Power of Compounding: तुमच्या श्रीमंतीची गुरुकिल्ली? का आणि कस?

Rate this post

Power of Compounding in Marathi: लहानपणी शाळेत आपल्याला सिम्पल इंट्रेस्ट आणि कंपाऊंड इंट्रेस्ट याचे धडे होते. त्यावेळी परीक्षा पास होण्यापुरत आपण ते समजून घ्यायचो. पण आता मोठे झाल्यावर जेव्हा आपण सगळे पैसे कमवायला लागलोय आणि ते पैसे आपल्याला इन्वेस्ट करून वाढवायचे आहेत, तेव्हा कंपाऊंड इंट्रेस्टचा धडा पुन्हा आढवावा लागणार आहे.

आता एवढ मागच कोणाला आठवणार नाही हे मला माहीत आहे. म्हणून आजच्या पोस्टमध्ये आपण कंपाऊंड इंट्रेस्ट किंवा Power of Compounding ला अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. कारण Power of Compounding हीच एक अशी गोष्ट आहे जी मला, तुम्हाला श्रीमंत बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया.

तुम्हाला माहीत आहे का? 

Warren Buffet यांच्या 84.5 बिलियन डॉलर एवढ्या संपत्तीपैकी 81.5 बिलियन डॉलर एवढी संपत्ती ही त्यांच्या 65 व्या वाढदिवसानंतर आली आहे. आणि तुम्ही जर नीट लक्ष दिलत तर त्यांची संपत्ती शेवटच्या वर्षात किती झपाट्याने वाढली आहे. आता यात मोठ रॉकेट सायन्स नाहीये. हे सगळ शक्य झालाय ते म्हणजे Power of Compounding मुळे.

आता ही Power of Compounding नक्की आहे काय? ते पहिल समजून घेऊ. 

समजा तुम्ही महिन्याचे 1000 रुपये एका इंडेक्स फंडमध्ये इन्वेस्ट करायचे ठरवले. महिन्याला 1000 म्हणजे वर्षाचे 12,000 रुपये.

  • पहिल वर्ष: 12,000 रुपये इन्वेस्ट केले
  • त्यावर 10% इंट्रेस्ट: 1200 रुपये मिळाले
  • टोटल: 13,200 रुपये झाले.

आता दुसऱ्या वर्षी काय होईल ते बघा. दुसऱ्या वर्षी पण तुम्ही महिन्याला 1000 रुपये इन्वेस्ट करणार आहात. महिन्याला 1000 म्हणजे वर्षाला 12,000 रुपये. आणि पहिल्या वर्षाचे 13,200 रुपये असे टोटल 25,200 रुपये तुम्ही इन्वेस्ट करणार आहात.

  • दुसर वर्ष: 25,200 रुपये इन्वेस्ट केले
  • त्यावर 10% इंट्रेस्ट: 2520 रुपये मिळाले
  • टोटल: 27,720 रुपये झाले

आता तिसर वर्ष आल. आता पहिल्या दोन वर्षाचे टोटल 27,720 रुपये + या वर्षाचे 12,000 असे टोटल 39,720 रुपये इन्वेस्ट करायचे आहेत.

  • तिसर वर्ष: 39,720 रुपये
  • त्यावर 10% इंट्रेस्ट: 3972 रुपये
  • टोटल: 43,692 रुपये

आणि हे असच चालू राहणार जोपर्यन्त तुम्ही Compounding ला थांबवत नाही. तुम्ही नीट लक्ष दिलत तर समजेल दर वर्षी तुमची इन्वेस्टमेंटची रक्कम वाढत आहे. कारण प्रत्येक वर्षाची मुद्दल + इंट्रेस्ट पुढच्या वर्षी जमा होत आहे. आणि म्हणून Compounding एवढी पावरफुल आहे.

तुम्ही इन्वेस्ट केलेली सुरुवातीची रक्कम, त्यावर मिळालेला इंट्रेस्ट आणि त्या इंट्रेस्टवर अजून इंट्रेस्ट मिळत राहणे म्हणजे Compounding.

Warren Buffet यांच्या पैशासोबत हेच झाल आहे. त्यांनी मुद्दल + इंट्रेस्टवर इंट्रेस्ट घेत राहिले. कधी पैसे काढले नाहीत. आणि म्हणून शेवटच्या वर्षामध्ये Compounding मोठ्या प्रमाणात काम करते. अगदी वेगाने. 

तुम्ही Power of Compounding चा वापर कसा करून घेऊ शकता?

The first rule of compounding: Never interrupt it unnecessarily. – Charlie Munger

तुम्ही म्यूचुअल फंड SIP करा की एकदाच इन्वेस्ट करा. तुम्हाला येत असेल तर चांगले स्टॉक निवडून पोर्टफोलियो बनवा. मुद्दा असा आहे की तुम्हाला Compounding ला मध्येच थांबवायच नाहीये. कारण जेव्हा तुम्ही थांबवणार. तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागणार. आणि Compounding साठी सगळ्यात महत्वाच आहे ते म्हणजे टाइम.

20 मध्ये सुरुवात करताय? रक्कम छोटी असली तरी चालेल पण Compounding चा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात होईल. म्हणून आजच सुरवात करा. इन्वेस्ट करत रहा. एक दिवशी Compounding जादू दाखवेलच!

पोस्ट आवडली असेल तर शेअर करा.  

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉How to Make Money: तुमच्या पैशापासून पैसा कसा बनवाल? (marathifinance.net)
तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi