groww, Zerodha Kite सारखे ऑनलाइन ब्रोकिंग Apps वापरत असाल तर त्यामध्ये स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP) करणे अगदी सोप कम आहे. कस करायच ते पुढीलप्रमाणे

  1. तुमच्या रिस्क क्षमतेनुसार एखादा म्यूचुअल फंड निवडा
  2. सुरुवातीला एक ठराविक रक्कम त्यामध्ये इन्वेस्ट करा. आणि SIP ची तारीख ठरवा.
  3. आता तुम्हाला स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP) किती करायची आहे हे ठरवा (दर वर्षी 10% वाढवायची आहे की एक ठराविक रक्कम जस की 100, 200 रुपये)
  4. बस स्टेप-अप एसआयपी (Step-Up SIP) चालू करा. एवढ सोप आहे.

Step Up SIP in Marathi Groww AppStep Up SIP in Marathi Zerodha Coin App

पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. काही Feedback असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्टमध्ये!

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi