बजाज फिनसर्व्ह मल्टी ॲसेट अलोकेशन फंड एनएफओ, जाणून घ्या माहिती | Bajaj Finserv Multi Asset Allocation Fund NFO Review | Marathi Finance

Rate this post

बजाज फिनसर्व्ह ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीने बजाज फिनसर्व्ह मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड (Bajaj Finserv Multi Asset Allocation Fund NFO) हा हायब्रीड फंड (Hybrid Fund) लाँच केला आहे. या फंडचां NFO कालावधी 13 मे २०२४ ते 27 मे, 2024 पर्यंत आहे. या नाविन्यपूर्ण फंडाचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये स्थिरता, वाढ आणि वैविध्य मिळवून देणे हे आहे. या फंडमध्ये तुम्ही कमीत कमी ५०० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.

नवीन अपडेटसाठी जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance

बजाज फिनसर्व्ह मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडची वैशिष्टे | Features of Bajaj Finserv Multi Asset Allocation Fund

जास्त लाभांश (Dividend) देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक: हा फंड उच्च लाभांश पेआउटचा ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो. ही स्ट्रॅटजी फक्त पोर्टफोलियोला चांगली ग्रोथ देत नाही तर स्थिर व्यवसाय मॉडेल आणि जबाबदार मॅनेजमेंट देखील दर्शवते.

पोर्टफोलियोमधील अस्थिरता कमी करणे: इक्विटी, डेब्ट आणि गोल्ड यासह अनेक मालमत्ता (Asset) वर्गांमध्ये पैसे इन्वेस्ट केल्याने पोर्टफोलियोमध्ये वैविध्य येते. यामुळे फायदा असा होतो की गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधील अस्थिरतेपासून बचाव होतो.

सर्व मार्केट परिस्थितींसाठी तयार: या म्यूचुअलफंडाची रचना शेअर मार्केटच्या विविध परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी केली आहे, ज्यामुळे तो तेजी आणि मंदीच्या दोन्ही मार्केट  परिस्थितींसाठी योग्य आहे. कारण यामध्ये वेगवेगळे Asset क्लास सामील आहेत जस की इक्विटि, डेब्ट, गोल्ड इ.

इतर पोस्ट वाचा 👉SIP काय आहे? फायदे आणि तोटे 

बजाज फिनसर्व्ह मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये कोणी इन्वेस्ट केल पाहिजे? | Who should invest in Bajaj Finserv Multi Asset Allocation Fund?

जर तुम्हाला स्थिरता हवीय: जे लोक इन्वेस्ट केलेले पैसे संरक्षणास प्राधान्य देतात आणि त्यांच्या गुंतवणूक प्रवासात कमी चढउतार शोधतात त्यांना या  फंडाच्या वैविध्यपूर्ण स्ट्रॅटजीचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

जर तुम्हाला फंडमध्ये विविध Assets हवे आहेत: हा फंड विविध मालमत्ता वर्गांमध्ये या फंडमधील गुंतवणूकदारांचे पैसे वाटप करतो. त्यामुळे एकाच फंडमध्ये अनेक Assets मिळतात. तसेच प्रत्येक गुंतवणूकदार त्याची गुंतवणूक स्वतः मॅनेज करण्याच्या गरजेपासून मुक्त करतो. जे काही करायच ते फंड मॅनेजर करतो.

जर तुम्ही एक लॉन्ग टर्म इन्वेस्टर आहात: लॉन्ग टर्म संपत्ती निर्माण करण्याचे उद्दिष्ट असलेल्या व्यक्ती या फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करून लाभांश (Dividend) देणाऱ्या कंपन्यांच्या वाढीचा फायदा घेऊ शकतात. गुंतवणूकदार या योजनेत एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करू शकतात.

जर तुम्ही एक नवे इन्वेस्टर आहात:पहिल्याच वेळी इक्विटी मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या गुंतवणूकदारांना वैयक्तिक स्टॉक निवडायला कठीण जात तसेच त्यामध्ये रिस्कसुद्धा जास्त असते. या फंडमध्ये पैसे इन्वेस्ट केल्याने फंडाच्या वैविध्यपूर्ण एक्सपोजरचा फायदा होऊ शकतो.

इतर पोस्ट वाचा 👉एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQs

NFO म्हणजे काय?

NFO म्हणजे New Fund Offer होय. जेव्हा एखादी म्युचुअल फंड नवीन फंड मार्केटमध्ये घेऊन येते तेव्हा त्याला NFO म्हणतात.

हायब्रीड (Hybrid) म्युचुअल फंड म्हणजे काय?

हायब्रीड म्युच्युअल फंड म्हणजे असा फंड जो Equity म्हणजेच कंपन्यांचे शेअर्स आणि Debt जस की बॉण्ड्स, अशा दोन्ही प्रकारच्या Asset क्लास मध्ये पैसे Invest करतो.

Multi Asset Allocation फंड काय आहे?

नावावरूनच समजत की  Multi Asset फंड म्हणजे असा फंड जो विविध प्रकारच्या Assets मध्ये पैसे इन्वेस्ट करतो.

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi