श्रीमंत व्हायचय ना? मग या 4 स्टेप्स नक्की फॉलो करा | How to Become Rich

How to Become Rich (with 4 Simple Steps): आर्थिक स्वातंत्र्य असो की लवकर रिटायर होणे असो तसेच  लाईफमध्ये आराम हवाय की खूप साऱ्या संधी असुदेत. ही सगळी स्वप्ने एका गोष्टीवर अवलंबून असतात ती म्हणजे तुमची संपत्ती (Wealth).

पण ही संपत्ती तुम्ही नक्की कशी मिळवणार? तुम्हाला वाटत असेल यासाठी खूप कठीण काम करावं लागेल पण खर बोलू तर संपत्ती (Wealth) बनविणे काही सिंपल गोष्टींवर अवलंबून आहे.

या पोस्टमध्ये आपण 4 सिम्पल स्टेप्स समजून घेणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याची तयारी अगदी झीरोपासून सुरू करू शकता. चला तर सुरुवात करूया.

1. सगळ्यात आधी इन्कम वाढवायच बघा 

आता इन्कम किती गरजेची आहे हे मी सांगायची  गरज नाही. तुमची इन्कम हा तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पहिला पाया असतो. कारण पैसा पैशाला बनवितो.

पण ते होण्याआधी तुम्हाला पैसा बनवीता आला पाहिजे. त्यामुळे कॉलेज झाल की लगेच एखादा जॉब किंवा बिझनेस कसा करता येईल हे आधी बघा. एक इन्कम सुरू झाली की तुम्ही दुसऱ्या इन्कमवर फोकस करू शकता. आणि दुसरी इन्कम तुम्ही एखाद Side Hustle किंवा एखाद अस स्किल शिकून तुम्ही पैसे कमवू शकता.

2. जितक कमवता त्यापेक्षा कमी खर्च करा

तुम्ही श्रीमंत होण्याच्या मार्गात  खर्च हाच सगळ्यात मोठा अडथळा असतो. आता खर्च कमी करणे म्हणजे कंजूस बनणे नाही तर जितके गरजेचे आहेत तेवढेच पैसे खर्च करणे होय. तुमचे खर्च ट्रक करा. जेव्हा तुम्ही पैसे खर्च ट्रक कराल तेव्हा नक्की खर्च कुठे होत आहे हे तुम्हाला समजेल.

आणि जर तो खर्च वायफळ असेल तर तुम्ही तो कमी करू शकता. एक बजेट बनवा आणि जाणीवपूर्वक खर्च करा. त्यामुळे पैसे Save होतील आणि त्यांना इन्वेस्ट देखील करता येईल. (तुमचे खर्च ट्रक करा अगदी सोप्या पद्धतीने 👉 Finance Tracker PRO – Marathi Finance)

3. इन्वेस्ट, इन्वेस्ट, इन्वेस्ट & Become Rich 

जेव्हा पैसे इन्वेस्ट करता तेव्हा तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतात. पॉवर ऑफ कंपाऊंड इंट्रेस्टला समजणे काळाची गरज आहे. पैसे कमवा आणि उगाच ते खर्च न करता Save करा. आणि Save केलेले पैसे इन्वेस्ट करा.

आता इन्वेस्ट करण्यासाठी तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत. स्टॉक्स, म्यूचुअल फंड, ETF आणि PPF इ. (पण हा स्वता रिसर्च करा आणि मग पैसे इन्वेस्ट करा)

4. संयम ठेवून Assets एकत्र करा

संपत्ती (Wealth) बनविणे ही काय छोटी शर्यत नाहीये तर एक प्रकारची मॅरथॉन आहे. इथे तुम्हाला हळू हळू का होईना पण लॉन्ग टर्मसाठी धावायच आहे. पैसे इन्वेस्ट करत रहा आणि चांगले Assets एकत्र करा. तुम्हाला एवढे Assets एकत्र करायचे आहेत की तुम्हाला काम करायची गरज नाही लागणार.

तुमच्याकडे असलेले Assets तुमचा खर्च काढतील. Assets जस की स्टॉक्स, म्यूचुअल फंड, ETF इ. लक्षात घ्या तुमच्याकडे जितके जास्त Assets तितकी जास्त संपत्ती (Wealth) तुमच्याकडे बनेल, अगदी तुम्ही झोपताना  पण तुमचे Assets तुमच्यासाठी पैसे बनवतील.

या बेसिक्सना विसरू नका (काही वर्षात तुम्ही श्रीमंतीच्या मार्गावर असाल)

वरील 4 गोष्टी खूप सिम्पल वाटत असतील पण करताना खूप कठीण जातात. कारण हे काय 1- 2 वर्षाच काम नाही, ही एक लाइफस्टाइल आहे जी तुम्हाला जगायची आहे. इन्कम वाढवा, खर्च कमी करा, नियमितपणे इन्वेस्ट करा, चांगले Assets एकत्रित करा.

नेहमी लक्षात घ्या की, संपत्ती बनविणे ही काय झटपट श्रीमंत होण्याची स्कीम नाही. या 4 गोष्टी प्रामाणिकपणे करून तुम्ही लॉन्ग टर्ममध्ये संपत्ती (Wealth) बनविण्यासाठी पाया भक्कम करत आहात. आणि म्हणून तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठीच पहिल पाऊल आजच उचला.

पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. काही feedback असेल तर नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्टमध्ये!

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

1 thought on “श्रीमंत व्हायचय ना? मग या 4 स्टेप्स नक्की फॉलो करा | How to Become Rich”

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?